On Wed 1 May, 2019, 20:20 Nagesh S Shewalkar, <nageshspande@gmail.com> wrote:
*नागेश सू. शेवाळकर यांचा परिचय!*
नाव - नागेश सूर्यकांतराव पांडे... Read more
On Wed 1 May, 2019, 20:20 Nagesh S Shewalkar, <nageshspande@gmail.com> wrote:
*नागेश सू. शेवाळकर यांचा परिचय!*
नाव - नागेश सूर्यकांतराव पांडे (शेवाळकर)
साहित्यिक- *नागेश सू. शेवाळकर*
व्यवसाय - सेवानिवृत्त मुख्याध्यापक
**शैक्षणिक विशेष **
१) उत्कृष्ट शिक्षक म्हणून दोन वेतनवाढ.
२) आदर्श शिक्षक ग्राम पातळी(भाटेगाव, आणि डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोली)
३) आदर्श शिक्षक जिल्हा परिषद, परभणी.
४) आदर्श शिक्षक महाराष्ट्र शासन.
५) जि. प. प्रा. शा. डोंगरकडा (गाव) या शाळेत मुख्याध्यापक असताना सर्व शिक्षा अभियान याअंतर्गत शाळेला कळमनुरी तालुका प्रथम क्रमांक तर हिंगोली जिल्ह्यात द्वितीय क्रमांक हे बहुमान प्राप्त.
६) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई (शिक्षक रत्न), महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी समिती औरंगाबाद (स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार- शिक्षण), परभणी जिल्हा को-ऑप. सोसायटी शिक्षक सहकारी पतपेढी परभणी(आदर्श शिक्षक), अखिल महाराष्ट्रपत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई (शिक्षक रत्न).
****प्रकाशित साहित्य****
**धार्मिक**
औंढा नागनाथ स्तोत्र आणि जटाशंकर महात्म्य.
** प्रकाशित कादंबरी **
१) तृषित तृष्णा
२) विषयांतर
३) शेतकरी आत्महत्त्या करी.
४) वणवा
५) मरणगंधा
६) शापित सती
** प्रकाशित कथासंग्रह **
१) मरणा तुझा रंग कसा?
२) एड्सचे वादळ
३) गॅसबाला
४) संस्कारदीप सानेगुरुजी
५) न संपणारा शेवट
६) स्वर्गातले साहित्य संमेलन
७) स्मशानदूत
८) विनाथांबा
९) गणपती बाप्पा हाजिर हो
१०) आपलीच बायको बरी
११) शाळा लावी लळा
१२) श्यामच्या छान छान गोष्टी.
१३) सानेगुरुजींच्या छान छान गोष्टी (इंग्रजी अनुवाद)
१४) कविता कालची, शिकवण आजची (गदिमा यांच्या बालकवितांवर आधारित बालकथासंग्रह)
** प्रकाशित चारोळी संग्रह **
१) शाळा शतश्लोकी
२) आसुड बळीचा
३) गाजर आरक्षणाचे
** प्रकाशित नाट्य **
१) एड्समुक्त भारत होवो
** प्रवास वर्णन **
१) धमाल प्रवासातील
** चरित्र ग्रंथ **
१) अमृताचा घनुः राम शेवाळकर
२) क्रिकेट रत्नः सचिन तेंडुलकर
३) बाळासाहेब एक अंगार
४) सदाबहारः सदाशिव पाटील
५) स्वराज्यसूर्य शिवराय (२५ भागांचे संपूर्ण ई चरित्र )
६) विविध समाजसुधारकांचे छोटे छोटे ई चरित्र
**विशेष अभिमानास्पद**
१) *शेतकरी आत्महत्त्या करी* ही कादंबरी रुपवेध प्रकाशन, परभणी यांनी प्रकाशित केली असून या कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या कादंबरीची निवड 'महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने' शासनमान्य यादीसाठी केली आहे.
२) इसाप प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या *संस्कारदीपः सानेगुरुजी* ह्या पुस्तकाचा 'सानेगुरुजींच्या छानछान गोष्टी' या नावाने श्री उद्धव भयवाळ यांनी इंग्रजी अनुवाद केलेले पुस्तक 'महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे' यांच्यावतीने 'वाचन प्रेरणा कार्यक्रमातंर्गत निवडण्यात आले आहे.
३) *अमृताचा घनुः राम शेवाळकर* या चरित्रग्रंथाची निवड 'महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी केली असून इसाप प्रकाशन, नांदेड यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
४) *श्यामच्या छान छान गोष्टी* इसाप प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची निवड महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमातंर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पुरवणी वाचन या योजनेत झाली आहे.या पुस्तकाची पहिली आवृत्ती *****ऐंशी हजार प्रतींची***** आहे.
५) ** प्राप्त झालेले प्रमुख पुरस्कार **
अ) राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार :- लोकमित्र मंडळ कन्नड (कथासम्राट,) दै. लोकपत्र नांदेड (धमाल फोनची आणि वांझ बाप या कथांना), स्वप्ना दिवाळी अंक सांगली (प्रथम पुरस्कार), सा. विचारज्योत उदगीर (महामारी प्रथम पुरस्कार), दै. गोदातीर समाचार नांदेड (झुंज कथा- दुसरे बक्षीस), लोकमित्र मंडळ रायगाव (गर्भ किराया या कथेस कथासम्राट पुरस्कार), सुबोध फिचर्स, नांदेड (लेख स्पर्धा), कै. त्र्यंबक असरडोहकर अंबाजोगाई (पांढरं सोन-कथा),स्वप्ना सांगली (बाधा मदनाची), शब्दांंगार संस्था हिंगोली (तृषित तृष्णा, विषयांतर या कादंबऱ्यांना), सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ अकोला (तृषित तृष्णा कादंबरी), हास्यधमाल दिवाळी अंक नाशिक (चंद्र आहे साक्षीला- प्रथम), शेवाळा जि. हिंगोली (चक्रधर उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार),अंकुर साहित्य
संघ अकोला (मरणा तुझा रंग कसा? कथासंग्रह- रा.गो.महल्ले
पुरस्कार),टॉनिक बाल वार्षिक मुंबई (दिवा प्रतिष्ठान उत्कृष्ट
लेखक), कलाकुंज प्रकाशन नाशिक (नियमित लेखक पुरस्कार), स्टोरी मिरर ई साहित्य संस्था(साहित्य कर्नल- मानाची पदवी), लोकमत ई पेपर (टॉप फँस), पंढरपूर जिल्ह्यातील एक शाळा इयत्ता आठवी (अवांतर वाचनासाठी 'राम शेवाळकर' चरित्रआणि धमाल फोनची कथेची निवड), फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर (गॅसबाला विनोदीउत्कृष्ट कथासंग्रह), येवला तालुका वृत्तपत्र लेखक संघटना नाशिक (लोकमान्य गौरव पुरस्कार).
याशिवाय फ्रेंड सर्कल पुणे, त्रैमासिक कस्तुरी धुळे, नंदीग्राम संचार नांदेड, भन्नाट दिवाळी अंक पुणे, श्री वैराग्यमहामेरू प्रबोधिनी तेर, साहित्य कला सेवा मंडळ नागपूर इत्यादी संस्थेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत
६) याशिवाय नागेश शेवाळकर हे क्रिकेट, शिक्षण, सामाजिक, राजकारण, आरोग्य इत्यादी अनेक विषयांवर सातत्याने लेखन करीत असतात.
७) कवी कट्टा हा नांदेड येथून संचलित असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक सभासद असलेला व्हाट्सअप समूह आहे. या समूहावर दि. १५ जुलै २०१८ या दिवशी एक ऑनलाइन महाचर्चा झाली होती. 'अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेअध्यक्षाची निवडणूक मतदानाने न घेता साहित्य महामंडळ करणार' ही महाचर्चा नागेश सू. शेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
८) गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा अधिक दिवाळी अंकातून प्रामुख्याने *विनोदीकथा* प्रकाशित होत आहेत. ९) मातृभारती ही राष्ट्रीय संस्था असून या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील लेखस्पर्धेत शेवाळकरांच्या 'सचिन' आणि 'गणपतिबप्पा' (हिंदी) या दोन लेखांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
१०) अनोखा विश्वास मासिक इन्दौर यांच्यावतीने 'महात्मा ज्योतिबा फुले शिक्षाविद् अखिल भारतीय प्रतिभा सम्मान प्राप्त झाला आहे.
११) 'सदाबहार' या चरित्र ग्रंथाला बडोदा(गुजरात) येथील मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
१२) अखिल भारतीय साहित्य संमेलन परभणी येथे साहित्य दिंडी नेण्यात आली होती. नियोजनात प्रमुख सहभाग.
१३) आकाशवाणी नांदेड, परभणी केंद्रासाठी श्री नीळकंठ कोठेकर आणि श्री विलास कुमठेकर यांनी मुलाखती घेतल्या.
१४) एड्स विषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण (लेख, कथा, कादंबरी, चर्चासत्र) सहभाग.
१५) स्टोरी मिरर या ई साहित्य संस्थेच्यावतीने LITARARY CONOL हा बहुमान प्राप्त झाला आहे.
१६) तसेच स्टोरी मिरर कडून दोन वेळा माझी 'ATHOUR
OF THE WEEK' म्हणून निवड झाली आहे।
१७) स्टोरी मिररच्यावतीने LITRARY BRIGEDIER हा सन्मान प्राप्त झाला आहे.
१८) स्टोरी मिररच्याद्वारे घेण्यात आलेल्या '५२ आठवडे लेखन आव्हान २०१९-२०२० स्पर्धेत' विजेता म्हणून निवड झाल्यानंतर स्टोरी मिररच्या वतीने 'त्रिकोणीय सामना' हा पंचवीस विनोदी कथा असलेला संग्रह प्रकाशित झाला आहे.
नागेश सू. शेवाळकर
११० वर्धमान वाटिका फेज ०१
क्रांतिवीरनगर लेन ०२
संचेती शाळेजवळ थेरगाव, पुणे
पिन ४११०३३. संपर्क(९४२३१३९०७१ Read less