Rutuja kulkarni

Abstract Tragedy Inspirational

3  

Rutuja kulkarni

Abstract Tragedy Inspirational

मातृत्व : एक शक्ती

मातृत्व : एक शक्ती

3 mins
240


दोन दिवसांपूर्वी ऑफिसच्या काही कामानिमित्त एका खेडेगावांत जाण्याचा योग आला. मी माझ्या ऑफिसच्या मित्रमंडळींसोबत तिथे गेले होते. आम्ही गावांत पोहचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले असतील साधारणपणे. आम्ही तिथेच असलेल्या एका टपरीवर चहा पितं बसलो तेवढ्यातं त्या टपरी च्या समोर खूप गर्दी जमा झाली होती. नेमका कायं प्रकार आहे, हे पाहण्यासाठी आम्ही ही त्या गर्दी मध्ये सामील झालो खरे, पण समोरचे ते दृष्य पाहून क्षणभर आम्ही सर्व चं जण अवाक् झालो. आमच्या अगदी समोर एक बाई एका माणसाला अक्षरशः चपलेने मारत होती. त्या मध्ये काही बहुदा त्या दोघांना ओळखणारे लोक समजूत घालताना दिसतं होते तरं काही जण माहित असूनही मुक गिळून गप्प बसले होते. थोड्यावेळाने तो माणूस त्या बाईच्या हातून निसटून दूर पळाला आणि ती बाई ही दोन - चार शिव्या देऊन तिथून निघून गेली. ते दोघे गेल्यावर तिथली गर्दी ही चर्चा करतं ओसरतं होती आणि त्या गर्दीबरोबर आम्ही ही आमचा मोर्चा पुन्हा चहाच्या टपरीकडे वळवला. माझ्या बरोबर चे सर्वजण चहा पिण्यात मग्न होते, पण माझ्या मनांत मात्र खूप कुतुहल होते, नेमके काय झाले होते हे जाणून घेण्याचे म्हणून चं चहा पिताना मी त्या टपरी च्या मालकाला विचारले,"दादा कोणं होते ते दोघे?? हे असे रोज चं होते का तुमच्याकडे? आणि ती बाई त्या माणसाला मारत का होती?? ",

तेव्हा तो म्हणाला, "बाई रोज नायं घडतं असलं काही ह्या गावातं. हे मघाशी होते ते शिरपा आणं त्याची बायको सावित्री. अवं ही बाई लई पतिव्रता हायं, पर हा शिरपा रोज तिला पट्ट्याने, कधी लाथा बुक्क्याने हाणतो. रातच्याला रोजं तिच्या इवहळण्याचा आवाज येतो बघा, गावातल्या लई लोकांनी समजवलं त्याला परं ते कुत्र्याच शेपुट वाकडं असतयं बघा तसयं त्याचं. बिचारी सावित्री मार खाती, एक चुकार उलंट नायं बोलतं, नेटाने घर चालविती ती, चार घरची कामं करून. ", 

हे ऐकून मला खूप वाईट वाटले सावित्रीबद्दल खरतरं तिचा माझा काही संबंध नव्हता तरीही आणि म्हणूनच मी पुढे कायं झाले हे ऐकण्यासाठी त्या चहाच्या टपरीवर च्या मालकाकडे पाहू लागले तसा तो बोलू लागला. 

"अवं चार वर्षापूर्वी त्यांना एक लेक झाली, शिरपा जरा नाखूश चं व्हाता वं. लेक झाल्यावर तर अजून दारू प्यायला लागला. काल म्हण त्यानं सावित्री ने पैक नायं दिलं म्हणून लई मारलं अन पहाटं डोळा लागला तिचा तसा दारूसाठी लेकीला विकायला गेला होता, सावित्रीला जाग आली तेव्हा लेक शेजारी नायं दिसली तशी ती शोधाशोध कराया लागली बघा तवा शिरपा च्या एका दोस्ताकडून कळलं तिला.. तसं जमीन चं सरकली बघा पायाखालची तिच्या. हे कळलं न तिन जाऊन कसबस गाठलं शिल्पाला अन लेकीला वाचवलं, अनर्थ टळला बघा आणि त्याचं पायी घरला गेली. तिन घरी लई वाटं पाहिली पण शिरपा नाय आला घरी. कुठून तरी तिला कळलं की, तो दारू पिऊन पलिकडल्या नाल्यापाशी पडला होता, तशी ती तिथं गेली न तिथून चं मारतं व्हती बघा त्याला न मारतं चं इथवर आली बघा. सावित्रीसारखी पतिव्रता भी कधी असं वागलं असं गावच्या कोणाला भी वाटलं नव्हतं बघा. आज जणू देवी चं रूप घेऊन आली व्हती बघा ",

  एवढे बोलून तो त्याच्या कामाला लागला, मी मात्र हे ऐकून हैरान होते. 

'बाई अबला असते, वेळं आली की दुर्गा ही होते', हे फक्त ऐकले होते आजपर्यंत पण आज पहिल्यांदाच एका अबलेला दुर्गेचे रूप घेतलेले पाहिले होते मी.  खरेतरं " स्त्री ", ही कधीचं अबला नसते मुळातच ती फक्त तिचे कर्तव्य करतं असते. आपण बरेचदा कित्येक स्त्रियांना त्यांच्या मातृत्वासाठी कितीतरी गोष्टी सहन करताना पाहतो पण हे मातृत्व जर तिची कमजोरी असेल तर प्रसंगी हेचं मातृत्व तिची शक्ती ही आहे आणि जेव्हा जेव्हा तिच्या शक्तीचा, तिच्या स्त्रीत्वाचा, तिच्या मातृत्वाचा हक्क किंवा तिचा स्वाभिमान कोणी हिरावून घेत असते, तेव्हा ती प्रसंगी दुर्गा ही होते आणि महाकाली ही!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract