Rutuja kulkarni

Romance Fantasy

3  

Rutuja kulkarni

Romance Fantasy

छेडल्या तारा : भाग १

छेडल्या तारा : भाग १

3 mins
294


"उड़े, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे,

उड़े, दिल के जहाँ में ख्वाबों के परिंदे 

ओहो, क्या पता, जाएंगे कहाँ

खुले हैं जो पल, कहे ये नज़र

लगता है अब जागे है हम

फिक्रें जो थी, पिछे रह गयी

निकले उनसे आगे हम,

हवा में बह रही है ज़िन्दगी

ये हमसे कह रही है ज़िन्दगी

ओहो, अब तो, जो भी हो सो हो... ",

  

     हे सूर आज पुन्हा छेडले होते मिहिका ने जवळजवळ पाच वर्षांनंतर पुन्हा. आजं कित्येक वर्षानंतर त्या, 'गिटार', वरच्या तारांना हातांचा तो रेशमी स्पर्श झाला होता. या लॉकडाऊन मुळे कितीतरी वर्षांनी त्याच्या वरची धुळ पुसली गेली होती . हो ना जवळपास पाच वर्षे ती तशीच पडून होती, सध्या लॉकडाऊन मुळे रोज आँफिस ची आणि उरलेल्या वेळात घरची काम करण्यात मिहिका चा वेळ जायचा. गेले दीड दोन महिने वर्क फ्रॉम होम सुरू होते रोजं , पण गेल्या दोन आठवड्यापासून तिला "रविवारी आँफिस कामं नसेल", हे तिच्या बाँस ने सांगितले आणि मगं तेव्हापासून ती दर रविवारी घराची थोडी साफसफाई करतं होती. आज बेडरूम मध्ये साफसफाई करताना तिला ही गिटार दिसली आणि मगं लगेचचं तीने हातात घेतली ती. गिटार आणि मिहिका चं तसं खूप जुन नातं होतं म्हणून चं की कायं, मिहिका जेव्हा जेव्हा तार छेडतं होती आजं, तेव्हा अगदी मनसोक्तपणे दाद देतं होते ते अगदी पाच वर्षे उलटून गेली तरी. आणि छेडलेल्या प्रत्येक तारांबरोबर मिहिका चे मन तिला भूतकाळाकडे घेऊन चालले होते. एखाद्या चित्रपटाचा जसा फ्लॅशबॅक असतो त्याप्रमाणे चं फ्लॅशबॅक सारखे जुने सारे काही मिहिका च्या डोळ्यांसमोर चित्ररूपात उभे होतं होते आणि ती पुन्हा एकदा स्वतः ते क्षण, ते दिवस अनुभवतं होती.


   "उड़े ख्वाबों के परिंदे ", 

    हे गाणे मिहिकाला अगदी कॉलेज पासूनच आवडायचे . हे गाणं म्हणजे तिला केवळ त्या गीतकाराने तिच्यासाठी चं लिहिले आहे असेचं वाटायचे. साहजिक चं होते तिला असे वाटणे कारण मुळांत मिहिका ही अशी चं होती एकदम बिनधास्त. तिला एकसारखा साचेबद्धपणा कधीचं रूचायचा नाही. कॉलेज मध्ये असताना हवे तेव्हा वाटेल तिकडे ती फिरायची मगं सोबत कोणी असो किंवा नसो तिची गिटार मात्र कायम सोबत असायची तिच्या अगदी सावली सारखी.

अगदी लहान असल्यापासून चं मिहिका ला गिटार वाजवण्याची आवडं होती आणि मगं ती आवड जोपासण्यासाठी तिच्या आई वडीलांनी ही तिला प्रोत्साहन दिले आणि मगं मिहिका गिटार वाजवायला हळू हळू शिकली. तिने गाण्याचे शिक्षण नव्हते घेतले कुठेही, पण तिच्या गळ्यात जणू सरस्वती चं होती , खूप गोडं गायची ती. आणि मगं लहानपणापासून चं ही गिटार आणि गाणे तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले. कॉलेज मध्ये ऑडिटोरियम मध्ये ती कितीतरी वेळ एकटीचं गुणगुणतं बसायची. पण मिहिका ने तिच्या या आवडीचा तिच्या अभ्यासावर कधीचं परिणाम नाही होऊ दिला.

एक दिवस मिहिका अशीचं ऑडिटोरियम मध्ये गिटार वर तार छेडून गुणगुणतं बसली होती. आणि तिचं ते गुणगुणनं मध्ये चं थांबवत टाळी वाजवतं चं त्याने ऑडिटोरियम मध्ये प्रवेश केला आणि मिहिका काही बोलायच्या आत चं त्याने तिला,

  "हँलो.. मी वरूण..

 सॉरी, मी असे अचानक आतमध्ये आलो आणि तुमचे हे गाणे थांबवले त्याबद्दल. पण खरचं किती सुरेख गाता तुम्ही. मी इथून जातं होतो आणि माझ्या कानावरं हे स्वर पडले म्हणून मला रहावलं नाही आणि मी आत आलो. तुम्हाला राग आला असेल तर मी परत एकदा सॉरी म्हणतो",


   मिहिकाला खरेतरं राग आला होता पण त्याचं ते लाघवी बोलणं आणि त्याचे ते हास्य पाहून मिहिकाला अगदी पहिल्या क्षणी तो आवडला होता. म्हणून चं ती फक्त एवढेचं म्हटली,

  " नाही राग नाही आला. तुम्ही इतके कौतुक केले माझे त्यासाठी थँक्यू. "

  त्यावर लगेचचं वरूण ने प्रतिउत्तर दिले,

   "अहो ईतक्या गोडं आवाजाचे कौतुक तर व्हायला चं हवे. तुमचं नाव कायं?",

  त्यावर तिने किंचितसे हसून,

"मिहिका", असे उत्तर दिले.


    ( मिहिका च्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणारी ही गिटार आणि हे गाणं तिच्यापासून इतके वर्ष दूर का होते आणि मिहिका आणि वरूण चे पुढे कायं झाले या प्रश्नांची उत्तरे पुढील भागांत) 


क्रमशः

भाग :2 मध्ये...



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance