Rutuja kulkarni

Classics

3  

Rutuja kulkarni

Classics

एक अनोखी रात्र

एक अनोखी रात्र

3 mins
203


रोजची तीचं ती धावपळ आणि त्याचं त्या गोष्टी करून खरेतरं खूप कंटाळा आला होता, "बसं झालं आता या पुढे मी नाही करणार, मला हवे तसे वागणारं ", हे असे दिवसातून हजारो वेळा तरी बोलून व्हायचे माझे, पण पुन्हा झोपायच्या आधी सकाळी करायच्या, त्या ठरलेल्या कामांची यादी मात्र तयार असायची नेहमीचं. असो आज आँफिस मधून निघताना दोन दिवस सुट्टी आहे, या एका विचाराने तरी मनाला थोडासा दिलासा दिला होता, यात काही शंका नाही. म्हणून तर आज किती तरी महिन्यांनी मी माझे आवडते आणि सदाबहार गायक किशोर कुमार यांची गाणी ऐकत स्वयंपाक करत होते, नाहीतर एरवी फोन वर आँफिस च्या कामांचा पुन्हा घरी आराखडा घेताना, किंवा आईशी नाहीतर आँफिस मधल्या मैत्रिणीशी बॉस चा राग काढतं माझा स्वयंपाक कसा व्हायचा हे मला ही कळायचे नाही. आज माझ्या या अशा वागण्याचे मला ही आश्चर्य चं वाटंत होते. चक्क आज मी घरी आल्यापासून मी चिडचिड केली नाही, हे पाहून उगीचचं गर्व वाटंत होता आणि या भावनेचे हसू ही येत होते. पण हे असे होणे स्वाभाविक चं होते कारण गेल्या कित्येक महिन्यांमध्ये ही अशी सुट्टी किंवा मला स्वतःसाठी वेळ असा मिळाला चं नव्हता, म्हणून तर आज खूप वेगळं वेगळं भासतं होतं.

      जेवण केल्यानंतर रोज कधी झोपते असे व्हायचे, पण आज प्रथमचं मला ती झोप नकोशी वाटंत होती. काहीवेळं टीव्ही वर गाणी पाहिली, पण कंटाळा आला म्हणून परत टीव्ही बंद केला. माझे नेहमीचे आवडीचे, पुस्तक वाचायचा प्रयत्न केला, मला आवडणार्‍या कुसुमाग्रजांच्या कविता ही वाचल्या पण, काही केल्या मन काही रमतं नव्हते, मग म्हणून स्वयंपाकघरात जाऊन मी कॉफी करायला गेले, जेणेकरून थोडसं छान वाटेल. ती गरमागरम कॉफी घेऊन सोफ्यावर मोबाईल घेऊन बसले, पण आज का कोण जाणे तो मोबाईल ही नकोसा वाटला म्हणून चं तो कॉफीचा तो वाफाळणारा मग घेऊन मी बाल्कनीचा दरवाजा उघडून, बाल्कनी मधे गेले. जशी वार्‍याची एक लकेर स्पर्शून गेल्यावर मनामध्ये एक शहारा निर्माण होतो, अगदी तसेचं काहीसे झाले, जे मला जाणवले, पण आता शब्दांत व्यक्त करणे मात्र अवघड वाटंत आहे. ईकडे तिकडे बघताना, रस्त्यावर ची ती थोडीशी निरव शांतता आणि मधेमधे असलेली वाहनांची ये जा बघता बघता, सहजचं लक्ष गेले, ते बालकनी जवळ असलेल्या दोन झाडांमधून डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे. क्षणभर तो चंद्र जणू मला चं पहातोयं असा भास झाला जणू. मी ही मग कॉफी घेत घेतं त्याच्या कडे पहांत होते. आज हा चंद्र मला खूप सुंदर वाटंत होता आणि एरवी मला न आवडणारी ही रात्र, हो हीच रात्र खूप छान वाटंत होती.

     आज कितीतरी दिवसांनी असं एक आतंरिक समाधान गवसल्याचा एक आनंद मिळतं होता. आणि मनातले सारे सारे मी त्या चंद्राशी बोलत होते आणि जणू तो ही ऐकून घेत होता, मला समजावतं होता. कितीतरी दिवसांनी आज मी सवतःशी चं गप्पा मारतं होते. ही रात्री ची शांतता मला क्षणोक्षणी सुखावून जातं होती. आणि जणू मला सांगत होती,

    "कधीतरी अशीचं तु, स्वतः शी ही बोलत जा,

    कधीतरी अशीचं तु, मला ही भेटंत जा..


    कधीतरी अशीचं तु, या रात्री ला वेचत जा,

    आयुष्यासाठी सोनेरी क्षण, साठवतं जा..।। "


   बसं या एका रात्रीने किती किती आठवणी जाग्या झाल्या होत्या, अवघ्या काही वेळांतचं मी किती क्षणं वेचले होते,नेहमी पेक्षा वेगळे असे काहीतरी केले होते. आज पुन्हा खरेतरं मला माझ्यातली मी नव्याने सापडले होते, हे मात्र नक्की...!!   


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics