छेडल्या तारा : भाग ५
छेडल्या तारा : भाग ५
मिहिकाला आता हळू हळू एक एक प्रश्नाची उत्तर मिळत होती. आणि मिळणार्या उत्तरासोबत तिच्या चेहर्यावर तेजं खुलतं होतं. कॉफीचा तो मगं संपवून तिने पुन्हा ती गिटार हातांत घेतली आणि बाल्कनीत मध्ये येऊन बसली.
ओरे मनवा तू तो बावरा है
तु ही जाने तू क्या सोचता है
तू ही जाने तू क्या सोचता है
बावरेक्यूँ दिखाए सपने तू सोते जागते
जो बरसें सपने बूँद-बूँद
नैनों को मूँद-मूँद
नैनों को मूँद-मूँद
जो बरसें सपने बूँद-बूँद
नैनों को मूँद-मूँद
कैसे मैं चलूँ
देख न सकूं
अनजाने रास्ते
गूंजा सा है कोई इकतारा-इकतारा,
गूंजा सा है कोई इकतारा
गूंजा सा है कोई इकतारा-इकतारा,
गूंजा सा है कोई इकतारा
धीमे बोले कोई इकतारा-इकतारा,
धीमे बोले कोई इकतारा
गूंजा सा है कोई इकतारा-इकतारा,
गूंजा सा है कोई इकतारा..' ,
आजं बेभान होऊन ती गिटार वर तार छेडतं होती, आणि गातं होती. ती आजं ईतकी हरवली होती की, की तिच्या मागे येऊन वरूण कधीपासून तिच्याकडे पाहतोयं, याचे ही तिला भान नव्हते. हे गाणे संपले आणि ती थांबली, तेव्हा," तु थांबलीस का? ", हा आवाज ऐकून ती दचकली आणि तिने मागे असलेल्या वरूण ला पाहिले आणि म्हणाली, "तु ईथे?? सॉरी.. तुला डिस्टर्ब झाले का??", तेव्हा वरूण म्हणाला, "नो.. नो.. डिस्टर्ब नाही झालं. माझं काम झालं, सो मी जस्ट फ्रेश होण्यासाठी आलो,तेव्हा तुझा आवाज ऐकला म्हणून ईथे आलो.", त्यावर मिहिका म्हणाली, "ओके.. ओके", वरूण म्हणाला, "पण तु थांबलीस का?? ", मिहिका म्हणाली," अरे झालं ना.." वरूण म्हणाला," ओह..!! छान वाटतं होतं.. लगेचचं संपलं पण.. ", मिहिका काही बोलणार इतक्यात वरूण म्हणाला," ए वेटं अ मिनिट.. तु हे गाणे कॉलेजमध्ये गँदरिंग मध्ये म्हटलेले ना..?? बरोबर... ?? ", तेव्हा वरूण कडे आश्चर्याने पहांत मिहिका म्हणाली, "हो... म्हणजे,तुला लक्षात आहे?? ", त्यावर वरूण म्हणाला," मी का विसरेल..??माझ्या लक्षात आहे.. ", "कदाचितं गोष्टी नाही, पण तु मला आणि आपल्या नात्याला बहुतेक विसरला आहेसं वरूण ", असे मिहिका मनांतल्या मनांत म्हणाली. तेव्हा तिला असे शांंत पाहून वरूण म्हणाला," कायं झालं..?? ", तेव्हा मिहिका म्हणाली, "काही नाही.. तुला काही हवयं का?? ", तेव्हा वरूण म्हणाला," हो.. थोडी कॉफी हवी आहे. खूप कामं झालं ना आजं सो.. ", त्यावर मिहिका म्हणाली, "ओके.. मी करते तुझ्यासाठी कॉफी", तेव्हा वरूण म्हणाला," म्हणजे तुला नकोयं?", त्यावर मिहिका म्हणाली," मी घेतली थोड्या वेळापूर्वीच.. तुझा कॉल चालू असेल, तुला डिस्टर्ब नको सो मी तुला नाही विचारले. ", तेव्हा वरूण म्हणाला," ओह्ह.. मगं राहू दे.. ऐक आ आजं कॉल मध्ये क्लायंट ने फायनल केली डील ", वरूण पुढे बोलणार ईतक्यातं मिहिका म्हणाली, "ओह्ह.. गुड.. मी कॉफी करते, मगं आपण बोलू ", असे म्हणून ती स्वयंपाकघरात गेली.
कॉफी तर एक निमित्त होते आजपण. गेले दोन वर्षे मिहिका आणि वरूण मध्ये जो संवाद व्हायचा तो एकतर्फी होता. सुरूवातीला ती वरूण च ऐकायची पण नंतर मात्र तिला खूप कंटाळा आला की ती असचं काहीतरी काम काढून पळ काढायची. आजं ही असेचं केले तिने. ती स्वयंपाकघरात कॉफी बनवत होती, वरूण तिथे पाणी प्यायला आला तेव्हा पाणी पिताना त्याचे लक्ष मिहिकाकडे गेले. आजं ती काही वेगळी चं दिसत होती. एक तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. ती कॉफी बनवतं होती. तिने वरूण कडे पाहिले एकदा आणि पुन्हा कॉफी बनवण्यांत मग्न झाली. "मिहिका शांत झाली आहे का?? ती काही फार बोलत नाही", असा प्रश्न वरूण च्या मनाला जागे करून गेला. कदाचितं या शांततेने वरूण चे लक्ष मिहिकाकडे वळवले होते. "हे घे..", या आवाजाने त्याने समोर पाहिले. मिहिका कॉफी चा मगं घेऊन उभी होती. त्याच्या हातांत मगं देऊन ती पुन्हा बेडरुम मध्ये गेली आणि बाल्कनी मध्ये उभी राहिली. तिच्या पाठोपाठ वरूण पण बाल्कनी मध्ये आला.त्याला असे पाहून मिहिका म्हणाली, " तु इथे?? अजून काही हवयं का? तुझं काम ", त्यावर वरूण म्हणाला, "नो.. काम झालं.. सिरियसली अगं आपल्याला काम आहे सो किती बर आहे ना, ज्या लोकांना सुट्टी आहे ते किती बोअर्ड झाले असतील या लॉकडाऊन मध्ये", तेव्हा मिहिका फक्त, "ह्म्म्म..", म्हणाली आणि पुन्हा ती त्या नभामध्ये काहीतरी न्याहाळतं उभी राहिली. वरूण एकटक तिच्याकडे पाहतं होता, तेव्हा त्याला मिहिका च्या चेहर्यावर आजं एक वेगळेचं तेज दिसले. न रहावून वरूण म्हणाला," मिहिका तु काही केले आहेसं का आजं..??", त्यावर मिहिका म्हणाली," म्हणजे??", वरूण म्हणाला, "नाही तु आजं खूप वेगळी चं दिसतं आहेसं,सो विचारले..", त्यावर मिहिका म्हणाली,"ओह्ह... म्हणजे तु रोजं मला पहातोसं का?", त्यावर वरूण म्हणाला, "म्हणजे?? कमॉन ईथे आपण दोघे चं रहातो, सो मी तुला पाहणार चं ना.. हा कायं स्टुपिड प्रश्न आहे..", तेव्हा मिहिका म्हणाली," रोज मला पाहंत असता, तर किती छान झाले असते..", वरूण म्हणाला," म्हणजे..?? ", तेव्हा मिहिका म्हणाली, "काही नाही..", आणि ती पुन्हा शांत झाली. तेव्हा वरूण म्हणाला," यार हे लॉकडाऊन संपायला हवयं?? कंटाळा आलायं घरात बसून?? तुला कायं वाटतयं मिहिका?", त्यावर मिहिका म्हणाली," मला तर हे लॉकडाऊन अजून संपू नये असेचं वाटतेयं ", तेव्हा मिहिकाकडे आश्चर्याने पाहंत वरूण म्हणाला, "what?? तू असे काहीतरी मुर्खासारखे कायं बोलते आहेसं? तुझी झोप नाही झाली का??", तेव्हा हसतं हसतं मिहिका म्हणाली, "ईतके दिवस झोपले चं होते, आजं जागी झाले आहे.", न समजून वरूण म्हणाला, "प्लीज क्लीअर बोल गं.. उगीचच लेखकांसारखे काहीतरी बरळू नकोस.. या लॉकडाऊन मध्ये कायं आहे आवडण्यासारखे? ", तेव्हा मिहिका म्हणाली," खरयं.. या लॉकडाऊन मध्ये तसे काही नाही आवडण्यासारखे पण हे चं बघं ना या लॉकडाऊन मुळे आपल्या मध्ये १५ मिनिटांच्या वर आजं काहीतरी संवाद घडला.. एकाचं घरात राहून दोन दिशांना पाहणारे आपण आज एकत्र मावळतीचा सूर्य पाहंत आहेतं..Isn't it Strange...??", हे ऐकून वरूण चा चेहरा थोडा वरमला. तो काही बोलणार इतक्यातं मिहिका त्याला म्हणाली," वरूण.. It's OK.. Explaination ची गरजं नाही. मला ही आजं दीड महिन्यानंतर गवसले अर्थात सुट्टी मिळाली म्हणून, नाहीतर मला माझी हरवलेली मी, माझा आनंद उमजला नसता. ", आता मात्र मिहिका चे हे पुस्तकी बोल ऐकून वरूण चांगला चं वैतागला आणि थोड्याशा रागातं चं बोलला,"मिहिका... प्लीज यार.. मला कळेल अशी भाषा बोल.. ", तेव्हा वरूण ला असे रागांत पाहून मिहिका म्हणाली," अरे काही नाही.. आजं खूप जवळपास पाच वर्षांनी गिटार हातांत घेतली मी, आजं पाच वर्षांनी ती तार छेडली, त्यामुळे खूप आनंदी आहे. म्हणून पाच वर्षांपूर्वी हरवलेली मी, मला आज गवसली, असे म्हटले.. ", मिहिका चे हे बोलणे ऐकून वरूण मात्र हसला आणि म्हटला, "मिहिका, हे खूप अती आहे हं... पाच वर्षे... अगं आपल्या बेडरूम मध्ये चं आहे ही अगदी आपलं लग्न झालं तेव्हापासून, आपण आई बाबांकडे होतो तेव्हाही आणि आता ही ती बेडरूम मध्ये चं आहे.
एका बाजूला असले तरी रोजं दिसते चं थोडे बघितले तरी.. आणि म्हणे पाच वर्षे.. उगीचचं काहीही बोलायचे. लग्नानंतर तू कितीतरी वेळा ती तार छेडली आहेसं मिहिका, आम्ही तुझे गाणे कितीतरी वेळा ऐकले. म्हणजे मीच तसे प्रोमिस मागितले होते तुला.. सो पाच वर्षे झाली हे मला तरी पटतं नाही. ", वरूण चे हे बोलणे ऐकून आता मात्र मिहिका च्या शांततेचा बांध तुटला. तेव्हा मिहिका त्याला म्हणाली," अरे व्वा... प्रोमिस अगदी लक्षात आहे. राहणारं चं न तु बिझनेस मॅन आहेसं शेवटी,शब्दं आणि व्यवहार लक्षांत चं ठेवणार. अगदी बरोबर आहे तुझं, ही गिटार नजरेसमोर चं होती फक्त एक सांग मला, तु माझे गाणे शेवटचे कधी ऐकले??", मिहिका चा हा बदलता सूर पाहून वरूण ने एक कटाक्ष टाकला तिच्याकडे, आणि आठवू लागला. साधारण पाच मिनिटे झाली असतील.वरूण शांत उभा होता. वरूण ला असे पाहून मिहिका म्हणाली, " thank you..!! आजं तुझ्या शांततेने चं मला हे उत्तर दिले." त्यावर वरूण म्हणाला, "ठीक आहे, मला आता आठवतं नसेल, आजं थकलोयं जरा म्हणून, पण पाच वर्ष हे पटतं चं नाही मला अजून.तु ईथेच होती. तुला कायं वेळ होता चं की.. तु कधीही तार छेडू शकतं होतीस... ", वरूण चे हे बोलणे ऐकून मात्र मिहिका चा पारा चढला, जणू आजं तिच्या मनाने ठरवले चं होते ईतके दिवस साचलेले सगळे मोकळे करायचे, ती बोलू लागली,"हो.. खरंय तुझं.. तुला कामं होते,तुला परदेशी दौरे होते, तुला कंपनी, कंपनीचे प्रॉब्लेम सांभाळायचे होते,मला कायं वेळ चं होता. पण एका प्रश्नाचे उत्तर देशील?", तेव्हा वरूण म्हणाला, "कोणता प्रश्न..?", तेव्हा मिहिका म्हणाली, "मला वेळ चं होता. रोजं आँफिस, घरची कामे करताना, आई बाबांची काळजी घेताना, गार्गीचा अभ्यास घेताना, तुझे परदेशी दौरे असताना घर सांभाळून, इकडे कंपनी आणि माझी नोकरी करताना मी गिटारवर तार छेडायची होती का?? की तुझे माझे काम वाढल्यावर तुझे आपल्या नात्याकडे, माझ्याकडे दुर्लक्ष असताना ही तुला समजून घेताना, स्वतःचा राग केवळ आपल्या घरच्यांना यातना होऊ नये म्हणून आतल्या आत गिळताना मी तार छेडायची होती??की,आपल्या मधला संवाद संपल्यानंतर केवळ तुझे ऐकून घेताना, तू दूर असताना मला होणारा सगळा त्रास सहन करत घर सांभाळून काम करताना, तुझ्याकडून थोड्या प्रेमाची अपेक्षा केलेल्या मनाचा अपेक्षाभंग झाल्यावर शांत बसताना, की सभोवताली माणसांची गर्दी असूनही एकटेपणांत जगताना, की हे सगळे टाळण्यासाठी कामांत गुंतवून घेताना मी तार छेडायची होती गिटारवर? ",
इतके वर्षे मनांत साठलेला हा राग व्यक्त करून, एवढे बोलून मिहिका शांत झाली. तिच्या डोळ्यात आपोआप बोलताना आसवे तरळली होती. कधीतरी हा भावनांचा उद्रेक होणार चं होता, आणि तो दिवस आजचा होता. मिहिका तर शांत झाली होती एवढे बोलून, पण मिहिका चे हे बोल वरूण च्या मनांवर टोचणी मारून गेले होते. मिहिका च्या डोळ्यातील आसवे त्याला अपराधीपणाची भावना देतं होती सतत. तिच्या डोळ्यातील ती आसवे पाहून त्याने ती पुसायचा प्रयत्न केला, पण मिहिकाने हात झटकला त्याचा. तेव्हा वरूण ने तिला ओढून आपल्या मिठीमध्ये घेतले, त्या मिठीचा स्पर्श झाल्यावर मात्र मिहिका नाही सावरू शकली, नाही सोडवू शकली स्वतःला त्याच्यापासून आणि तिचा बांध आता आणखी चं सुटला. ती अजून रडतं होती. यावेळी तिचे अश्रू एकटे नव्हते मात्र. मिहिका सोबत वरूण च्या ही डोळ्यातून अश्रू वाहंत होते. कितीतरी वेळ ते दोघे काहीचं न बोलता एकमेकांच्या मिठीतं होते फक्त. मिहिका चे अश्रू जणू आजं थांबायचे नाव चं घेतं नव्हते, तेव्हा वरूण म्हणाला,
"आज मनसोक्त रडून घे गं.. खूप दिवसांनी आजं तुझ्या प्रियकराची, तुझ्या नवर्याची ही मिठी तुला मिळाली आहे.", असे म्हणतं तो तिच्या डोक्यावरून हातं कुरवाळतं म्हटला की,"मी एवढा कसा बदललो गं?? आपल्यामध्ये वादं होतं होते, काहीतरी बिनंसलं आहे तुझं हे मला कळत होतं गं, पण मी कामाच्या ईतका आहारी गेलो की तुला प्रत्येक वेळी गृहीत धरले. मी आपल्यासाठी चं करतोयं, हे धरून मी कामांत व्यग्र झालो आणि मगं सतत मिळणार्या यशामुळे मला पैसा मिळवायची नशा चं चढली. मगं दिवसरात्र फक्त काम चं दिसायचे. मी सगळे विसरून गेलो होतो कदाचितं, आणि त्यामुळे तुझा हा त्रास, तुझी ओढाताण मला कधी कळली चं नाही. तुला न समजून घेता मी उगीचचं तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आणि मगं आपला दुरावा अजून चं वाढला. मला आता कळतयं गं आपल्या आनंदासाठी पैसा मिळवत जाताना, मी आपल्या जगण्यातला आनंद, तुझं प्रेम, हरवून बसलो. मला माफ कर गं ",
असे म्हणून तो ही मिहिकासोबत रडू लागला. तेव्हा मिहिका म्हणाली," ठीक आहे. तुला आज कळले हे चं खूप आहे. वरूण मला ही तुझं काम, तुझी धडपड वगैरे लक्षात यायचं रे पण माझी ही खूप ओढाताण व्हायची आणि जेव्हा मला तुझ्याशी बोलायचे असायचे, तेव्हा एकतर तु नसायचा किंवा असलास तरी, तुला तुझे चं बोलायचे असायचे. मगं माझा ही गैरसमज वाढला. आपल्याला वेळ नव्हता, आणि हे चं आपल्या अबोला वाढण्याचे आणि दुरावा वाढण्याचे खरे कारण होते. कुठेतरी माझा ही ईगो आडं आला. मी ही हळू हळू बदलले, शांत झाले. आजं गिटार हातांत आल्यानंतर मला हे कळले. सार्या प्रश्नांची जणू उत्तरे मिळाली. ",
हे ऐकताच वरूणने मिहिकाला आपल्या मिठीमधून थोडे दूर केले. अलगदं तिचे डोळे पुसले आणि म्हणाला," मिहिका मी प्रोमिस तर मागितले तुला, पण तुझ्याकडे कधी हट्ट नाही केला, तु कामाचा व्यापात ते पूर्ण नाही करू शकली, पण मी ही तुला कधी आठवण नाही करून दिली हक्काने. माझ्या दुर्लक्ष करण्याने तुझे काम वाढले आणि म्हणूनच तुला वेळ नाही मिळाला तुझी ही आवडं जपण्यासाठी. Am Really Sorry ", तेव्हा मिहिका म्हणाली," फक्त तुझी चं नाही रे चुक. ही गिटार माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती. माझी सावली होती, पण कुठेतरी या जगण्याच्या शर्यतीत पुढे राहताना मी ईतकी पुढे धावतं होते की, माझ्या सावली ने सुद्धा माझी साथ सोडली. ही गिटार सतत समोर चं चं होती, पण कदाचितं त्यावेळेस डोळ्यांवर चं खूप धूळ होती. आज घरासोबत ती डोळयांवर ची धूळ सुद्धा साफ झाली. ", मिहिका चे हे बोलणे ऐकून वरूण म्हणाला," ह्म्म खरयं गं..आपण अलिकडे जीवन एखादा चित्रपट फास्ट फॉरवर्ड मध्ये बघतो, तसेचं जगतं आहोतं, त्या चित्रपटाला ही interval असतो हे आपण विसरून चं जातो.मला ही आता हा लॉकडाऊन हवाहवासा वाटतोयं. कदाचित आपल्या सगळ्यांच्या फास्ट फॉरवर्ड जगण्याला या interval ची गरजं होती, आणि हे आपल्याला आजं दीड महिन्यानंतर कळले ", असे म्हणून वरूण हसला, तेव्हा मिहिका त्याला म्हणाली," देर आए दुरूस्त आए.. ", असे म्हणतं दोघेही खूप हसले. आजं दोघांनी ही एकमेकांना कितीही कामं असले तरी वेळ देण्याचं प्रोमिस दिलं. आजं ते घर ही त्यांच्या सोबत हसतं होते. एरवी शांत असणारा तो डायनिंग टेबल आजं त्यांच्या गप्पांनी आणि प्रेमाने बहरला होता.जेवण झाल्यावर त्यांनी गप्पा मारल्या खपू. नंतर वरूण ने दोघांसाठी कॉफी बनवली. कॉफी पितं ते बाल्कनी मध्ये उभे असताना वरूण म्हणाला,
"मिहू कितीही कामं असू दे. तु आता गिटार सोबत पुन्हा असा दुरावा कधीही नको ठेवू. या लॉकडाऊन मध्ये मला आता रोजं गाणं ऐकायचं आहे. जे निसटून गेलं होतं ते सारं परत मिळवायचं आहे. आणि त्याची सुरुवातं आता कर एक छान गाणं म्हणतं",
खूप दिवसांनी, "मिहू", हे नाव ऐकून मिहिका चा चेहरा अजून चं खुलला.
" लग जा गले की फिर
ये हसीं रात हो ना हो.. ",
असे म्हणतं ती वरूण च्या मिठीमध्ये विसावली. आजं मिहिकाने छेडलेली ही तार तिच्या आणि वरूण च्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची तार छेडून गेली हे मात्र नक्की.
खरेतरं या लॉकडाऊनने मिहिका आणि वरूण सारखे चं अजून कितीतरी नात्यांत नवी बहर आणली आहे. जे सुटले होते, ते परत वेचण्यासाठी एक संधी दिली आहे. हे लॉकडाऊन संपायला चं हवे, हे खरे चं आहे, पण या लॉकडाऊन कडे वेगळया दृष्टीने पाहिले तर, मिहिका आणि वरूण सारखा चं जगण्यात हरवलेला खरा आनंद तुम्हाला ही मिळेल.

