Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

नात्यांच्या रोषणाईत दिवाळी

नात्यांच्या रोषणाईत दिवाळी

1 min
324


" उठा उठा दिवाळी आली

 मोती स्नानाची वेळ झाली..! ",


       टीव्हीवर साधारणतः एक आठवड्यापूर्वी अशी जाहिरात सुरू झाली की दिवाळीची चाहूल लागते. सगळा आसमंत पणत्यांच्या रोषणाईत सजून येतो.

दारावर कंदिल आणि अंगणी रांगोळी सणाची शोभा वाढवते. एक प्रकारचा उत्साह आणि एक वेगळा चं आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर पहायला मिळतो,

आपल्या सणांची हीचं खासियत असते नाही का? म्हणजे रोजच्या जीवनात कितीही दुःख असू दे, परंतु या दुःखाला विसरून आनंद साजरा करायचं एक कारण देतात आपले सण.


गेल्या दोन वर्षांपासून आपल्या आजूबाजूला एवढे काही घडतं असताना या आपल्या सणांनीच तर आपल्या चेहर्‍यावर हसू फुलवले आहे, मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये दिवाळीच्या या रोषणाईत घरासोबत चं नाती ही नव्याने उजळून आली आहेतं. कोरोनाच्या या ताणतणावाच्या वातावरणात आपल्याला नात्यांची खरी किंमत लक्षात आली आहे. त्यामुळे एरवी दिवाळी आली असे वाटणारे सारे काही आजूबाजूला असले म्हणजे, 

घरोघरी असलेली पणत्यांची आरास,

दारांवर सजलेले आकाशदिवे, 

लख्ख प्रकाशातं उजळलेले आसमंत,

घरोघरी सुटलेला फराळाचा घमघमाट,

फटाक्यांची आतषबाजी,

  

       हे सगळे सगळे असले तरीही आपल्या जीवाभावाचे लोक, आपल्या आयुष्यातं असलेली नाती या सगळ्यापुढे हे सगळे फिके वाटू लागते आहे अलीकडे. दिवाळीला खरी शोभा जरी दिव्याचा लख्ख प्रकाश, फराळ, फटाके यांमुळे येत असली तरीही दिवाळीला आपल्याला खरा आनंद देऊ जातातं आपण आपला सणांचा आनंद ज्यांच्यासोबतीने साजरा करतो ती नाती. म्हणूनच या दिवाळीला आपल्या नात्यांना अजून जपू या,

रूसवे फुगवे दूर करून नात्यांमध्ये गोडवा रूजवू या, 

नव्याने काही नाती जोडून या दिवाळीला नात्यांच्या रोषणाईत आपले आयुष्य उजळवू या.


Rate this content
Log in