Rutuja kulkarni

Romance

3  

Rutuja kulkarni

Romance

व्यक्त व्हायला हवे

व्यक्त व्हायला हवे

2 mins
264


कपाटामधून आॅफिस च्या जुन्या फाईल्स बाहेर काढल्या आणि त्या चाळत असताना चं त्या मधून एक पत्र खाली पडले. ते तुझे पत्र होते हे कळायला फारसा वेळ नाही लागला अर्थात. थोडेसे चुरगळले होते आणि अक्षरांवर धुळीने थोडी सजावट केली होती खरी, पण तु शिंपडलेल्या अत्तराचा तो सुवास इतक्या वर्षानीं ही मला माझ्या सभोवती दरवळताना जाणवतोय. किती सहजतेने तु तुझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यावेळी या एका पत्रामधून आणि पुढे ही तु वेळोवेळी प्रत्यक्ष ही व्यक्त व्हायचा कित्येकदा. खरे सांगू मला मात्र तुझं कौतुक वाटायच तेव्हा. किती सहजतेने तु मनातले बोलायचा प्रत्येक वेळी, मला मात्र ते कधीच जमले नाही. खरेतरं आपल्या प्रत्येक भेटीचे असंख्य कल्पित मनोरे मी मनात साठवले होते, पण तु समोर यायचा तेव्हा मात्र मी स्तब्ध व्हायचे नेहमी, अगदी त्या दिवशी ही जेव्हा तु मला पत्राचे उत्तर ऐकण्यासाठी बोलावले होते तेव्हा ही मी निःशब्द राहिले.


तु समोर असताना हे असचं व्हायच, 

शब्दांनी मौन धरायच,

आणि मी निःशब्द व्हायच...


   तुला माझ्या मौनातील होकाराची आणि मला प्रेमातील व्यक्त व्हायची भाषा खूप उशीरा समजली नाही का???

     प्रेमातल्या अबोल नजरेची मला ओळख होती आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे नजरेचा संवाद होता फक्त, पण तु मला प्रेमाची एक नवी ओळख करून दिली. तु मला प्रेमातील भाषा शिकवली. आणि व्यक्त व्हायला ही , कुठेतरी मला मात्र ते उशीरा उमगले याची जाणीव होतेय आज. तुझ्या पत्राचे तु उत्तर मागितले, तेव्हा होकार द्यायला हवा होता मी तुला, पण मला जमले च नाही रे त्यावेळी. तु ही माझे अबोल प्रेम समजून घ्यायचा कुठे प्रयत्न केला त्यावेळी. प्रेम करणे जितके अवघड असते, त्याहून अधिक प्रेमात व्यक्त होणे अवघड असते कधी कधी. आणि हे व्यक्त होणे किती महत्त्वाचे असते याची आज प्रचिती होतेय कुठेतरी. ते आजकाल, 'प्रप्रोज डे', च्या वेळी जेव्हा प्रेम व्यक्त करणारे असंख्य लोक पहाते, तेव्हा नेहमी वाटते की, मला वाटायचे त्या पेक्षा एवढे ही अवघड नसते व्यक्त होणे. मुळात अवघड आणि सोपे या पलिकडे ही प्रेमात व्यक्त होणे ही गरजेचे असते, हे तु आयुष्यातून गेल्यावर उमगले.


आयुष्यात प्रेम करायला हवं..

मनातलं गुपित ओठांवर आणायला हवं, 

अबोल भावनांना मोकळं करायला हवं, 

प्रेमात कधी कधी व्यक्त ही व्हायला हवं... 


      तुझ्या आठवांसवे, आज मिळालेले हे तुझे पत्र माझ्याजवळ आहे, आणि त्याचा सुवास मला अजूनही आजसारखा नेहमीच आपल्यातील त्या अव्यक्त प्रेमाचा सुगंध देत राहील हे नक्की...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance