Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

4 mins
235


मे महिन्यात उन्हाची दाहकता इतकी प्रचंड जाणवते की, जून महिना अजून सुरू होतोयं तोपर्यंत चं पावसाच्या आगमनाची हुरहुर लागून राहिलेली असते मनाला. हा पाऊस असतोचं म्हणा असा, मुळात सर्वांना वेडं लावणारा. सर्वांना सुखावून जाणारा असा. पाऊस आपल्याला कायं कायं देऊन जातो याचे मोजमाप करणे जरा अवघड आहे, परंतु पाऊस आपल्याला कायं देऊन जातो हे विचारले की प्रकर्षाने एकचं उत्तर समोर येते ते म्हणजे आठवण. हो पाऊस आपल्याला आठवण देऊन जातो आणि मगं आयुष्याच्या नोंदींमध्ये तो पाऊस आठवणीतला पाऊस होऊन जातो.


          माझ्या आयुष्याच्या कोर्‍या कागदावरं असे आठवणीतले दोन - तीन पाऊस आहेत जे कायम मला नोंद घ्यायला भागं पाडतातं पावसाची. त्यापैकी माझ्या आठवणीतला एक पाऊस म्हणजे शाळेमधला तो पाऊस.


मी नुकतीचं पाचवी इयत्तेत गेले असेल तेव्हा. सगळे कसे नवे अगदी शाळा, वातावरण आणि या नवखेपणात खूप कावरी बावरी झाले होते मी एकदम. १५ जून ला शाळा सुरू झाली आणि एव्हाना एक आठवडा झाला होता शाळा सुरू होऊन देखील. फार कोणाशी ओळख ही नीटशी झाली नव्हती मगं मैत्री तर दूरच. अशातच त्या दिवशी शाळा सुटण्याची वेळ आणि त्या पावसाची वेळ एकदम जुळून आली. आणि मगं शाळेमध्ये एकचं कल्ला सुरू झाला एकदम. आडोसा पाहून सगळ्यांची शाळेच्या आसपास गर्दी सुरू झाली आणि बस, रिक्षा येईल तसे एकेकजण घरी जात होते तर काही आपल्या आई वडीलांसोबत घरी जात होते.


त्या सगळ्यांसोबत मी ही एका कोपऱ्यात उभी होते मला न्यायला येणाऱ्या रिक्षेची वाटं पाहतं. आम्ही काहीजण चं वाटं पहातं उभे होतो आता. तितक्यात पावसाचा जोर असा काही वाढला की इथे भिजले जाऊ या भितीने नुसती पुन्हा एकदा आडोश्याला उभे राहण्यासाठी पळापळ सुरू झाली. त्या उरलेल्या सगळ्यांसोबत मी ही धावत होते इतक्यात माझ्या पायातले शाळेचे बुट तेथे जमलेल्या चिखलात अडकले आणि मी पावसात भिजायला लागले तेव्हा अचानक माझ्या खांद्याला ओढून कोणीतरी मला त्या चिखलातून बाहेर खेचले आणि, "तु बरी आहेस ना? ",

असे विचारले. समोर माझ्या चं वयाची एक मुलगी उभी होती, तेव्हा तिला पाहून मी, "हो बरी आहे मी एवढेचं म्हणून थँक्स म्हटले तिला.",त्यावेळी थँक्स म्हणायला नुकतेचं शिकलेलो ना म्हणून. तेव्हा ती मला म्हणाली,


"अगं आपण एकाचं वर्गामध्ये आहोत. मी पाहिले तुला. ",त्यानंतर मी तिला किचिंतसे हसून, "अच्छा मी पाहिले नव्हते असे म्हटले", त्यावर ती ही," "असू दे आपण नवीन चं आलोयं आता अजून एक आठवडा चं झाला ", असे म्हटली. आणि मगं या नंतर तिचे एकावर एक प्रश्न सुरू राहिले मी उत्तर देतं राहिले. यामध्ये आम्ही पावसांत भिजतोयं याचे ही भान उरले नव्हते मला.


    रिक्षेवाल्या काकांनी हॉर्न वाजवला तशी मी भानावर आले आणि रिक्षा आल्याचे लक्षात येताच तिला मी तसे सांगितले आणि पुन्हा एकदा आभार मानून मी निघण्यासाठी वळणार तेव्हा तिला, "ती घरी कशी जाणार हे विचारले",


  तेव्हा समोरून येणाऱ्या रिक्षाकडे बोटं दाखवतं ती म्हणाली, "माझा ही रिक्षा आला. उद्या भेटु.", असे म्हणून ती रिक्षात बसली देखील, आणि मगं मी ही रिक्षामध्ये बसले माझ्या. तिच्याशी बोलल्या पासून सतत काहीतरी नातं आहे असचं जाणवतं होतं. एकमेकांच्या नावाशिवाय त्या दिवशी आम्ही दोघी बाकी सगळे बोललो होतो.


दुसर्‍या दिवशी मात्र मी शाळेत गेल्या गेल्या आधी तिचे नाव विचारले आणि मगं पुन्हा आमच्या तासिका सुरू होईपर्यंत गप्पा सुरू राहिल्या आणि काल पावसात भिजल्यामुळे घरी कसा ओरडा खावा लागला याबद्दल बोलून आम्ही हसू लागलो. त्यानंतर पुन्हा आम्ही दोघी कितीतरी पावसांत भिजलो आणि अगदी आज ही भिजतो पण त्या दिवशी चा तो पाऊस काहीसा विलक्षण होता. आमच्या दोघींच्या रिक्षा उशीरा येणे आणि आमच्या गप्पा होणे, पावसात भिजणे हे सगळे एखाद्या जादू पेक्षा ही कमी नव्हते. आजपर्यंत असे कितीतरी पाऊस झाले आमचे एकत्र भिजण्याचे, पण तो पाऊस खास होता कारण त्या दिवशी फक्त पावसांत नाही तर, 'मैत्री', नावाच्या पावसांत आम्ही भिजलो आयुष्यभरासाठी. आणि तो पाऊस खास ठरला म्हणून चं. असं म्हणतातं शाळेमध्ये असताना केलेली मैत्री आयुष्यभर साथ देते. आणि हे अगदी खरे आहे कारण त्यानंतर आम्ही आजपर्यंत पावसांत भिजतं आहोतं दोघीही. मगं कधी तो पाऊस आमच्या सुख - दुःखाचा पाऊस ही असतो, तर कधी आमच्या मैत्रीतील आठवणींचा असतो. 


          आजही एक पाऊस बरसतोयं असाचं. आजही पुन्हा मैत्रीत भिजल्याचा भास होतोय कारण आज तोचं दिवस आहे ज्या दिवशी या मैत्री नावाची सर मला चिंब भिजवून गेली होती. मी मात्र डायरी मध्ये ते लिहून ठेवलेले क्षण पुन्हा आठवायचा प्रयत्न करतेयं तिच्यासोबत. फरक फक्त इतकाचं आहे की, ती तिच्या घरी राहून हा पाऊस बघतेय आणि मी माझ्या घरी राहून. पण आमचं फोन वरून सध्या चालू असलेले बोलणे आम्हाला एकत्र असल्याचा भास देतेयं. हा पाऊस आम्हाला, त्या आठवणीतल्या पावसाची पुन्हा आठवण देतोय आज!


Rate this content
Log in