STORYMIRROR

Rutuja kulkarni

Drama Romance

3  

Rutuja kulkarni

Drama Romance

छेडल्या तारा :भाग 3

छेडल्या तारा :भाग 3

4 mins
389

ही कथा वरूण आणि मिहिका या दोन प्रेमी युगुलांची /जोडप्यांची आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाले आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक आमुलाग्र बदल घडला.

असाच काहीसा बदल हा मिहिका आणि वरूण च्या आयुष्यात ही घडून आला. त्यांचे गुंतलेले धागेदोरे कसे सुटले आणि त्यांची नव्याने एक एक गाठ कशी विणली गेली पुन्हा हे या कथेत पहायला मिळेल. लॉकडाऊन ची एक छोटीशी प्रेमकथा


"मिहिका.. मिहिका..",

  हा आवाज ऐकतांच भूतकाळात हरवलेली मिहिका अचानक भानावर आली आणि तिने मागे वळून पाहिले.

क्रमशः 

  

   मागे वरूण उभा होता. मिहिका त्याला पाहून म्हणाली,

" वरूण.. हे बघं ना मला कायं दिसलं ते..माझी गिटार..! ",

  त्यावर वरूण म्हणाला,

"मिहिका.. मला दिसतंय, माझी दृष्टी नाही गेली. आपल्या रूम मध्ये चं आहे ही. कित्येकदा दिसते, फार काही मोठा खजिना सापडला आहे असे रिएक्ट नको करू प्लीज..anyway तुला ऐकू येतं नाही का गं कधीचा आवाज देतोयं मी..?माझी सिंगापूर ची फाईल दे, कॉल चालू आहे हरी अप",

   हे ऐकताचं मिहिका हातांमधील ती गिटार खाली ठेवून उठली आणि तिने कपाटातील ती फाईल काढून वरूण च्या हातांमध्ये दिली.

  फाईल घेऊन वरूण दुसर्‍या बेडरुम मध्ये गेला निघून. ईकडे मिहिकाने ती गिटार व्यवस्थित आहे त्या ठिकाणी ठेवली व पुन्हा ती राहिलेली साफसफाई करण्यांत मग्न झाली निर्विकार चेहरा घेऊन. जणू तिला हे सवयीचे चं झाले होते. सगळी साफसफाई करून मिहिका पाचं मिनिटं बेडवर बसली, पण मनांतले विचार काही तिला स्वस्थ बसू देतं नव्हते. मगं सतत च्या या प्रश्नांना टाळण्यासाठी तिने नेहमीप्रमाणे अंघोळ केली डोक्यावरून. सर्व विचारांवर तिने पाणी सोडले पुन्हा. अंघोळीनंतर मिहिका आणि वरूण ने जेवण केले, पण दोघांनीही एकमेकांशी एक शब्दं न बोलता. जेवण झाल्यावर वरूण परत त्याचा लॅपटॉप घेऊन बेडरुम मध्ये निघून गेला आणि मिहिका ही आवराआवर करून बेडरुम मध्ये गेली,थोडी विश्रांती घ्यावी या विचाराने, पण आजं तिला काही केल्या झोप लागतं नव्हती. मनांत तिला सतत काहीतरी सल जाणवत होती. कधी नाही ते एवढे अस्वस्थ झाली होती मिहिका आजं,म्हणून चं लक्ष वळवण्यासाठी तिने मोबाईल हातांमध्ये घेऊन what's up वरचे मेसेजेस पहांत बसली. पण तिला आजं त्या मेसेज ना रिप्लाय द्यायची ही ईच्छा होतं नव्हती. म्हणून मगं ती उठून बसली. तेव्हा समोरच्या भिंतीवर असलेल्या लग्नाचा फोटो पाहून ती पुन्हा विचारांत हरवली.आणि तिला तो पारिवारिक भेटीचा दिवस आठवला.

  मिहिका आणि वरूण दोघेही एकमेकांच्या नजरेतं हरवले होते. तेव्हा, "दादा.. दादा", या हाकेने दोघेही थोडे कावरेबावरे होतं पाहू लागले. ती वरूण ची लहान बहीण गार्गी होती. दोघांना ही असे कावरेबावरे झालेले पाहून त्यांचे घरचे सगळे हसतं होते आणि ईकडे मिहिका आणि वरूण मात्र लाजून चूर झाले होते. तेवढ्यात गार्गी वरूण ला म्हणाली, "ए दादा मी हिला वहिणी म्हणू की मिहिका म्हणू?", 

 त्यावेळी वरूण आणि मिहिका एकमेकांकडे पहातांत आणि एकदा घरच्यांकडे. तेव्हा मिहिका ची आई म्हणते, "अरे असे कायं पाहतायं.. आम्हाला हे लग्न मान्य आहे.", 

   खरोखर किती खूष होते सगळे चं. पारिवारिक भेटीमध्ये दोघांच्या ही घरच्यांनी लग्नाच्या निर्णयाला संमती देणे आणि लगेचचं सहा महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरणे, खरचं स्वप्नवतं होते हे सर्व. मिहिका आणि वरूण दोघेही त्यांच्या आयुष्यातील हा काळ खूप आनंदाने जगतं होते. याचं काळातं वरूण ची कंपनी ही वरचेवर यशाची उत्तुंग शिखरे गाठतं होती. असेचं दिवसभर कामं आणि मगं त्यानंतर लग्नाची शॉपिंग यामध्ये दिवस ईतके भुर्रकन उडून गेले आणि दोघांच्या ही लग्नाचा दिवस कसा उजाडला ते दोघांना ही कळले नव्हते. सगळ्यांच्या उपस्थित दोघांचे लग्न झाले. आज त्यांच्या प्रेमाची गोष्ट जणू पूर्ण झाली होती. दोघांचा एकत्र असा एक प्रवास सुरू झाला होता. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवसी रिसेप्शन ला जेव्हा सगळे आलेले तेवह मिहिका ने वरूण च्या आणि त्याच्या घरच्यांच्या आग्रहाने, 

   "तू मिले दिल खिले,

   और जीने को क्या चाहिए.. "

हे वरूण आणि तिच्या आवडीचे गाणे म्हणतं गिटार वर तार छेडली पुन्हा. त्या दिवशी सगळ्यांनी खूप सुंदर दादं दिली आणि वरूण ने तर सगळ्यांसमोर तिच्या हाताचे चुंबन घेऊन, "वाहह..", अशी दादं दिली तेव्हा मिहिका लाजून गोरीमोरी झाली होती.

रिसेप्शन झाल्यावर वरूण आणि मिहिका घरी आले. मिहिका वरूण च्या त्या छोट्याश्या बेडरूम मध्ये आपल्या बँगमधील काही सामान काढून ठेवतं होती. वरूण चे घर फार काही मोठे नव्हते आणि अगदी लहान देखील. मिहिका ची सामानाची आवराआवर चालू असताना तो तिथे आला आणि म्हणाला,

"मिहू.. गाणं खूप सुंदर म्हटलं गं आजं. मला आपली पहिली भेटं आठवली.",

  तेव्हा न रहावून मिहिका म्हटली, "खूप प्रेम ओतु जातयं आजं..!! तु तर आजं अगदी पहिल्यांदा चं ऐकल्यासारखे रिएक्ट करतं आहेसं.",

तेव्हा वरूण म्हणाला, "हो पहिल्यांदा नाही ऐकले हे खरे आहे पण आजं कदाचितं आपल्या प्रेमाच्या पूर्णत्वाचा रंग चढला होता म्हणून खूप भावलं. आजं गिटारसोबत तु पुन्हा माझ्या हृदयाची तार छेडली. ए मिहू एक प्रॉमिस करशील? ",

 मिहिका म्हणाली," कुठलं प्रॉमिस?? बोल ना??",

  तेव्हा वरूण म्हणाला," मिहू.. तु लग्नानंतर तुझं हे गाणं कधीचं सोडणार नाहीसं. आणि रोजं काही नाही पण आठवड्यामधून एकदा तुझं हे गाणं ऐकवशील ",

  तेव्हा मिहिका हसली आणि म्हटली," हो रे.. वरूण हे गाणं आणि ही गिटार लहानपणापासून चं सोबत आहे. मी यांना कधीही नाही सोडणार.",

   हे ऐकून वरूण म्हणाला," that's my sweet girl ",


  ( लग्नाआधी मिहिका वर प्रेम करणारा आणि आजं मिहिका सोबत असणारा वरूण,नेमके कायं सत्य होते?? आणि वरूण ला प्रॉमिस देऊन सुद्धा मिहिका ने पाच वर्ष गिटार सोबत अबोला का ठेवला होता याचे उत्तर पुढच्या भागांत..)


क्रमशः

भाग :४ मध्ये...



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama