मानसिक संघर्ष
मानसिक संघर्ष
परिस्थिती व स्वक्षमता यांचे योग्य भान ठेऊन समायोजन साधल्याने मानसिक आरोग्य चांगले रहाते. मन निरोगी व विकसनशील ठेवणे म्हणजे मानसिक आरोग्य होय. मनाचे स्वास्थ व कार्यक्षमता यांची जाणीव करून देने, संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा सुसंवादी अविष्कार यातून मानसिक आरोग्य तयार होते. मात्र बऱ्याचदा असे होते की नको त्या गोष्टीचा व्यक्ती हा विचार करत राहतो. त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंपेक्षा ज्या वस्तू उपलब्ध नाही आहे त्या गोष्टीचा त्याला सतत विचार असतो. बऱ्याचदा स्वतःकडे काय आहे यापेक्षा इतरांकडे काय आहे यावर व्यक्तीच जास्तच लक्ष असतं. सतत आपल्या मित्रांनी आपल्या शेजाऱ्यांनी काय घेतले, त्यांच्याकडे काय आहे या विचारांमध्ये तो गुंतलेला असतो आणि या विचारा विचारामुळे होते असे की मानसिक संतुलन हे बिघडून जाते आणि त्यामुळे रात्रीला येणारी झोप ही मात्र व्यवस्थित येत नाही. तसाही व्यक्तीचा हा एक स्वभावच आहे स्वतःकडे असलेल्या वस्तूचा त्याला काही महत्व तो देतच नाही. आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपल्याजवळ असलेल्या वस्तूला अगोदर महत्व दिलं पाहिजे मात्र असं न होता इतरांकडे असलेल्या गोष्टीचा, इतरांकडे असलेल्या सुख सोयीचा व्यक्ती सतत लोभ करत राहतो. यातून व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेकदा संभ्रमावस्था होते यात मानसिक संघर्ष म्हणतात. संघर्षातून बाहेर पडण्यासाठी व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत असतो, यातून निघण्याकरिता व्यक्ती नको त्या गोष्टीतही सापडतो, मग त्याचा पुन्हा नव्या गोष्टीशी संघर्ष सुरु होतो. व्यक्तीला इतरांकडे असलेल्या वस्तू इतरांकडे असलेल्या गोष्टी त्या हवे हवे वाटत असतात जेव्हा व्यक्तीसमोर दोन्ही पर्यायसारखेच आकर्षित करणारे असतात मात्र त्यात एका पर्यायाची त्याला निवड करावी लागते. जेव्हा व्यक्तीला एखादी गोष्ट हवी असते पण त्याचे होणारे परिणाम आहे त्याला नको असतात, जेव्हा व्यक्तीसमोर दोन्हीही नको असलेले पर्याय असतात व त्यातील एक निवडावा लागतो, या सर्व गोष्टीमध्ये तो निवड करण्यात असमर्थ ठरतो. व्यक्तीने स्वतः आनंदी राहावे, चेहरा हसरा ठेवावा जेणेकरून आपण आंनदी इतरांना दिसू, त्याच बरोबर, इतरांनाही आपण प्रेरणादायक व्यक्ती म्हणून छाप पडण्यास योग्य असू, सत्य परिस्थिती अशी असते व्यक्तीची की स्वतःच्या पेक्षा तो कितीतरी पटीने तो नको असलेल्या निर्थक गोष्टीचा, विषयाचा विचार हा सतत करत असतो, जे कार्य करायला पाहिजे तेथे तो विचार करतो मात्र कामाला सुरुवात करत नाही, तसेच कोणतीही गोष्टी हाताळण्या अगोदर त्या विषयाची, संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते, थोडा फार अनुभव ही, मात्र आपण कमी जर पडलो तर अपयश हे आपल्या वाट्याला येते हे सहाजिक आहे, जर आपण एखादया समजदार अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन कामाला सुरुवात केली तर त्यात येणारे यश हे आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन सर्वांना आश्चर्य चकित करणारेच असेल, त्याकरिता आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना व कलाविष्काराला संधी द्यावी लागेल तसेच आपल्यामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वैयक्तिक मदत तशी इतरांचीही आपल्याला मदत घ्यावी लागेल, आपल्या अवतीभोवती असलेले वातावरण यातही आपल्या सुसंवादी व लोकशाहीभिमुख भूमिका घेऊन आपल्याला योग्य मार्गाने मार्गक्रम करावे लागेल तसे विशेष कौतुक जे आपल्या मध्ये आहे ज्या सुप्त क्षमता आहे त्याही आपल्याला निरखून बघावे लागणार आणि त्यावर भर देऊन त्याचा उपयोगी, आपल्या उज्वल भविष्याकरिता करावा लागेल. तसेच आपल्यामध्ये असलेल्या विशेष गुणांचे कौतुकही आपल्याला स्वतः करावे लागेल. सोबतच आपल्यामध्ये असलेल्या उणिवांची अधिक चर्चा न करता त्यामध्ये सुधारणा कराव्या लागेल. आपल्याला आपल्या अवतीभोवती असलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. आपल्यामध्ये असलेल्या न्यूनगंडाची भावना का आहे या गोष्टीकडेही आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागेल. आपल्यामध्ये प्रत्येक कार्य करण्याची आपल्यामध्ये कडक शिस्त असायला हवी तसेच सकारात्मक व स्वयंपूर्ण शिस्त असावी. सतत आपल्याला ध्यान लावून तसेच आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा व अवगुणांचा आपल्याला विचार करावा लागेल त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला शोधावा लागेल त्याकरिता आपल्याला आपल्या आरोग्याकरिता उत्तम जेवण खूप महत्त्वाचे आहे रोजच्या जीवनात आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक जसे शुद्ध पाणी, शुद्ध हवा, योग्य वेळी घेतलेली झोप, झोपण्याच्या, उठण्याच्या आपल्या सवयी, पोटाकरिता लागणाऱ्या खनिज संपन्न अशा पालेभाज्या, प्रोटीन्स, जीवनसत्वयुक्त आहाराचा उपयोग आपल्याला आपल्या आरोग्याकरिता करावा लागेल यातून आपल्या आरोग्याला आवश्यक असणारे घटक हे मिळेल त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असलेली भीती, दडपण यातूनही आपल्याला बाहेर निघता येणार, तसेच आपले दुर्बल असलेल्या शरीर हे चांगल्या प्रकारे विकसित होईल. शरीराला योग्य पोषणयुक्त घटक जर मिळत असले तर आपल्या मनामध्ये येणारे अविचारीपणा या भावना दूर होतील तसे अपयश, न्यूनगंड, वैफल्य याही गोष्टीला आपल्याला आपल्या पासून दूर ठेवता येईल, आणि मग आपणच इतरांना सांगू,
"आपले चांगले आरोग्य, आचार विचार, हिच आहे यशाची जणू किल्ली, आपल्यात असलेल्या अवगुणांना दूर सारून सुप्त गुणांची फुले उमलली."
