डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Children

2  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Children

माझ्या घरातील आनंद झरे

माझ्या घरातील आनंद झरे

3 mins
50


माझी मुलं म्हणजे माझ्या घरातील अक्षय आनंदाचे झरे! प्रत्येकाच्याच घरात अशी आनंदाची ओहळं असतातच की त्या घराला अगदी आनंदाने भरून टाकणारी.!..

माझ्या घरात माझा मुलगा आणि माझी मुलगी असे दोन आनंदाचे झरे आहेत. मोठा मुलगा अगदी मोठ्या लेकराचे गुण म्हणजे शांत, समजदार वगैरे घेऊन आलेला तर लेक मात्र अगदी दुसऱ्या नंबरच्या मुलांचे गुणधर्म घेऊन आलेली.😍

आता खरं सांगू का, बाबांचा शांतपणा समजदारी पोरात आलेली अन् लहानी मात्र माझ्यावर गेलेली !😜

काय समजायचं ते तुम्ही समजून घ्या की!!!😀😍

पण ही अशीच लेकरं ना घराला हलवत ठेवून जिवंतपणा आणतात हेच खरं...!

कधी कधी खूप त्रास ही होतो यांच्या वागण्याचा अन् कधीकधी वाटते की अशीच रहावीत नेहमीच घराचा आनंद बनून!

पण काळ पुढे चालत असतो अन् लेकरेही मोठी होत असतात. लहानपणीचा अवखळपणा वयासोबत कमी होत असतो अन् धावपळ करत गोंगाट करणारे घर अक्षरशः शांत चिडीचूप होऊन जातं.अन् लेकरांच्या बालपणीच्या आठवणी आठवत अन् त्यांचेच बालपण त्यांना ऐकवत मग पुन्हा ते क्षण जगले जातात.

माझ्या मोठ्या मुलाचा इतर काही त्रास नव्हता पण खायचा त्याचा भारीच त्रास! काहीही द्या त्याला फारसं आवडायचेच नाही ! याच्यासाठी काय बनवू म्हणजे हा आवडीने खाईल? असं माझ्यासमोर अगदी प्रश्नचिन्ह असायचं. अन् असा हा माझा लेक पहिल्या वर्गापासून शाळेतल्या प्रिन्सिपाॅलच्या धाकाने जे सगळेच खायला लागला की माझी पार चिंताच मिटली..!😍

सायकल चालवणं त्याला फारच आवडायचं. पडण्याचेही बरेच एपिसोड व्हायचे. बाजूच्या ग्राउंडवर लहानपणी स्टंट सुद्धा मारले जायचे. अन् मग पडणेही व्हायचंच की.....

मग साहेब पडले की घरी सायकल घेऊन वापस यायचे. अगदी जागेवर सायकल नेऊन व्यवस्थित लावून ठेवायचे, पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर सुद्धा यायचे. अन् मग वरच्या गेटजवळ आले की सुरू व्हायचं " हु हुं हुं आई ग मी पडलो.. मी पडलो...!" 😀

त्याचा हा प्रकार बघून मला तर खूपदा त्याचं सांत्वन करायच्या ऐवजी हसूच फार यायचं.😂😂

लहानपणी त्याची आणि माझ्या पुतणीची इतकी भांडणं व्हायची की बास्स!!! अन् आता मात्र अशी गट्टी असते की सोबत असले की एकमेकांशिवाय पान हलत नाही!

आमच्या छोट्या मॅडम बद्दल तर जितकं सांगावं अन् लिहावं तेवढं कमीच! घराला दणाणून सोडणारी ही बया मात्र माझ्या घराचा आनंद सुद्धा आहे.

ही घरात नसली की माझ्या घराचा आवाज ,पसारा अगदी नगण्य असतो...! घरी आलेला प्रत्येक जण मात्र करमत नाही हो घर हिच्याशिवाय हा शेरा आवर्जून देऊन जातो.

ही जेवढी त्रास देते ना तेवढाच जीव सुद्धा लावते🥰❤️

अन् जे जे हिच्या मनाच्या जवळ त्यांना याचा अनुभव जास्त!😀

हिला एकदा मी काहीतरी करण्यावरून रागावलेलं. तेव्हा ती छोटी होती अगदी दोन वर्षाची. आपण जसं "शहाणी कुठली जास्तच करते ना!" असे वाक्य बोलतो ना. तिला मला तसेच काहीतरी म्हणायचे होते..! पण तिला काही शब्द सुचेनात😜

मग ती घरभर "मुक्ता कुठची....!, मुक्ता कुठची..!" करत करत फिरत राहिली अन् आम्ही सारे ते ऐकून मनसोक्त हसत राहिलो.

कुठे एखाद्या प्रोग्रामला जायचं म्हटलं की हिला फारच घाई असायची. आता "आपण कधी जाऊ ?"जे सकाळपासून विचारणं सुरू व्हायचं ते जाईपर्यंत..!🤩 आणि तिथे गेल्यावर "चला आता परत कधी जाऊ?" ची सुद्धा तेवढीच घाई असायची.😀

तिचं हे पुराण बघून नंतर नंतर आम्ही तिला वेळेपर्यंत सांगायचोच नाही.😀

कुठेही हिला न्यायचं म्हटलं की आधीच पट्टी पढवून न्यावं लागायचं नाहीतर कुठे आपली शोभा होईल याचा काही नेम नसायचा.

खूप वर्षांनी आमच्या बॅचचं गेटटुगेदर होणार होतं. ही आधी व्यवस्थित हो म्हणाली आणि मला जायची परमिशन दिली.

ती आणि तिचे बाबा मला सोडायला आले.तिथे माझी खास मैत्रीण रूपा तिला भेटली .पहिल्याच भेटीत मावशी इतकी आवडली की बास्स...! तिनी "चल तू येते का?" म्हणून विचारायशी अन् मॅडम राजी व्हायशी एकच गाठ!

बरं इतर कुणीच मुलं नसल्याने ही बोअर होणारच होती. अन् हिला नेणं म्हणजे काय ? ते मला चांगलेच ठाऊक!

तिथेच तिनी इतका गोंधळ घातला की,बस..!

सगळे म्हणाले घे तिला म्हणून पण मी तिला न्यायला आणि तिचे बाबा पाठवायला अजिबात तयार नव्हते.😜😀कारण घरून पुरेसा होमवर्क करून आणलं च नव्हतं मी!😀

आता मात्र तिला विचारलं की येते का तू सोबत? तर मी आता छोटी थोडीच राहिली म्हणत तीच आपल्या आठवणींवर हसत असते.असे खूपसे बहारदार किस्से तिचे!

असं हे पात्र आता थोडं मोठं झालं आहे आणि थोडं समजदार सुद्धा! पण मूळ स्वभाव मधेमधे डोके काढतोच!😜

काहीही असो पण कोरोनाच्या काळात तिने घेतलेली माझी काळजी जणू माझी आईच!🥰❤️

मला जपण्यासाठी चाललेली दोन्ही लेकरांची धडपड मनाला अगदी स्पर्शून गेली अन् आईपणाचं सार्थक झालं असं वाटलं.

आता अगदी काही दिवसातच घरट्यातलं मोठं पाखरू ज्ञान कण टिपायला दूर उडून जाणार...

दुसरं सोबतीला असेल काही वर्षांसाठी...!

तेव्हढेच एक समाधान!!!!

घरटं सुनं होईल पिल्लांविना पण...

त्यांनी घेतलेली गगन भरारी जास्त मोलाची असेल आमच्यासाठी......!

जेव्हा कधी ते शोधतील विसावा ...

आसुसलेले आम्ही असू सज्ज त्यांच्या विसाव्यासाठी..!🥰


Rate this content
Log in

Similar marathi story from Children