Anil Kulkarni

Abstract

2  

Anil Kulkarni

Abstract

माझी बस सुटल्यावर...

माझी बस सुटल्यावर...

1 min
119


माझी बस सुटल्यावर खूप वाईट वाटले. पण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करण्याची संधी मला मिळणार होती.नेहमी ची ती धावपळ, कंटाळवाणे चाकोरीबद्ध आयुष्य हे बस मधून मी अनुभवत होतो. बस सुटल्यानंतर जे माझ्या भोवती सभोवताल आहे ते मला जाणवलं, त्यामुळे एक वेगळ्याच विश्वात राहण्याची संधी, स्वतःबद्दल विचार करण्याची व मित्रांची, नात्यांची ओळख, त्यांचा सहवास त्यानंच प्रेम हे मला जाणवणार होतं. तसाच घरी परतलो आणि ज्यांना, ज्यांना वेळ देणं शक्य होत त्यांना तो दिला आणि त्यांचे विश्व समृद्ध केले.हे सर्व कशामुळे झाले तर माझी बस सुटल्यामुळे


आयुष्यात अशा अनेक बस सुटू द्या.वाईट वाटण्याचे कारण नाही.अनेक बस सुटल्या तरीही तुम्हालाआहे त्या परिस्थितीत राहण्याची संधी मिळते, सभोवतालची जाणीव होते. चिंतन करण्याची संधी मिळते.संवाद साधण्याची संधी मिळते .विसंवाद दूर झाले तर अनेक प्रश्न मिटतात.माणसे संवादच करत नाहीत.संवादा साठी वेळ आवश्यक आहे. आम्ही एकमेकाला वेळच देत नाही. संवाद नसल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.करिअरची बस पकडण्याच्या नादात अनेक गोष्टी दुरवल्या, विसरल्या होत्या. निसर्गाशी संवाद नव्हता, निसर्गातलं सौंदर्य एरवी त्याच्याकडे माझ् कधीच लक्ष जाणार नाही. माझ्या मनाला भावना असतात हे मला निवांत असल्यावर अनुभवता आलं.


बस सुटली तर दुःख न मानता,सुख उपभगण्यासाठी ही निवांत वेळ हवा. बस पकडण्याच्या नादात अनेक गोष्टींवरआपण पाणी सोडतो, सुख हे त्यापैकीच. बस चुकली तर दुसरी मिळते,पण त्या दरम्यान एक.स्वप्नातील वास्तव अनुभवता येणार आहे, जुनी ओळख जपता येणार आहे,नवीन ओळख होणार आहे. हे काय कमी आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract