कष्ट करूनच जीवन जगतो
कष्ट करूनच जीवन जगतो
या पृथ्वीवर सर्व प्राण्यामध्ये मनुष्य प्राणी तसा आपल्या जगण्याला, मरण्याला खुप मोठा अर्थ प्राप्त करून घेतो. खरे तर जन्माबरोबरच मृत्यू अटळ असतो तरीही जन्म आणि मृत्यू च्या काळात जे जीवन उपभोक्ता आले त्या आयुष्याला प्रारब्ध समजण्यात आले. एकाच आईच्या पोटी जन्माला येऊन दोन मुलांच्या संसारात फार मोठा फरक पडत असल्याचे लक्षात येते, जे जीवन माणसाला उपभोगायला मिळते त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. माणूस जीवन जगत असतो ते सुखासाठी परंतु अनेक वेळा रात्रंदिवस कष्ट करून सुख मिळत नसले तेव्हा मात्र माणूस दु:खी होतो, नाराज होतो आणि तो आपल्या नशिबाला दोष देत बसतो. साधूसंतानी सांगितले की, माणसाची आशा हीच मुळात मानवी दु:खाला कारण आहे. म्हणून आशा बाळगणे हेच चूकीचे आहे. त्या प्राप्त परिस्थितीत सुख मानायला पाहीजेत परंतु आजचा माणूस खिशात शंभर रुपये असतील तर हजार रुपयांच्या खर्चाचा हिशोब करून प्रत्यक्षत दोन हजाराचा व्यवहार करु लागला आहे. त्यामुळे त्या व्यवहाराला जुळवाजुळव करण्यासाठी दु:खाला सामोरे जावे लागले आहे.
वर्षातील 365 दिवसांपैकी सगळेच दिवस सुखाचे, आनंदाचे जावेत अशी माणसाची अपेक्षा असताना एक दिवस दु:खाचा गेला तरी आता आपल्या जगण्यात काहीही राम नाही असे माणसाला वाटू लागले आहे. धर्माातील आदर्श ग्रंथातील विचार आपल्या व्यवहारात माणसांनी आणायला पाहीजेत. परंतु देव, धर्म आणि पंथाचा विचार आपल्या आचरणात आणण्यासाठी केलेली धडपड आयुष्यात माणसाला आदर्श प्रारब्धापर्यंत नेऊन पोहोचविते त्यासाठी मात्र नेहमी प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे. . ....
