कळ्यांची झाली फुले
कळ्यांची झाली फुले


गर्दीतून जातांना बाजूच्या झाडावर, फुल बनल्यावर कोणासोबत जाऊ याचा विचार करत एक कळी खुलत होती,
कळीला त्याआधीच तोडण्याचा विचार खूप जणांनी केला, पण कळी रुसून बसली, उठायला तयार नव्हती..
आणि खुलायला पण..
सारे प्रयत्न करून थकले शेवटी.. शेवटी एक लहान पोर तिथून आपल्याच विश्वात जात असताना झाडाखाली असलेल्या पावसाच्या पाण्यानी साचलेल्या छोट्या डबक्याला पाहून चमकला,
त्यात खेळू लागला पाण्यात कधी लहान लहान दगड तर कधी झाडाच्या फांद्या ने तरंग करू लागला ,
डबक्यात फक्त सावली रुपी झाड दिसत होतं,
ना त्या झाडाची हिरवीगार पानं, ना नुकत्याच पावसाने बहरलेली सुंदर पण रुसलेली कळी... 'माझ्याकडे न पाहता, या खालच्या डबक्यात बघणाऱ्या मुलाला आणखी काय सुंदर दिसलं?', विचार करत कळी जागेवरून थोडी हलली आणि त्या प्रतिबिंबात डोकावताना, पाण्यावर टपकन पडून तवंग उठवत आनंदाने तरंगू लागली, कळीचं फूल बनलेला आरसा पाहतांना..