रिवाईंड
रिवाईंड
रस्त्यावरून गाड्या जात होत्या
गणपती विसर्जन मिरवणुकीत तुडुंब भरलेल्या रस्त्यावरून जाताना फुटपाथसुद्धा आज रस्त्याचा अविभाज्य भाग बनला
रिवाईंड
रस्ता फुटपाथला मिळतो तिथे फुटपाथवर चढतांना गाडीच्या मागच्या चाकाने चिखल मागे फेकला आणि हळूच त्या चिखलातलंच ते चिमूरड झाडाचं पान त्याच्यासोबतच बाजूला फुटपाथवर उडून पडलं
रिवाईंड
कमी अनुभव असलेलं हे पान वाऱ्याचा पहिला बळी ठरला,
हळूहळू गिरक्या घेत आपलं शरीर त्यानं जमिनीवर टेकवलं
रिवाईंड
वाऱ्याचा तो झोत कोण
ाकोणाला सोबत घेऊन जाणार, या भीतीनं सारेच झाडाला घट्ट पकडून झोके घेत होते
रिवाईंड
आकाशाचं एक मन हलकं कापूस पिंजून ठेवल्यासारखं तर दुसरं गच्च भरून आलं होतं,
क्षणभरात सारं ओझं रित करण्याशिवाय पर्याय नव्हता
रिवाईंड
वाऱ्याचा झंझावात सुरू होणार याची खबर वाऱ्याआधी पळणारे ढग देत होते
रिवाईंड
पहिल्यांदाच सगळ्या मित्रमंडळींसोबत गप्पा रंगवण्यात झाडाचं एक पान बिझी असतांना विजेच्या आक्रोशानं बिथरलं
रिवाईंड
रस्त्यावरून गाड्या जात होत्या