STORYMIRROR

Girish S

Abstract Others

3  

Girish S

Abstract Others

किमयागार - भाग ५

किमयागार - भाग ५

1 min
158

क्षितिजावर सोनेरी प्रकाश पसरला आणि सूर्योदय झाला. मुलाला वडिलांचे बोलणे आठवले व तो आनंदीत झाला. तो आतापर्यंत खूप शहरांतून फिरला होता आणि अनेक मुलींना भेटला होता पण आता तो ज्या मुलीला भेटणार होता तशी कोणी त्याला भेटली नव्हती.‌ त्याच्याकडे मेंढ्या होत्या, एक जाकीट व एक बदलता येण्यासारखे पुस्तक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मनासारखे फिरायला मिळणार होते. आणि अंदालुशिया च्या मैदानात फिरण्याचा कंटाळा आला तर मेंढ्या विकून तो समुद्रावर जाऊ शकत होता. आणि समुद्रावर फिरायचा कंटाळा येईपर्यंत तो अनेक शहरांमध्ये फिरलेला असेल, अनेक मुलींना भेटला असेल, त्याच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊन गेलेले असतील. तो नेहमी नवीन रस्ते शोधत असे. त्या भागांतून तो अनेक वेळा गेला असला तरी त्या पडक्या चर्च च्या जागेत तो कधी थांबला नव्हता. जग खुप मोठें आहे. त्याला फक्त नवीन रस्त्याकडे कळपाला वळवायचे आहे, पण मेंढ्याना मात्र तो नवीन रस्त्याने जातोय हे कळत नाही, त्याना नवीन ठिकाण किंवा ऋतू तील बदल याचा काहीच फरक पडत नव्हता त्याना फक्त अन्न , पाणी याचाच विचार असतो. आपणही काही वेळा असाच विचार करतो , त्याच्या मनात आले, मी पण व्यापाऱ्याच्या मुलीला भेटल्यापासून दुसऱ्या मुलींचा विचार केला नाहीये.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract