Girish S

Abstract Drama

3  

Girish S

Abstract Drama

किमयागार भाग १०

किमयागार भाग १०

1 min
183


त्याने पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीला त्यात दफनविधीचे वर्णन होते. त्यात अनेक लोकांबद्दल लिहिले होते. त्यातल्या लोकांची जी नावे होती ती उच्चारण्यास अवघड होती. त्याच्या मनात आले तो जर लेखक असता तर एका वेळी एकाच माणसाबद्दल लिहिले असते म्हणजे वाचकाला नांवे लक्षात ठेवावी लागली नसती. आता त्याचे वाचनात जरा लक्ष लागू लागले होते व ती कथा बरी वाटू लागली होती. तो वाचत असताना बाकावर एक म्हातारा येऊन बसला व त्याच्याशी बोलायला लागला. चौकातील माणसांकडे बोट दाखवत विचारले ते काय करित आहेत?. त्याने थोड्या रुक्षपणे उत्तर दिले 'काम करतायत' जेणेकरून म्हाताऱ्याला समजेल की त्याला वाचन करायचे आहे. त्याच्या मनात खरेतर आता विचार चालू होता की मेंढ्यांची लोकर त्या मुलीसमोर काढावी म्हणजे तिला कळेल की त्याला अवघड गोष्टी पण करता येतात. त्याने या प्रसंगाची मनात अनेक वेळा उजळणी केली होती की ज्यावेळी तिला समजेल की लोकर मागून सुरू करून पुढे काढावी लागते तेव्हा तिचा चेहरा कसा दिसेल, आणि लोकर काढण्याच्या वेळी काही चांगल्या गोष्टी सांगायच्या ठरवून ठेवल्या होत्या, त्या खरे तर त्याने पुस्तकात वाचल्या होत्या आणि त्या तो स्वतःच्या म्हणून सांगणार होता, तिला वाचायला येत नसल्याने तिला ते कळणार नव्हतेच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract