Anil Kulkarni

Abstract

2  

Anil Kulkarni

Abstract

कहता है जोकर...

कहता है जोकर...

4 mins
91


सत्तरीच्या दशकातला एक दीर्घ चित्रपट. आयुष्याप्रमाणे सर्कस ही तीन तासाचा शो. पहिला बालपण दुसरा तारुण्य व तिसरा म्हातारपण. माणसाचं आयुष्य ही एक सर्कसच आहे. उरातल दुःख दाबून इतरांना हसवणे हे आपल्या सर्वांनाच करावं लागतं. सामान्य कुटुंबातील जोकरचा मुलगा पुढे जोकरंच व्हायचे ठरवतों. उच्चभ्रू शाळेत शिकतांना एका शिक्षिकेवर त्याचा जीव जडतों. पौंगडा अवस्थेतील एकतर्फी प्रेम जेव्हा विफल होतं, तारुण्यातलं प्रेम आवाक्यात नसतं, आणि शेवटच्या टप्प्यातील स्वार्थी प्रेमामुळे प्रेमावरचा विश्वास उडून जातो. नात्यांच्या व्यक्त होण्यात वय आड येत नाही.अव्यक्त नातं अनेक समस्या निर्माण करतं. 


व्यक्त होण्याने प्रेम होते. व्यक्त होणं हे केवळ अव्यक्तहिमनगांचे टोक आहे.खूप साचल्यांवर माणसं व्यक्त झाल्याशिवाय राहत नाहीत. शरीर आणि मन हे कुठे व्यक्त होईल, कुठे रत होईल सांगता येत नाही. माणसांची तार जुळायची त्याच्याशीच जुळतें. ह्या तार जुळण्याला काहीच तार्किकता नाही. जशी प्रेमाला तार्किकता नसतें. प्रेमातच माणसे व्यक्त होतात.व्यक्त होण्यात उद्ध्वस्त होण्याची भीती असते म्हणूनही माणसें व्यक्त होत नाहीत. जेवढी देवाजवळ व्यक्त होतात तेवढी कुणाजवळही व्यक्त होत नाहीत.


प्रेमात व्यक्त होणं निर्व्याज असतं.भावनेच्या संपत्तीवरून माणसांच व्यक्त होणं ठरतं. अनेक अव्यक्त भावनांनी माणसे लगडलेली असतात. अनेक अव्यक्त भावनांचे ओझे घेऊन माणसे जगतांत. शेवटच्या श्वासापर्यंत माणसाजवळ एकच गोष्ट असते ती म्हणजे अव्यक्त भावना. प्रेम करायला व्यक्तंच व्हायला पाहिजे असं नाही, अव्यक्त राहूनही अनेक गोष्टीवर, अनेकजण प्रेम करतात. अनेक गोष्टीवर प्रेम करण्याची आपल्याला मुभा आहे पण काही ठिकाणी 'अटी लागू' हे पाळावं लागत.


मनाचा थांगपत्ता लागू द्यायचा नसेल तर अव्यक्त सारखं साधन नाही. अव्यक्त प्रेम मुदतीची ठेंव असते, आहे याचं केवळ समाधान. मनाच्या श्रीमंतीत अनेकांना स्थान असतं आणि तेअसायलाही हवं. कुठे, काय, कसं किती व्यक्त व्हायचं याचं गणित जमलं पाहिजे. व्यक्त होण्याचे ही मापदंड ठरलेले असतात. काही जागा अशा असतात की तिथेच फक्त दुःख व्यक्त करता येतं. अशा जागा जेवढ्या जास्तं तेवढा माणूस श्रीमंत.पण विश्वासाने पाय धरावेत, विश्वास टाकावा अशा जागांच जेव्हा दुर्मिळ असतात,तेव्हा व्यक्त होणे कठीण असतं.माणसे जेंव्हा व्यक्त होतात तेव्हा तो त्यांचा उत्तुंग आविष्कार असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्त होण्याचा अविष्कार बदलतो. किती, कसं व्यक्त व्हायचं, कुठे अव्यक्त राहायचं हा मनाचा खेळ ज्याला जमलां, तोच यशस्वी जीवन जगतो.प्रत्येकाची सर्व स्वप्ननें पूर्ण होत नाहीत. स्वप्नं पूर्ण होत नाही तेव्हा माणसें दु:खी होतात. दुःख उराशी बाळगूनच वास्तव जीवन जगावं लागतं. दुःख ऊराशीबाळगून हास्याची कारंजी उडविणे हा जोकर च्या व्यवसायाचा भाग आहे.


तारुण्यसुलभ भावनांची स्थित्यंतरे, त्या वयात होणारे शारीरिक बदल अतिशय योग्य पद्धतीने ऋषी कपूरने हे सर्व साकारलं. शिक्षिका कुठेतरी गुंतलेली आहे हे त्याला जेव्हा कळतं तेव्हा तो उद्ध्वस्त होतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यात उद्ध्वस्त होण्याचे प्रसंग जे पाचवीला पुजलेले असतात.मणसें जेव्हां एकमेकांना आवडायला लागतात तेव्हांच त्यांना विभक्त व्हावे लागते.आई शिवणकाम करून उदरनिर्वाह चालू करते.आपल्या मुलांनं कुणीतरी मोठं व्हावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. आपला नवरा सर्कशीत काम करता करता मेला म्हणून तिला सर्कसबद्दल घृणा असते. सर्कसमध्ये काम करता करताच नवऱ्याच्या मृत्यू होतो तो शेवटचा श्वास घेतो तेव्हा लोकांना वाटतं तो अभिनयच करतोय. ज्या सर्कसमुळे तिचं आयुष्य उध्वस्त होतं

 त्या सर्कसमध्ये मुलाने जाऊ नये असे तिला वाटतं.


तिचा मुलगा वडिलांप्रमाणेच जोकर व्हायचं ठरवतो. नायकाच्या आयुष्यात तीन नायिका येतात. प्रत्येकाबरोबर स्वप्न पाहणे व ते साकार होत नाही याचं दुःख उरात बाळगंत जोकरने हसवायचेच असतं या जाणिवेने तो हसवत राहतो. सिनेमाची गाणी अर्थवाही आहेत. जीवनाचं, जीवन जगण्याच तत्वज्ञान जोकरच्या तोंडी सांगितलं आहे.

जीना यहा, मरना यहा इसके सीवा जाना कहा.

कल खेल मे हम हो ना हो गर्दिष मे तारे रहेंगे सदा.

कहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना.


दुःखालाही तत्त्वज्ञानाची झालर असते. Man proposes and not only God but man also disposes. त्यामुळे प्रश्नांची साखळी तयार होते. अनेक कठीण प्रसंगाला आपण ऊरात दुःख बाळगून हसत हसत जोकर प्रमाणेच जगत असतो. अशी तारेवरची कसरत करणे म्हणजेच सर्कस होय. अनुवंशिकता आणि परिस्थिती जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हा त्यांच्या मागे अनेकांना फरफटत जाव लागतं. आईच्याईच्छे विरुद्ध, वडीला प्रमाणे जोकर बनण्याचे स्वप्न राजू उराशी बाळगतो. जीवन जगताना, गोष्टी साध्य करत असताना अनेकांच्याविरुद्ध काही गोष्टी साध्य कराव्या लागतात. जोकर होण्यापर्यंतचा सघर्ष दिग्दर्शक राज कपूर यांनी सुरेख मांडला आहे. केवळ स्वप्नरंजन न करता सामान्य माणसांच्या आयुष्यातील वास्तव संघर्ष प्रेक्षकांना जास्त भावतो.


अभिनयाच्या बाबतीत कुणी कुठेंच कमी पडत नाही. रशियन सुंदरीचे काम छान आहे. भावनेला भाषेचा अडसर नसतो. माणसाचं जीवन सर्कसच

आहे, ठराविक वेळेला ठराविक हावभाव, ठरावीक कृती, करावी लागते. जाने कहा गये वो दिन म्हणत प्रत्येकालाच आठवणींना तुमको ना भुल पायेंगे हम म्हणत या जगाचा निरोप घ्यावा लागतो. सर्कस व जोकर काळाच्या ओघात व तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावत असले तरीही, जीवन जगतांना यांचा वस्तूपाठ नजरअंदाज करून चालणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract