Amruta Gadekar

Abstract Classics Inspirational

4.1  

Amruta Gadekar

Abstract Classics Inspirational

खरचं लोकांची मानसिकता

खरचं लोकांची मानसिकता

2 mins
460


खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे...


पंढरपुरला विठ्ठलाच्या देवळात

गेलो होतो... दर्शन घेऊन बाहेर आलो न् समोरच्या ठेल्यावर उसाचा रस घेत होतो,

तिथेच बाजूला हाराच् दुकान पण आहे..


एक चांगला पस्तिशीचा इसम तिथे आला..

त्याने अगदी 250 चा सुन्दर हार घेतला...


तेवढ्यात त्याच्या कड़े एक गरीब मुलगा आला,

याच त्या मुलाकडे लक्ष नव्हतं.. तशी काही गरज पण नव्हती... 11 वर्षाचा असेल तो मुलगा... त्याने त्या इसमाच्या हाताला स्पर्श

केला तो त्याने त्याच्या कड़े पाहिले आणि अगदी दूर ढकलत, स्वतःचा हात रुमालाने पुसला...


पण तो मुलगा अगदी रडवा चेहरा करुन् त्याच्या कड़े पाहत होता, त्याचे डोळे पाणावलेले होते आणि तो पैसे मागत नव्हता...

तर 1 ग्लास उसाचा रस त्याच्याकडे मागत होता...

तहान लागली आहे बोलत होता..


पण त्या इसमाला काही पाझर फुटला नाही.

ते पाहुन, मी रस वाल्याला सांगितले,

त्या मुलाला रस दे, पैसे मी देतो...


तो मुलगा रस प्यायला आणि माझ्या कड़े क्षणभरचं पाहिलं.. एक स्मित हास्य आणि पळाला...


तहान भागल्याच् सुखं त्याच्या

कोवळ्या चेहऱ्यावर स्पष्ट जानवलं...


तोवर या इसमाचा ego दुखावला होता...

तो मला बोलला..

"आप जैसे लोग इन भिकारियों को सर चढ़ाते हो..."


मी त्याला बोट दाखवलं... तो मुलगा पुढे जाऊन मंदिराचे जीने पुसतं होता...


एवढच बोललो...

"आपको विठ्ठल के मूर्ती में

भगवान् दिखता है, जिसके लिये आपने 250 का हार लिया.. 

और मुझे उस बच्चेके हँसी में विठ्ठल मिल गए..

आपका भगवान् 250 में भी नहीं हँसा,

लेकिन मेरा विठ्ठल 10 रूपयों में हँस दिया..."


माहित नाही मित्रांनो.. पण हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले... 

कुठे आहे माणुसकी...? 

कुठे चालली आहे भक्ति..?


हि कसली भक्ति..? ज्याची भक्ति करता त्याचे विचार तुमच्या वर्तवणुकित नसतील,

तर कसली आलिये भक्ति...


काय उपयोग त्या पैशांचा ज्याने एखादा गरीब हसू शकतं नसेल... 

तासाभरासाठी मूर्तिच्या गळ्यात हार टाकून, काय सिद्ध

केल त्याने...? 


दान पेटित पैसा टाकला देवासाठी, पण पोचला बिनकामाच्या अकाऊन्टलाना...

स्वतःच्या ऐश्वर्याच् प्रदर्शन कशासाठी...? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract