Amruta Gadekar

Fantasy

2  

Amruta Gadekar

Fantasy

माणसं मनातली...

माणसं मनातली...

1 min
135


मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....*


*काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...*


*चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....*


*शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....*


*शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....*


*म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो....*


*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं !!*


*आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई....*


*ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.*


*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत....*

 

*कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?*


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy