Amruta Gadekar

Inspirational

2.0  

Amruta Gadekar

Inspirational

आपलं नशीब, आपल्याच हाती

आपलं नशीब, आपल्याच हाती

5 mins
443


एका बीजाचा वटवृक्ष होऊ शकतो. तसा केवळ एक सकारात्मक विचारही तुमचं अवघ आयुष्य बदलू शकतो. मात्र फक्त सकारात्मक विचार करून चालत नाही तर त्या जोडीला अथक प्रयत्नांची कास ही धरावी लागते. सकारात्मक विचारांमध्ये इतकी ऊर्जा असते की एखाद्याच्या जीवनात पूर्णतः परिवर्तन घडवण्याची ताकद त्यात असू शकते.अशी विचारसरणी असलेली व्यक्ती कोणत्याही संकटांचा सामना धैर्याने तर करतेच व त्या संकटात देखील संधी शोधण्याचे प्रयत्न करते.अनेक यशस्वी लोकांची गोष्ट ऐकल्यावर अथवा वाचल्यावर असे स्पष्ट होते की त्यांचे विचार हे नेहमीच सकारात्मक असतात. ते स्वतःला स्वयं शिस्त लावतात. जिद्द,चिकाटी,कष्ट, प्रामाणिकपणा असे अनेक सुगुण त्यांच्या अंगी असतात.दिलेला वेळ व शब्द ते नेहमीच पाळतात. त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचा विश्वास असतो . ते त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाही.त्यांच्यातील आत्मविश्वास हे त्यांचे धैर्य प्राप्त करण्याचे प्रमुख साधन असते.त्यांचे आचार व विचार ऐकल्यावर आवर्जून लक्षात येते की 'नाही' हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावा.ते नेहमीच प्रयत्नांवर विश्वास ठेवतात . म्हणून तर म्हणतात ना "प्रयत्नांती परमेश्वर". परमेश्वर नेहमी त्याचाच पाठीशी असतो जो प्रयत्न करतो. तुम्ही' येल्लो' सिनेमा पहिला असेल . त्यात गुरू व शिष्याचे नाते तसेच त्या शिक्षेच्या यशाची कहाणी ह्याचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे. ती शिष्य गतिमंद असते मात्र गुरूंना तिच्या मध्ये तो स्पार्क दिसतो जो इतरांमध्ये नसतो. तिला पोहण्याची प्रचंड आवड असते. जणू तिचा जन्म त्यासाठी झालेला असतो. तिची जिद्द व चिकाटी सर्वांसाठी खूप प्रेरक आहे. अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ तिच्यात असते . तिच्या गुरूंनी  तिच्यासाठी घेतलेली मेहनत खरंच लक्षणीय आहे. ती तिच्या गुरूंच्या विश्वासाचे सार्थक करते. त्यासाठी अथक प्रयत्न करते. स्वतःचे शंभर टक्के देते . न थांबता, न थकता पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करते व जिंकते. हे सर्व शक्य होते केवळ तिच्या कष्टामुळे,तिच्या आईच्या त्यागामुळे व गुरूंच्या शिस्तीमुळे.योग्य वेळी योग्य गुरूंचे मार्गदर्शन मिळणे हे अतिशय महत्वाचे असते. गुरूंची प्रेरणा ही शिष्याचे भाग्य बदलू शकते.म्हणून गुरूंचे स्थान हे सर्वात मोठे असते. ह्या सिनेमातून सकारात्मक संदेश दिला आहे .तो म्हणजे कधीही हार मानू नका. सतत प्रयत्नशील रहा व पुढे पुढे चालत रहा.


अजून एक उदाहरण पाहू या. जर तुम्ही एकटे रस्त्याने चाललेले आहात आणि अचानक तुमच्या मागे एक वाघ लागतो . तुम्ही तुमची सर्व ताकद पणाला लावून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावता , तेव्हा तुमच्या मनात एकच विचार असतो तो म्हणजे ह्या वाघाच्या तावडीतून सुटण्याचा आणि काय आश्चर्य तुम्ही एवढे जोरात धावता की तो वाघदेखील कंटाळतो. आता आपली संकटं देखील ह्या वाघाप्रमाणेच तर असतात. ती कधीही आपल्यासमोर येऊन उभे राहू शकतात मात्र ते धाडस , तो आत्मविश्वास, ती धडपड, आपली ताकद सर्वस्व पणाला लावून लढायचे आणि तो पर्यंत प्रयन्त करायचे जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. ही संकटंच आपल्याला जास्त बलवान बनवतात.चढ उतार तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, सुख दुःख तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात . मात्र दुःखात व संकटात जो धैर्याने सामना करतो,त्यावर मात करतो ,तोच जिंकतो व यशस्वी वाटचाल करतो.कोणी एका दिवसात यशस्वी होत नाही .त्यासाठी त्याने अनेक महिने, अनेक वर्षे, परिश्रम घेतलेले असतात .अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो, सतत कार्यरत राहिलेला असतो .नव नवीन गोष्टी शिकून त्या आत्मसात करून ह्या स्पर्धेच्या जगात टिकू शकतो कारण त्याचा ठाम विश्वास पडतो की नवीन सुरवात ही कधीही कोठेही व कोणत्याही वयात नव्याने होऊ शकते. त्याला वयाची मर्यादा नसते .ज्याच्या पंखात बळ असेल तर तो उंच भरारी घेणार ह्यात तिळमात्र शंका नाही. तो यशाचे गोड फळ चाखू शकतो. अशी व्यक्ती नेहमी वर्तमानात जगते.समजा त्याला वर्षांपूर्वी उत्तम उद्योजक

पारितोषिक मिळाले असेल अनेक जण त्याचे अभिनंदन करतात, शुभेच्छा देतात .मात्र ते यश डोक्यात न जाऊ देता, त्याच्यावर न थांबता आज वर फोकस करतो. मी आज काय आहे व आज काय केले पाहिजे ह्याच्यावर विश्वास ठेवतो. अपयश देखील पचवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. अशाही परिस्थितीत न डगमगता न थांबता तो दुपटीने प्रयत्न करतो व यशस्वी होतो. हे अशक्य देखील शक्य करण्याची ताकद सकारात्मक विचारांमध्ये असते.अशी व्यक्ती कायम उत्साही,आनंदी व हसरी असते. त्याच्या अस्तित्वामुळे आजूबाजूचे वातावरण देखील प्रसन्न वाटते. अशी व्यक्ती सर्वांनाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.आज नाही जमले तर उद्या नक्की जमणार हे अशादायी विचार त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.वेळेचा सदुपयोग करणे व योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे साहस ते नेहमीच करतात.अशी व्यक्ती कधीही नशिबाला अथवा कोणत्याही व्यक्तीला दोष देत नाही कारण त्यांचा ठाम विश्वास असतो की आपले नशीब हे आपल्या हातात असते ते घडवणे हे फक्त आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते.


ध्येय निश्चित असेल तर त्यापर्यंत पोहचायला जरी वाटेत अनेक अडचणी आल्या तरी त्या खडतर प्रवासात सकारात्मक विचार नेहमीच साथ देतात व आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.समस्या असली तरी त्याला तोडगा असणार प्रश्न असेल म्हणजे त्यालाही उत्तर असणार एक दार बंद झाले तरी दुसरी वाट असणार फक्त शोधावी लागते . ती मिळाली की यश हे निश्चित आहे. काही व्यक्ती सतत नकारात्मक विचार करत असतात. मला हे जमणार नाही,मी कधीही यशस्वी होऊ शकत नाही,हे काही शक्य नाही, ही गोष्ट माझ्या नशिबात नाही,मला माझ्या नातेवाईकांनी अथवा मित्राने फसवले म्हणून माझी प्रगती झाली नाही,ही वास्तू चांगली नाही,माझे ग्रह सध्या चांगले नाही वगैरे . आता तुम्ही पहा ह्याचे प्रत्येक वाक्य नाही ह्या शब्दाशिवाय पूर्णच होत नाही.ते सतत निराश असतात व समोरच्याला दोष देतात . मात्र त्याच्या हे लक्षात येत नाही की जेव्हा आपण एक बोट समोर दाखवतो तेव्हा राहिलेली चार बोटं स्वतःकडे तर असतात. हे संकुचित नकारात्मक विचारच त्यांची प्रगती होऊ देत नाहीत.सकारात्मक विचार तुम्हाला स्वर्गाच्या म्हणजे यशाच्या दिशेने नेतात. तर नकारात्मक विचारसरणी तुम्हाला नरकाच्या दिशेने नेतात. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमचे भविष्य कसे हवे ? आयुष्याच्या वाटेवर कधी काटे तर कधी सुंदर फुलं असणार. मात्र ही वाटच आपल्याला दूर पर्यंत घेऊन जाणार.जो थांबतो तो संपतो. मात्र जो चालतो तोच तर जिंकतो. हेच तर आयुष्य आहे.  मनुष्य जीवन ही प्रमेश्वराने दिलेली देणगी आहे त्याचा कसा वापर करायचा हे मात्र सर्वस्वी अपल्यावर अवलंबून आहे.वाईट सोडून चांगले आत्मसात केले पाहिजे. वेळेला महत्व देऊन आलेल्या संधीचे सोन केले पाहिजे .जीवनात अशा अनेक संधी येतात .मात्र डोळसपणे त्या पाहिल्या पाहिजे .म्हणून तर म्हणतात " दृष्टी तशी सृष्टी" ! 


तुम्ही विश्वात जसे विचार रुजवता,ते कित्येक पटीने वाढून तुम्हाला परत मिळतात.थोर व्यक्तिमत्व लाभलेले माजी राष्ट्रपती डाँ. अब्दुल कलाम म्हणतात,' रात्री पडतात ती स्वप्न नव्हे,तर स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही ,स्वस्थ बसू देत नाहीत.'    आपण आपल्या मेंदूला ज्या सूचना देतो तशाच गोष्टी जीवनात घडतात आता .तुम्हीच पहा आपल्या विचारसरणीचा किती मोठा प्रभाव आपल्या जीवनावर होतो. कारण क्षेत्र कोणतेही असो , कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही.सकारात्मक विचार केवळ जिंकायलाच नव्हे तर हारल्यावर देखील पुन्हा उभे राहून लढायला शिकवतात . हीच तर आजच्या स्पर्धेच्या आधुनिक जगाची गरज आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational