कष्ट
कष्ट
केल्याने होत आहे एकदा कष्ट करून तर बघ सुरुवात केली आहे तर मागे न बघता पुढे चालून तर बघ.....
कष्ट हीच तुझ्या यशाची किल्ली आहे ती घेऊन यशाचे दार उघडण्याचा प्रयत्न करून तर बघ.....
कष्ट हेच तुझ्या यशाचे रहस्य आहे एक दिवस नक्की यशस्वी होशील त्या आधी थोडे कष्ट करून तर बघ.....
एकदा कष्टाची पायरी चढून तर बघ शेवटची पायरी तुझ्या यशाची असेल तू कष्टाने खूप काही साध्य करू शकतोस त्या आधी कष्ट करण्याची तयारी तर ठेव.....
अशक्य असे काहीच नाही तुझ्या जीवनामध्ये तू ठरवेल तेवढे आकाशात उंच भरारी घेऊ शकतोस असा गरुड पक्षी आहेस तू......
कष्टाने ओले चिंब झाल्याशिवाय यशाची चव चाखायला मिळणार नाही म्हणून कष्ट एवढे कर की आवाज फक्त तुझ्या यशाचाच घुमला पाहिजे.....
कष्ट म्हणजे नक्की काय असते हे तुझ्याकडे बघितल्यावर लोकांना कळले पाहिजे इतके कष्ट कर की कष्ट सुद्धा बोलेल की आता बास आणि मग बघ यश तुझ्याकडे धावतच येईल.....
कष्टा मध्ये एवढी ताकद आहे की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवते कष्ट हेच तुझ्या यशाचे अमृत आहे हे अमृत तू प्राशन करून तर बघ केल्याने तू गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणते कष्ट थोडे करून तर बघ कष्ट थोडे करून तर बघ....
