Priya Satpute

Abstract Others

2  

Priya Satpute

Abstract Others

काही मनातले...४

काही मनातले...४

1 min
146


माणूस हा सर्वांत मोठा धूर्त प्राणी आहे…तो स्वतःच्या सोयीने प्रेम करतो…तो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो…कधी तो प्रेमाला आंधळ नाव देऊन, त्याच्या लेबलं खाली काहीही करतो…मग समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करो अथवा नाही, त्याला फक्त त्याचा स्वार्थ साधायचा असतो…प्रेमात अन युद्धात सगळ माफ असतं असं बोलत तो निष्पाप माणसांना दुखवतो…जनाची सोडा तो तर मनाची सुद्धा लाज ठेवत नाही…तिथे या गोष्टींना काडीचीही किंमत नसते…प्रेम आपला स्वभाव आहे…पण, तो हेचं विसरला आहे…प्रेमाला वेगवेगळ्या झालरी असतात…कधी मैत्रीची तर कधी नात्यांची तर कधी नव्या गुंफल्या जाणाऱ्या नात्यांची…या सगळ्यांना काडी लाऊन तो स्वार्थाने बरबटलेल्या वासनेच्या आहारी जातो…व्यभिचार त्याचा परममित्र बनून जातो…स्वार्थाच्या या आगीतून निरपेक्ष प्रेमाचा शिडकावाच माणसाला वाचवू शकतो हे मात्र नक्की…


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract