Priya Satpute

Tragedy

3  

Priya Satpute

Tragedy

काही मनातले ...५

काही मनातले ...५

2 mins
239


रंग माझा गोरा…जणू तो चंद्राला सुद्धा लाजवेल…चंद्रामध्ये तर काळे डाग सुद्धा आहेत…तो काय माझ्याशी स्पर्धा करणार? नशीबवान आहे मी…कारण?…मी एक गोरी मुलगी आहे…देवाने मला गोऱ्या रंगाने जन्माला घातलंय! जिथे लाथ मारेन तिथे सोनंच पडेल…कारण?…मी गोरी आहे!…चार-चौघात काय, संपूर्ण गर्दीचं लक्ष फक्त माझाकडेच असते…अश्या या गोऱ्या रंगाच्या छटा किती विकृत असतात हे सुद्धा लवकरच जाणवलं मला… शेजारच्या काकू त्यांच्या सावळ्या मुलींना बोल लावताना ऐकलय मी…काळी जन्माला आलीय किती सोन आणि पैसे द्यावे लागणार हिच्या लग्नात! म्हणून त्यांना ओरडताना लहानपणापासून पाहतेय…तिला तोंडाला वेगवेगळ्या क्रिम्स लावलेलं रोज पाहतेय…आज तरी गोरी होईन म्हणून ती रोज आरशात पाहते…एक दिवस तर तिने रागात येउन आरसाच फोडला… त्याचे तुकडे तिच्या हातात घुसले…ते काढताना तिच्या डोळ्यातलं सावळ्या रंगाच दुः ख स्पष्ट दिसत होत…तिला समजावताना माझा गोरा रंग वरचढ झाला असंच वाटलं मला…मला देता आलं असतं तर मी देऊन टाकला असता तिला माझा रंग!!… तेवढ्यात काकू खेकसत आल्या…ही क्रिम लावून बघ अन लवकर गोरी हो…जणू गोरा रंग त्यांना सर्व काही देऊन जाणार होता…लग्नाची सावळ्या रंगाची मुलगी किती जड असते हे तुम्हा गोऱ्या मुलींना काय कळणार, हे काकूंच वाक्य माझ्या गोऱ्या रंगाला पहिल्यांदाच बोचलं…मनाच्या सुंदरतेसमोर रंगच मात करतो का?…मनात चाळवल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर बरेचं दिवस शोधली…पण, हाती काही लागलच नाही…रोज आरश्यासमोर उभ्या राहणाऱ्या त्या सुंदर सावळ्या मुलीला कुढताना पाहिलं…रंगाच्या मोहात पडलेल्या कमनशिबी मुलांना पाहिलं…तिच्यावर हसून जाताना त्या षंढांना हे पण जाणवलं नाही का ते सुद्धा काळे-सावळेच आहेत?…आयुष्यात रंग इतका का महत्वाचा असतो? माझ्याच विचारांशी खेळत दिवस उडून गेले…रोज सकाळी खिडकीतून दिसणारी ती आज पंख्याला लटकत होती…धावत पळत तिच्यापाशी पोहचले…निपचित पडलेला तिचा सावळा रंग हसून बोलत होता…प्रिया, बघ सांगितलं होत ना मी तुला गोरा रंगच जिंकणार…


One of the most difficult article, I had written so far...Colour discrimination is among the most disgusting thing that human itself created! Whatever may be the colour, we all are creation of God! Please, respect that and say no to it!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy