प्रियांश...
प्रियांश...


आयुष्य कधी कधी खोल काळाकुट्ट दरी सारखं वाटतं, आपल्याच माणसाने धक्का द्यावा अन घरंगळत, धक्केबुक्के खात, मनाने रक्तबंबाळ होऊन, मोक्याच्या क्षणी पोहचावं अन मग पुन्हा शब्दांनी मन छिन्नविच्छिन्न व्हावं!
हे सारं का घडावं? कसं आहे ना, हे मन जे आहे ना ते स्पष्ट शब्दात बोलायचं तर नागड असतं! आपण रोज त्याच्यावर वेगवेगळी, रंगबिरंगी, सुंदर तर कधी पाहवली जाणार नाहीत अशी वस्त्रे पांघरूण त्याला नाजूक, पवित्र करत जातो! अरेरे! तो असं बोलला मग तिथे मनावर नागडेपणाची भावना अजगरप्रमाणे विळखा घालते! मग, ती मला छान बोलली मग तो विळखा सैल पडतो. आपणच मनाला झाकतो अन नागडे करतो!
तेच जर मनाला शब्दांच्या लाजरेपणाच्या विळख्यातून कायमच बाहेर काढलं तर मनाला नागडेपणाची भीती वाटणारच नाही, तोच त्याचा मूळ भाव आहे! आपण जन्माला पण नागडेच येतो अन जाताना सुद्धा अग्नीच्या स्वाधीन होताना देहावर चढवलेली वस्त्रे, आभूषणे सारी इथेच सोडून आले तशेच जातो! म्हणूनच समोरचा कितीही वाईट का बोलेना, थोडं शांत व्हा, काही मिनिट शांत रहा, आकडे मोजा फार तर, अन मनातून नागडे व्हा! यातच खरा शहाणपणा आहे!