ज्येष्ठांच्या समस्या डिमेन्शिया
ज्येष्ठांच्या समस्या डिमेन्शिया
सूत्रधार :-मंडळी एक काळ असा होता, एकत्र कुटुंब पद्धती होती .आत्या, आज्या, मावश्या ,काक्या, माम्या ,घरात रगड अनुभवी स्त्रीया असायच्या.
त्यामुळे मुलं लहानाची मोठी कधी झाली ते कळायचे देखील नाही. सण, वार, लग्नसमारंभ, आजारपण, कोणी ना कोणी एकमेकाची मदत करत असत.
हे सारे कळत देखील नव्हतं. पण हळूहळू न्यूक्लिअर फॅमिली झाली. "हम दो हमारा एक" अशी येऊन ठेपली. असली तर एखादी आजी किंवा आजोबा, आणि मग फक्त त्यांनी काय काय केलं पाहिजे अशी अपेक्षा आपण करतो.
पण त्यांच्या काही अडचणी असतात. ते आपण समजून घेतल पाहिजे.
स्थळ:-( एक मध्यमवर्गीय कुटुंब,)
(सासू टीव्ही बघत असते)
(दारावरची बेल वाजते, बराच वेळ बेल वाजली तरी कोणीच दार उघडत नाही)
सून:- अहो आई उघडा ना दार !सकाळी सकाळी मी कामात असते ना!
एवढा पण कसं कळत नाही? कोणास ठाऊक? अजून सगळ्यांचे डबे भरायचे आहेत ,बंटीची शाळेची तयारी करायची आहे,
सासू एक हात कमरेवर ठेवून कण्हत कुंथत, वाकत वाकत दरवाजा उघडते.
(दरवाजात दूधवाला असतो,सासु दुधाच्या पिशव्या घेऊन फ्रीजमध्ये ठेवते)
स्वतःशी :चांगले भावगीत बघत होते ,पण हिच्याचाने बघवत नाही .
सून :-आई पोळीभाजी मी करून ठेवली आहे ,कुकर लावून ठेवा, बंटीला वेळे मध्ये शाळेच्या बसला बसवून द्या. नाहीतर मग दरवेळी रिक्षाने जावे लागते. शंभर रुपये फुकट जातात. दूध तापवून ठेवा.
सासू:- चांगली हेडमास्तर होते मी? शाळेत माझा काय वट होता! किती मान होता! मला सगळे विद्यार्थी, शिक्षक मला मान द्यायचे. पण रिटायर झाल्यापासून कुत्र देखील विचारत नाही. आणि जर काही सांगायला गेलं, तर म्हणतात कसे ,ही काही तुमची शाळा नाही. आणि आम्ही काही तुमचे विद्यार्थी नाही. फुकट लेक्चर नको!
तो बंटी पण अगदी ना! आईवर गेलाय!
मला छळायचं व्रतच घेतले त्याने. अगदी व्रात्य😈😈😈 आहे कार्ट!
दिवसभर हे ओढ, ते ओढ, पसारा कर! आणि हिला मात्र आल्यावर घर नीटनेटके हवे.
मुलगा:- मी पण निघतो ग आई. मला उशीर झालाय! (आईच्या पाया पडतो)
आई :- अरे माझी औषधे संपलीत, गेले चार दिवस झाले तुला रोज आठवण करते.
मुलगा:- मी तरी काय करू? मुद्दाम करतो का मी! गेले चार दिवस झाले मला ओव्हर टाईम असतो. त्यातून मंथ एन्ड आहे.
पगार झाला नाही, पगार झाला की आणतोच आई!
आई:-अरे माझी सारी पेन्शन तुझ्या हातावर ठेवते ना? शिवाय माझ्या फंडातून अस तुला ब्लॉक घ्यायला पैसे दिले!
खर आहे बाबा! जेवायचे ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये माणसाने.
मुलगा:- अग महागाई किती वाढली आहे? तुझी ती पेन्शन दोन वेळेच्या जेवणाला तरी पुरते का? झटक्याने निघून जातो.
आई:- हे गेले आणि मी अगदी एकाएकी पडले! माझा संसार झाला, पण आता यांचा संसार सांभाळा. लेका पुढे हात पसरा. अगदी नको झालं हे जगणं, त्यात हे सगळे रोग माझ्याच मागे आलेत.
बीपी, डायबेटिस, हार्ट प्रॉब्लेम सगळे माझ्याकडेच आहे .काय करू?
सूत्रधार:- हे झाले एका घरातले, या वयामध्ये म्हाताऱ्या माणसांना प्रेमाची, आपुलकीची, गरज असते. दिवसभरात एकदा तरी आईला कशी आहेस? म्हणून विचारले तरी ती खूश होते.
....................................
(प्रवेश दुसरा)
एक म्हातारा माणूस रस्त्याने काही तरी शोधत फिरतोय, एका हातात पत्ता.
एक मुलगी:- अहो आजोबा धडकाल ना! माझ्या स्कुटीला, काय शोधताय? अच्छा हा पत्ता होय? रविकिरण सोसायटी!
ही काय, समोर तर आहे. कोण राहतो तिथे?
आजोबा:- त्याचं असं आहे आहे, म्हणजे असं की, तिथे ना! मीच राहतो! आजोबा पुढे जातात.
मुलगी; काय पण विचित्र माणूस आहे! स्वतःचं घर सापडत नाही? म्हणजे काय का उगाच मुलींशी बोलायचा चान्स .आज-काल कोणाचा काय भरोसा नाही
सूत्रधार :-नाही ते मुद्दाम करीत नाहीत. हा एक मानसिक आजार आहे. याला "डिमेन्शिया" असे म्हणतात.
............................
(प्रवेश तिसरा घराचा सीन, नवरा बायको बोलत राहतात)
बायको:- अहो बाबांचा आजकाल काही खरं नाही. अहो काल त्यांना जेवायला वाढलं तरी, अर्ध्या तासाने परत येऊन मला जेवण मागायला लागले. आणि मी नाही म्हणाले म्हणून, माझ्याशी भांडायला लागले.
बरं ऐकणाऱ्या लोकांना काय वाटेल, बायकोच्या माघारी सुन जेवायला देखील देत नाही.
नवरा :-अग इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, मला काय तुझा स्वभाव माहित नाही का?
तू बाबांशी असं कसं वागू शकतील, तू त्यांना वडिलांसारखेच मानतेस.
मुलगी:- अहो बाबा आजोबां ना! चक्क हॉलमध्ये युरिन करतात. परवा मी कॉलेजमधून लवकर घरी आले तर, आजोबा घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेले होते. शिवाय सगळ्या हॉलमध्ये युरीन चा वास येत होता. माझ्या मित्रांना मी घेऊन आले होते मला एवढे लाजल्यासारखे वाटले ना!
सुनबाई :-अहो विषय निघाला म्हणून सांगते बरं! नाही तर म्हणाल वडिलांच्या चुगल्या करते .परवा मी पण कामावरून आले ना, तर घराचा नुसता स्विमिंग टॅंक झाला होता. बाबांनी नळ उघडा ठेवला होता. सर्व जिन्ह्यातून पाणी खाली वाहत होते. सगळी साफसफाई मलाच करावे लागली. कामावरून आल्याआल्या माझी नुसती कंबर दुमती झाली. शिवाय सोसायटीच्या सेक्रेटरीने दंड आकारला तो वेगळाच.
आता काय करावं या बाबांचं ?(सारेच डोक्याला हात लावून बसतात .आणि एका सुरात म्हणतात)
आई गेल्यापासून ते सैरभैर झालेत ❓ ते आम्हाला मुद्दाम त्रास देण्यासाठी असं वागतात ❓
सूत्रधार:- नाही! ते मुद्दाम असे वागत नाहीत ,या आजाराला डिमेन्शिया म्हणतात.
हा आजार मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळीवरती होतो. यामध्ये मेंदूचा एखादा भाग कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. तो भाग काम करत नाही आणि विस्मरण होते.
(ओल्ड एज डिप्रेशन)
.................................
प्रवेश चौथा (पात्र भाऊ आई बहीण आणि मानसोपचार तज्ञ )
आई (तांदळाची परत हातात घेऊन निवडायला बसली आहे परंतु एकाच जागी शून्य नजर लावून बसलेलीआहे)
सून :-अहो आई काय करताय? किती वेळ झाला अशाच बसल्यात.
आई अ, हो हो
सूनबाई:- अहो हो हो काय❓ठेवा ते तांदूळ
मुलगा:-(फोन करतो) हॅलो आशाताई तू जरा दोन-तीन दिवस सुट्टी काढून आई करता घरी येशील का ?
ताई :-अरे काय अडचण आहे का?
अगं मागे तुला फोनवर बोललो होतो ना! गेल्या तीन-चार महिन्यांपासून ती जरा बेचेन असते, तिला कुठे करमत नाही, रात्रीची झोप लागत नाही, पहाटेच उठून बसते. मग छातीत धडधडते ,श्वास लागतो, चक्कर येते ,आतापर्यंत दोन तीन वेळा डॉक्टरांना घरी देखील बोलवावे लागले आहे.
ताई :-मग रे काय सांगितले त्यांनी ?
भाऊ :-त्यांनी रक्त, लघवी, ईसीजी सगळ्या तपासण्या करून घेतल्या,मग कशाचे काय? सगळं नॉर्मल! थोडसं बीपी आहे एवढेच! आणि त्याच्या देखील गोळ्या चालू आहेत. शिवाय आणि एक झोपेची गोळी डॉक्टरांनी रात्री सुरू केली आहे.
ताई:- मग झोपते का ❓
भाऊ :-डायबेटिस ब्लडप्रेशर काय जगात कोणाला नसते? पण हेच आपलं , सतत काळजी करत बसते स्वतःच्या आजाराची. नाहीतर एखाद्या खोलीमध्ये तंद्री लावून बसते.
असा चेहरा करते की जसं काय घरात काही वाईट घडल आहे.
अगं आज काल ती बाळाला देखील सांभाळत नाही. उगाचच स्वतःशी रडते, जीव नकोसा झाला आहे म्हणते, जीव देण्याच्या धमक्या देते .
बाळाला पणआम्ही संध्याच्या माहेरी ठेवतो, तेव्हा कुठे कामावर जाता येते.
ताई:- अरे असं काय बोलतोस? इतके दिवस तिनेच तर बाळाला सांभाळले ना! अरे तिला काहीतरी होत असेल?
भाऊ :-हो गं! तिला खरच काहीतरी होतेच आहे .
ते मला पण जाणवते, पण कधी कधी उगाचच रडते, नीट जेवत नाही. काल पुन्हा धडधडले म्हणून ईसीजी काढला ,तो पण नॉर्मल आला. त्यामुळे आता आपल्या फॅमिली डॉक्टरांनी मानसोपचार तज्ञाकडे जाण्यास सांगितले आहे. त्यांचा पत्ता पण दिला आहे. येत्या सोमवारची appointment पण घेतली आहे.
तरी तू लवकरात लवकर ये !
ताई:- होमी निश्चितच येते
आपण तिला डॉक्टरांकडे नेऊ
.................................
(सीन दुसरा डॉक्टरांचा दवाखाना)
डॉक्टर :-तुमच्या मुलांनी जे जे सांगितले त्यापेक्षा, अजून काय होते? , ते मला नीट सांगा.
आई;- डॉक्टर माझे सर्व चांगले आहे हो! पण हे पाच वर्षांपूर्वी गेले, तसे माझी सर्व सोय करून गेले. माझी तीनही मुले,जावई, सुना सर्व जण चांगले आहेत. काळजी घेतात. काही कमी पडू देत नाहीत .पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून मुलांनी सांगितल्याप्रमाणे खरंच खूप बेचैनी वाटते. निराशा येते, उदासपणा वाटतो, सारखी काळजी वाटते, डोक्यात कलकल होते, डोक्याचा वरचा भाग दुखतो, एकाएकी चक्कर येऊन पडते, छातीत धडधडते, काही आठवत नाही! उगाचच रडावेसे वाटते, झोपेची गोळी खाऊन देखील झोप येत नाही. घरात करमत नाही. जरा बाहेर गेले की सारखी लघवी लागते. त्यामुळे बाहेर पडायची देखील भिती वाटते. औषध उपचाराने सुधारणा होत नाही, डॉक्टर म्हणतात, तुम्हाला काही आजार नाही. जगणं मला नकोस झाल आहे, व डॉक्टर असं वाटतं कधीतरी जीव द्यावा, (आणि त्या रडू लागतात)
मानसोपचार तज्ञ :-
हा एक मनोविकार आहे. याला डिप्रेशन असे म्हणतात . यामध्ये एक्झांइटी ची देखील लक्षणे मिसळलेली आहेत .
हा आजार ओल्ड एज मध्ये होऊ शकतो.
1)रिटायरमेंट मुळे एकाएकी पणाची भावना निर्माण होते. आपण रिकामटेकडे आहोत, आपण निकामी झालो आहोत, असे वाटते.
2) कधीकधी आयुष्याचा जोडीदार नसल्यामुळे किंवा अर्धवट साथ सुटल्यामुळे एकटेपणाची भावना, आयुष्यात रस न वाटणे, इत्यादी गोष्टी होतात.
3) आर्थिक परावलंबन असते, पेन्शनवर दिवस काढणे ,औषधाला खर्च, नोकरीला असणाऱ्या लोकांची पेन्शन तरी असते. नोकरी नसणाऱ्या लोकांची तर त्याहून बिकट अवस्था असते.
स्त्री असेल तर तिची अजूनच कुचंबणा होते. सुनबाई नोकरीवाली असेल तर, घरातील स्वयंपाक पाणी, जबाबदाऱ्या, नातवंडे सांभाळणे, शाळेला सोडणे, इत्यादी गोष्टी महिलेवर येतात.
पुरुष थोडाफार बाहेर पडू शकतो ,तरी पण त्याला देखील नातवंडे वगैरे सोडण्याची जबाबदारी असते .
4) या काळात शारीरिक समस्या होतात, यामध्ये माणसाला ब्लडप्रेशर, डायबिटीस, गुडघेदुखी , हार्ट डिसीज, पुरुषांना प्रोस्टेट ग्रँल्ड वाढणे. या समस्या उद्भवतात.
तसेच अल्झायमर ,डिमेन्शिया या गोष्टी येतात.
या सर्व गोष्टींना औषधे अल्प प्रमाणात काम करतात. परंतु जर घरातून चांगला सपोर्ट असेल तर त्या व्यक्ती ॲडजस्ट होऊ शकतात.
सूत्रधार:- दोन्ही बाजूने जर समन्वय नीट साधला, थोडीफार ॲडजस्टमेंट केली,
तर निभावून निघेल.
मुलांच्या जबाबदाऱ्या
1) ज्येष्ठांना सन्मानाने वागवा
2)त्यांच्या आरोग्याची हेळसांड करू नका.
3)तुमच्या संसाराच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर लादू नका .
ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या
1) मुलांच्या संसारात विनाकारण लुडबुड करू नका !
2)विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका
3)ॲडजस्टमेंट करा
4) भजन ,वाचन ,लेखन, इत्यादी छंदात स्वतःला गुंतवून घ्या, नैराश्य ताळा, आनंदी राहा, उगाचच मी म्हातारी झाले! मी म्हातारा झालो !असे न म्हणता ॲक्टिव्ह रहा.
ज्येष्ठ नागरिक संघ जॉईन करा, समवयस्क ,समविचारी लोकांमध्ये रमा.
घरच्यांना पण नकोसे वाटावे इतपत ताणू नका. आणि हे जर दोन्ही बाजूंनी केले तर की ज्येष्ठांच्या समस्या ची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल.
