जीवनात बदल हा महत्वाचाच

जीवनात बदल हा महत्वाचाच

5 mins
1.5K


लिहिण्‍या पूर्वी सर्वांना माझा सप्रेम नमस्‍कार . मी ह्या अधि ‍ 3-4 ब्‍लॉग लिहिलेत मित्रांनो बर का, आशा करते की माझे विचार तुम्‍हाला नक्‍की आवड़तील.

 

तर मित्रांनों बदल म्‍हणजे आजच्‍या तकनीकी युगाच्‍या काळात अगदी गरजेचे ठरले आहे. बदल ची सुरूवात आधी आपण घरापासूनच करतो नाही का? माझे ह्याचात व्‍यक्तिगत मत असे आहे, की "आपल्‍या जीवनात जसे -जसे आम्‍ही पुढ़े पाऊल टाकत जातो, तसे -तसे अनुभव घड़त जातात" आणि मग त्‍यात बदल च्‍या माध्‍यमाने सुधार करत जातो.

 

जसे अता घरातून सूरूवात केली आहे मी, तर तुम्‍हाला एक साधारण उदाहरण सांगते की, मी लहानपणा पासून आई कड़ूनच शिकले की स्‍वयपाकात सुद्धा रोज आपण वेग-वेगळे चवीष्‍ट पदार्थ करतो, "ते जर एक सारखेच केले तर आपण खाऊपण नाही शकत आणि रूचकर पण नाही लागणार. तर ती चटण्‍या पासून सगळे पदार्थ विविध रूपात करायची". जशे स्‍वयपाक रूचिकर बनो आणि ते सर्वांचा आत्‍मा तृप्‍त करण्‍या साठी निर-निराळे प्रयोग करतो की नाही,"मग तशेच ह्या काळात सर्व क्षेत्रात पण आपण बदल घड़वु शकतो".

 

दिवसोनदिवस आम्‍ही पाहूनच राह्यलो आहे की हा जो काळ चालला आहे तो पूर्ण रूपेण प्रतिस्‍पर्धेच्‍या श्रेणीत बहरून पुढ़े वाढ़तो आहे, जर आम्‍ही त्‍यात बदल नाही केला तर मग आम्‍ही प्रगतिच्‍या मार्गावर पोहचू नाही पावणार. "माझे तर हे मत आहे की कोणती ही नवीन सूरूवात स्‍वता पासूनच सुरू होते म्‍हणून आम्‍ही जेव्‍हां आधी बदल घड़वून आणु तेव्‍हांच तर आपल्‍या पोरांना पण गरजेप्रमाणे बदल ची सवय लावू  शकतो". कुठे पण बदल घड़वण्‍या करिता त्‍याच्या दोनी बाजु सामोरी ठेवाव्‍या आणि मग त्‍यात प्रामाणिक पणे विचार करून निर्णय हा घ्‍यावास लागतो.


बदल हे कोणत्‍या ही रूपात घड़णारी एक क्रिया म्‍हणु शकतो, ते मग निसर्ग असो, माणूस असो, संस्‍था असो कि घर असो, जशी प्रकृति बदलते तशीच परिस्थिति सुद्धा बदलते, काही पण नेहमी एक सारखे राहणे शक्‍य नसल्‍या मुळे प्रत्‍येक परिस्थितिच्‍या सामोरी जाणे भाग असते आणि त्‍याच्‍या साठी शक्‍यतवर आम्‍ही सतत प्रयत्‍नशील ही असतो. "मग सर्व बिंदु सामोरी ठेऊन" ज्‍या बदला मुळे चांगले परिणाम मिळतात ते गतिशील करत जातो आणि ज्‍या बदला मुळे परिणाम ही वाईट येऊन जर त्रास होत असला तर मग त्‍याचात काही सुधार व्‍हावा म्‍हणून काही नवीन बदल करता येतो नाही का ? 


अता मी येथे आपला अनुभव सांगते सर्वांना की संस्‍थें मधे पूर्वी आम्‍ही टाईपिंग मशीनींवर टाईप करायचो बर का आणि स्‍टाफ ही कमी, फक्‍त 30-35 जणांचा स्‍टाफ . मग 8-9 वर्षानंतर एक नवीन अधिकारी आले, मग त्‍यांनी हा विचार केला की संस्‍थेचे काम आताशी खूपच वाढ़त आहे तर असे काही केले पाहीजे की काम ही लवकर होऊन वेळ ही वाचेल आणि त्‍याच कमी वेळात स्‍टाफ कड़ून जास्‍त काम करून घेण्‍या करिता सर्वांना कम्‍प्‍यूटरवर काम करण्‍या करिता तयार केले. "त्‍याच प्रमाणे दिवसोन-दिवस वेळे प्रमाणे इंटरनेटच्‍या सर्व सुविधापण संस्‍थे साठी गरज म्‍हणनूच केले". आम्‍हाला पण ते सर्व शिकणे गरजेच होते, तेथे अशे म्‍हणून चालत नाही ना, म्‍हणूनच आम्‍ही म्‍हणतो "बदल हा प्रकृतिचा नियम आहे". त्‍या अधिकारीला माहित होते असे बदल केले तरच संस्‍थेची उन्‍नति मिळवून त्‍याच बरोबर सर्वांची सुद्धा उन्‍नति नक्‍की होणारच. आज त्‍या बदल मुळेच मी माझे लेखन सुरळीत पार पाड़ते मग ते हिंदी भाषा असो कि मराठी. " वेळे आणि गरजे प्रमाणे आपल्‍याला बदलणे आवश्‍यकच असते" नाही तर मनुष्‍य पुढ़ील प्रगति करूच शकत नाही. आजकल तर हो नेटवर्किंगचाच काळ म्‍हंटले तर काहीच अतिश्‍योक्ति होणार नाही, "शाळेचे पोरान पासून तर कॉलेजचे पोरांना सुद्धा त्‍यांचे प्रोजेक्‍ट आणि इतर क्रियाकलाप कंम्‍प्‍यूटरवरच नेटचे वापर करून पूर्ण करावे लागतात". त्‍याचे कारण हेच आहे की प्रतिस्‍पर्धे साठी पोरांना वर्तमान युगा मधे पुढ़े जायचे गरजेचेच आहे, "त्‍यामुळे शिक्षक त्‍यांना बदल घड़वूनच तैयार करतात", कारण आपण एरवी आपसातच म्‍हणतो आणि मी कितेक जणांनी म्‍हंटलेले ऐैकले आहे की हल्‍ली पूर्वी सारखे काहीच राह्यलेले नाही हो, "अरे असे बोलण्‍याच्‍या अधि हा तर विचार करा की तुम्‍ही तरी आहेत का" ? पहिल्‍या सारखे मग दिवसोन-दिवस काळ बदलला की अशच सर्व गोष्‍टीन मधे बदल घड़णारच हो. 



तशेच सर्व पालकांना आपल्‍या पोरांना काळाच्‍या बदल प्रमाणे शिकवण पण देणे गरजेचेच आहे, मग तो मुलगा असो किव्‍हां मुलगी. "आजकाल आपण पाहूनच राह्यलो आहे की महागाई किती वाढ़त चालली आहे, त्‍यामुळे घरात सुद्धा आई-वडिल दोघांना कामावर जाणे गरजेचेच झाले", म्‍हणूनच घरात सुद्धा जर सर्व एकत्र कुटुंब जर राहात असेल तर पूर्वी च्‍या काळाशी तुलना न करिता अत्‍ताची गरजे प्रमाणे बदल आवश्‍यकच आहे. हे काही एका माणसाचे काम नाही, "घरातल्‍या सर्वांनी आपली-आपली जबाबदारी समजून बदल घड़विण्‍याचा ठांब प्रयत्‍न केला पाहिजे". आपल्‍या ला मुलगा असो किव्‍हां मुलगी त्‍यांना अगदी वेळे प्रमाणेच घरातल्‍या कामांची सुद्धा सवय लावा, अशे म्‍हणून चालणार नहीं बर का, की तो मुलगा आहे तर करणार नाही, "आजकाल त्‍यांना शिक्षणा साठी किव्‍हां नौकरी साठी किव्‍हां काही व्‍यवसाया साठी बाहेर जावेच लागते, तर त्‍यांना अधिपासून जर सवय असेल तर काहीच त्रास होणार नाही हो. अधि त्‍याच बरोबर काळाप्रमाणे त्‍यांची चूक सांगावी अधि समजवावे आणि‍ त्‍याच बरोबर "वस्‍त्र कोणते ही घाला पण व्‍यवस्थित दिसले पाहीजे" . "समाजात बाहेर पड़ायाचे आहे तर काय खरे आणि काय खोटे सगळ शिक्षण व संस्‍कार द्यायचा प्रयत्‍न करावा", अधिचा काळ तसा नव्‍हता हो, अत्‍ताचे वेळे प्रमाणे सगळे चांगल्‍या आणि वाईट गोष्‍टींचे परिणाम सुद्धा जर समजवून सांगितले तर पोरांना तर नक्‍कीच या समाजात बदल घड़वून येणारच, ही मला नक्‍की खात्री आहे.


"मित्रांनों बदल हा महत्‍वाचाच ह्याचावर मी आपले अनुभवाने व्‍यक्तिमत ठेवत आहे, तशे प्रत्‍येकाचे विचार वेगळे असु ही शकतात". पण मित्रांनो जशे मी वर सांगितलेस आहे की "बदल हा जर तुम्‍हाला प्रगति मार्गावर नेणारा असेल तर तो नक्‍की घड़वायला काहीच हरकत नाही "पण ना आजकालच्‍या काळात लग्‍नांच्‍या पद्धति सुद्धा बदलल्‍या आहेत, तर त्‍याचात सुद्धा वेळे प्रमाणे निर्णय घेऊ शकतो. "पण ते पाश्‍चात्‍य पद्धति बघून ते खूप वेळ डांस करणे, वरात काढ़ून रस्‍ता जाम करणे आणि नको ते फाजील पणा करतात, ते अगदी बरोबर नाही, जो पावे तो बदल घड़विण्‍या साठी आपली संस्‍कृति नाही सोड़चाची", हे ही तितकेच खरे आहे नाही का ? आजकाल सर्वांना वेळेची भांगड़ असल्‍या मुळे आपण लग्‍नाच्‍या विधि‍ कमी करू शकतो,शक्‍यतवर अगदी जवळच्‍या नातेबाइकांना बोलावू शकतो आणि नको तो खर्च टाळु शकतो नाही का ? "हा बदल जरूर करू शकतो". 



"असेच मित्रांनो हल्‍ली च्‍या काळा प्रमाणेच सणवार सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात न करिता कमी प्रमाणात पण आम्‍ही करू शकतो" नाही का ? म्‍हणजे की जशे तुम्‍हाला सोईस्‍कर जाईल करायला तशेच सण साजरे करा, अगदी कशाची अड़ी न टाकता. "आजकाल सर्व व्‍यस्‍त जीवन झाल्‍यामुळे सर्वांनाच हा विचार प्रत्‍येक क्षेत्रात केलाच पाहीजे" नाही का ?

 

माझे असे मत आहे की "समाजा मधे सुद्धा जेथे समाज कल्‍याण होत असेल तो बदल करता येईल तर तेथे केलाच पाहीजे". बदल म्‍हणजे कोणाला ही मानसिक त्रास देणारा बदल नव्‍हे. बदल म्‍हणजे ज्‍याच्‍या पासूनन जर मानसिक शांति होत असेल जगा मधे तर तो निसंशय बदल करायला काहीच हरकत नाही.


 

 तर मित्रांनो कसे वाटले माझे विचार, आपले मत सांगाल मग नक्‍की?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational