Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Anil Kulkarni

Abstract


2  

Anil Kulkarni

Abstract


इंटरनेटच्या जाळ्यात...

इंटरनेटच्या जाळ्यात...

5 mins 96 5 mins 96

आंतरजालाच्या जाळ्यात तरुण पिढी कोळया प्रमाणे अडकली आहे.सध्या लॉकर रुमने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.देश केवळ वैधानिक इशारऱ्या नी चालत नाही तर शिस्तीने चालतो. वैधानिक इशारा म्हणजे स्वैराचाराला दिलेलंप्रमाणपत्रआहे.अश्लीलता संस्कृतीस घातक आहे हा वैधानिक इशारा अजून आला नाही.


नैतिकता जेव्हा दगिन्याप्रमाणे लॉकर मध्ये ठेवलेली असते तेव्हा ती असून नसल्यासारखी असते. प्रेमाला उपमा नसते. वासनेला प्रतिमा नसते. वासना ऑक्टोपसप्रमाणे असते, आकारहीन असते. प्रत्येक माणसात राक्षस असतो व माणसातला राक्षस केव्हा जागा होईल हे सांगता येत नाही. जसं ऑक्टोपस केव्हा आकार बदलेल ते सांगता येत नाही. मनातील मळभ दूर करण्यासाठी होळीत शिव्या देण्यापलिकडे आमची मुलं कधी पुढे गेली नाहीत. पण शाळेतील मुलं फेक अकाउंट उघडतात आणि अश्लीलतेच्या चर्चा करून बलात्कारापर्यंत जातात, तेव्हा पालकांनी नक्कीच गांभीर्याने ही बाब घ्यायला हवी. या आधीची पिढी अभिजात वांग्मय, अध्यात्मावर, नैतिकतेवर पोसली गेली.अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून प्रेम पहिली पायरी सोडून त्यांनी एकदम वासनेची पायरी गाठली हे भयावह आहे. पालक सुधारले तरच बालक सुधारतील. प्रेमचंद शरदचंद्र, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज ही नावेही माहीत नसलेली व माहित करून घेण्याची गरजही वाटत नसलेली पिढी पालकांसाठी डोकेदुखी व आव्हान ठरत आहे.


अनेक नियंत्रित, अनियंत्रित गोष्टींचा वावर आमच्या सभोवताली आज आहे. आम्हीच तो निर्माण केला आहे. बॉईज लॉकर रूम हे हिमनगाचे केवळ टोक आहे. AIBC या उच्चभ्रू समाजाच्या कार्यक्रमात अश्लीलता बोलली जात होती. निर्भया प्रकरण झाले तरी निर्भयपणे स्त्री विटंबना चालूच आहे.काही शाळकरी मुलांचा आजचा गृहपाठ, वर्गपाठ अध्ययन अध्यापन प्रक्रिया नको त्या मार्गाने जात आहे. हे यावरून लक्षात येते. नको त्या वयात नको ते पाहिलं की मुलं अस्वस्थ होतात, उद्ध्वस्त होतात. अभ्यासाची चर्चा न करता अश्लीलतेची चर्चा करून सामूहिक बलात्काराचा गृहपाठ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. गेम खेळून मुले मृत्यूला कवटाळत आहेत, बलात्काराचे नियोजन करत आहेत तरी काही संकेत स्थळ बंद होत नाहीत.काही घरात जेव्हा भ्रषटाचाराने लक्ष्मी नांदते हे मुलं पाहतात तिथं नैतिकता खुंटीला टांगलेली असते. पॉर्न पाहण्यात भारताचा तिसरा क्रमांक आहे.


कालांतराने प्रेम, अनुनय, शृंगार, प्रणय, यौवन शब्दांना अर्थ राहणार नाही. वासना हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे वाटणारा एक वर्ग तयार होत आहे. भावविश्व काम विश्व झालं आहे. शाळा, घर यांना घरघर लागली आहे. घराला घरपण देणारी माणसे राहिली नाहीत. आदर्श माणसे जेव्हा लॉकप मध्ये जातात तेव्हा आदर्श केवळ पुतळ्यात उरतात. पूर्वी संस्कारचा वावर कुटुंबात समाजात असेआज विकारही आमच्या उंबरठ्याबाहेरच नाही तर आत ही आला आहे. तंत्रज्ञानाचा वावर व वापर इतका प्रचंड प्रमाणात वाढला की भावनेला पायदळी तूडवून अनेक चांगल्या गोष्टी लॉकर मध्ये टाकून घराच लॉकर रूम केव्हांच झाल आहे.मुलांच्या नशिबात श्यामच्या आईची कुशी नाही तर मोबाईल च्या कुबड्या आहेत. प्रेमस्वरूप आई हे त्यांच्या कानावर पडतच नाही तर हॅपी मदर्स डे एवढेच त्यांच्या कानावर पडतं.मुलांच्या हातात वासनेच खेळणं आलं आहे.एखाद्या गोष्टीचा अनिर्बंध वापर व वावर घातकच.


लॉकप रूममध्ये अश्लीलतेच्या जगात सर्व व्यवहर करत आहेत. पूर्वीची पिढी पालकांच्या धाकात होती जी आज बालकांच्या धाकात आहे. अश्लीलता घरात आली आहे, मालिकेतही आली आहे चित्रपटात, साहित्यात आली आहे. संस्कारांचा टिपकागद किती पुरणार. मनाला लॉक डाऊन करता येत नाही, कारण मन भरकटतं. मन वढाय वढाय.वासना केवळ झिरपत नाही तर त्याच्या प्रचंड धबधब्याखाली आमची तरुण पिढी न्हावुन निघत आहे. वयात यायच्या आधीच मुलांनी वासनेचा रस्ता धरला आहे. भवतांल जेव्हा लय हरवुन बसतं तेव्हा जीवनाचा ताल बिघडतो.चुंबन, आलिंगन, बलात्कार आपल्या मुलांसमवेत पाहणाऱ्या कुटुंबाला आता त्या दृश्याचं, इंटीमेट सिंनचं काहीच वावगं वाटत नाही.


Intimate seen कसे करणार व पाहणार हा समाजासमोर, पालकासमोर प्रश्न आहे.आपली मुलेच Intimate sin करत आहेत हे अनेक पालकांच्या गावीही नाही. नात्यात पारदर्शकता नसणे ही व्यभिचाराची सुरुवात आहे. घरच्याबरोबर नको ते मुले पाहतात. मुलेही शॉक अब्सोरबर झाली आहेत. रक्तात काय भिनतं याला खूप महत्त्व आहे,संस्कार की विकार. श्यामच्या आईच्या संस्काराला गाडून कार्टून च्या इमारतीत मुले हसत खेळत बागडत आहेत. त्यांच्या समोर निसर्ग येतंच नाही. फक्त अश्लीलतेचा संसर्ग येतो.


मनाचा वापर व वावर संयतपणे करण्याचं कौशल्य ज्याला जमलं तो जग जिंकेल.वावर मनाचाही असतो,व शरीराचा ही असतों.मन शरीरावर हावी होते, तेव्हा वासनेचा जन्म होतो.शरीर जेव्हा मनाला जिंकतं तेव्हा प्रेमाचा वावर सुरू होतो. अनेक तत्ववेत्ते ज्यांचा वावर आमच्या जीवनात आजही आहे.मनाचा वावर सर्वत्र असतो. मुळात मन हे इतके चंचल आहे की ,मनात येणाऱ्या गोष्टीही तितक्याच चंचल असतात.आपल्या मनाला संभ्रम पडतो की, आपला व मनाचा वावर नेमका कुठे आहे? मन एकीकडे आहे वाटत असतानांच, कधी दुसरीकडे जातं, समजत नाही.


झटक्यात मनाच्या हिंदोळ्याचा वावर इकडून तिकडे झुलत असतो. मनाचा वावर शरीरातही असतो शरीरा बाहेरही असतो. माणूस प्रेमाचं नाटक करता करता, त्याचा वावर अचानक वासनेच्या प्रांतात कधी होतो हे त्यालाही कळत नाही. माणसातला राक्षस जागा कधी होईल सांगता येत नाही.

अनिर्बंध वावर रोखण्यासाठी संयमाचा लगाम हवांच. वावर हा चांगल्यातून चांगल्या कडेच व्हायला हवा. मनाला वावर करण्याचे स्वातंत्र् हवे. संस्कारांचा योग्य वावर आजूबाजूलाअसेल तरच व्यक्तिमत्व घडतें. घरात काही गोष्टींचा वावर आवश्यक आहे. भरल्या घरात प्रत्येकाचं असणं एक संस्कार देऊन जातं. माणसांचा वावर असतो तो संस्कारातून आलेला असतो आणि त्यामुळेच आपण आपल्यात मूल्येें रुजवून घेतो. अनुवंशिकता चांगली असेल तर आपणही चांगले होतो. प्राप्त परिस्थितीत आपल्या वरही चांगल्या वातावरणाचा प्रभाव असेल तर परिणाम चांगला होऊ शकतो. आपल्या गुणसूत्राचा वावर ठरवतो,आपण कोण होणार.


बाह्य परिस्थितीत हि कोणत्या गोष्टीचा वावर आपल्या आयुष्यात करून घ्यायचा, ह्याच्यावर सुद्धा व्यक्तिमत्त्वाचा विकास अवलंबून आहे.

भवताल महवाचं आहे .अनेक दृश्य-अदृश्य गोष्टीचा वावर आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकाचे मूल्य वेगळे, संस्कार वेगळे, विकार वेगळे. आत्मा अदृश्य असला तरी तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो. मागील पिढ्यांचा वावर आपल्यात शरीराने नसला तरी वारसा रूपाने असतोच.

कोणत्या गोष्टीचा वावर होऊ द्यायचा व कोणत्या गोष्टीचा नाही हे आपल्या हातात जरी असलं तरी, काही गोष्टींवरआपले नियंत्रण नसते. असंख्य विचार चांगले-वाईट, असंख्य स्वप्न यांचा वावर मानवाच्या आयुष्यात सतत चालू असतो. अनेक गोष्टीचा वावर, दुःखदायक असतो, अनेक गोष्टींचा वावर सुखावह असतो,अशा वेळेस जीवनात ही घडी अशीच राहू दे असं वाटतं.


माणसे नाहीसे होतात पण त्यांच्या विचारांचा पगडा नकळत आपल्यामध्ये असतो. चांगल्या गोष्टीचा वावर असेल तर चांगलीच कृती घडते. विकृत गोष्टींचा वावर असेल तर विकृती निर्माण होते. चांगल्या वाचनाच्या वापराने व्यक्तिमत्व परिपक्व होते. विचारांचा ,आचारांचा वावर चांगला असेल, तर विवेकानंद निर्माण होतात. अतिरेकी संघटनांचा वापर असेल तर ओसामा बिन लादेन निर्माण होणार. अनेक गोष्टींचा वावर आपल्या हातात नाही पण त्याचा वापर आपल्या हातात निश्चित आहे.चांगुलपणाचा वावर चांगली व्यक्ती निर्माण करते.


जसा वावर तसा संस्कार. कोणत्या गोष्टीचा वावर आपण होऊ देतों, याच्यावर आपल्या आयुष्याच्या गुलमोहर होणार की निवडुंग होणार हे ठरतं.

तंत्रज्ञानाचा वावर एवढा वाढला की मरणासन्न माणसाला वाचवण्याचे सोडून लाईव्ह चित्रीकरण करून वायरल करण्यात धन्यता मानली जात आहे.

कुटुंबात भावनेचं पालनपोषण नाही. माणसात घरांचा वावर कमी झाला. नाती समजावून सांगावी लागतात. मुलें पोकळीत वाढत आहेत. घरात वावर आहे तो फक्त यंत्रांचा. यंत्राचा वावर असेल तर भावनाशून्य, कोरडी माणसें रोबोट सारखी होतील.हे थांबायला हवं. दुःखाचा वावर असूनही यशोशिखराकडे जाण्यांतच खरं कौशल्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत, संघर्षाच्या मुशीतून अनेक महिला, पुरुष सामर्थ्यवान ठरलें आहेत.


भवतालचा वावर प्रतिकूल असला तरीही त्याच्यातून आरपार जाऊन, त्याला छेद देऊन यश गाठलंच पाहिजे, यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे.

लता, पु.ल.शेक्सपियर,यांचा वावर आजही व्यक्तिमत्त्वाला आकार देतो. मुलांना चांगले ऐकू द्या चांगलं पाहू द्या आस्वाद घ्यायला शिकवा रसग्रहण करायला शिकवा निसर्गाच देणं, नक्षत्राचं देणं, शरदाचं चांदणं, शब्दांच्या पलीकडे जायला शिकवा.

हतबल पालकांनी कठोर व्हायची वेळ आली आहे.

अनैतिकतेला लॉकरमध्ये टाकायची वेळ आली आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Anil Kulkarni

Similar marathi story from Abstract