Tukaram Biradar

Classics

2  

Tukaram Biradar

Classics

इमान राखुन सेवा करा

इमान राखुन सेवा करा

1 min
128


  आज जीवनात सर्वच क्षेत्रात प्रामाणिकपणा,इमानदारी नाहीसा होत चालली आहे. एखादी सरकारी नोकरी लागेपर्यंत माणसाला असे वाटते की, मला नोकरी लागल्यावर इमाने इतबारे सेवा करून. परंतु एखादी नोकरी मिळाली की, त्या पडलेल्या स्वप्नाचे कसे होते हे कळतसुद्धा नाही. सरकारी नोकरी चांगला कामधंदा या बाबतीत कामचुकारपणा अधिक वाढत. निवडूनआलेल्या लोकप्रतिनिधीमुळे देशामध्ये लबाडी, बेईमानी, भृष्टाचाार हा खुुप मोोठ्या प्रमाणात वाढला आहे.नको त्या लोकप्रतिनिधीचे कामातहस्तक्षेप वाढल्याने योग्य माणसाला न्याय देणे अवघड झाले आहे. पैशाचा अपहार करणेे काम न करता पैैसे खाणे, ज्या कामासाठी पैसा मिळतो ते काम न करता पैसे मिळविणे. सरकारी अधिकारी लहान असो की मोठा आपल्याला मिळणारे पगाराबरोबरच टेबलाखालून जास्तीत जास्त काय मिळविता येईल याकडे लक्ष लागून राहिलेलेे असते. 

  परमेश्वराने आपल्याला चाांगला देह दिला आहे. या देहाचा उपयोग माणसाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. आणि जो माणूस असे करतो तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो. माणुसकीची जपणूक करून इमान राखुन आपले कर्तव्य माणसाने पूर्ण केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने जीवनात किती संपत्ती जमा केली आहे हे कोणी पहात नाही. परंतु त्यांनी कशी संपत्ती जमविली याकडे मात्र सर्वाांचे लक्ष असते. केवळ मन वाटेल ते करुन पैैैसा मिळविला पाहिजे हे ध्येय माणसाचे कधीच असता काम नये. 

जो आमच इतबारे सेवा करतो, काम करतो त्याला निश्चितच यश मिळते. म्हणून कोणत्याही माणसाने आपल्याला परमेश्वराने जे सोपवून दिलेले कार्य आहे तेच कार्य परमेश्वरी कार्य समजून इमानेइतबारे कामे केली पाहिजे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics