Hemangi Sawant

Abstract Fantasy Romance

4.9  

Hemangi Sawant

Abstract Fantasy Romance

ह्यूमन v/s रोबोट

ह्यूमन v/s रोबोट

10 mins
1.3K


वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मी खितकीतून बाहेर त्या भरलेल्या आभाळाला बघत उभी होते आणि तो पहिला दिवस डोळ्यासमोर आला. आमची पहिली भेट....



"आधीच खुप लेट झाला आहे आणि त्यात या स्कुटीच्या टायरची हवा पण आताच निघायची होती.." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले. आजू बाजूला नजर टाकली आणि समोर एक सायकल रिपेअर करायचं दुकान दिसलं. तशी मी गेली आणि टायर ठीक करून घेतला. त्याचे पैसे देत निघाली... खरतर आज पहिलाच दिवस होता माझा, त्या महागड्या नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन जे मिळालं आहे... 


मी रेवती नाईक..मध्यम वर्गीय घरातील... मला एका नामांकित कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळाली आहे... आमच्या इथल्या मोठया, हायफाय लोकांचं कॉलेज.. आज माझा पहिलाच दिवस होता आणि त्यात मी या जुन्या झालेल्या स्कुटीमुळे लेट झाल होत..




स्कुटी पळवत मी निघाले असता समोरून आलेल्या एका कारचा धक्का मला लागला आणि मी खाली कोसळले... ते बोलतात ना आपण जेव्हा सर्वांत जास्त घाईत असतो तेव्हाच या अशा घटना घडतात... "ओ हॅलो..., दिसत नाही का..???" मी रस्त्यावरून उठत त्या गाडीच्या मागच्या काचेमध्ये जाऊन विचारलं. त्या गाडीचा ड्राइव्हर बाहेर आला.. "मॅडम सॉरी.. आम्ही जरा घाईत आहोत." तो ड्राईव्हर बोलला. पण मी काही ऐकायला तय्यार नव्हते.. "तुमच्या आत बसलेल्या सरांना बोलवा. दिसत नाही का एक मुलगी खाली पडली तरी बाहेर येऊन सॉरी बोलावसं वाटत नाहीये ते..." मी जरा रागातच बोलते झाले. 




मी त्या ब्लॅक काचेमधून कोणी आत आहे का बघत होते. पण तो ड्राइव्हर काही मला आत बघू देत नव्हता. "मॅडम.,बोललो ना तुम्हाला सॉरी.. सरांकडून मीच माफी मागतो." एवढं बोलुन तो आत जायला लागला.. हे बघून मी त्याच्या कॉलरला पकडले.. "एवढा कसला माज.. पैशाचा का..?? हे घे माझ्याकडून तुमच्या सोकॉल्ड पॉश गाडीला काही झालं असेल तर ठीक करून घ्या." मी माझ्याकडचे काही पैसे त्या ड्राइव्हरच्या हातात देत बोलले. एवढं बोलून सुद्धा मागच्या सीटवरची व्येक्ती काही बाहेर यायला बघत नाही बघून तर मी चांगलेच भडकले आणि काचेवर आपले हात बडवू लागले. 




हे बघून तो ड्राइव्हर मात्र चांगलाच वैतागला. हे सगळं चालू असताना गाडीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि एक वीस वर्षांतील मुलगा बाहेर आला.. त्या मुलाचं पूर्ण शरीर झाकलेल. एवढं ऊन असतानाही त्याने ब्लॅक कपडे घातले होते. "एक्सक्युज मी... किती नुकसान झाल आहे." अस बोलत तो पुढे आला माझ्या हातात काही पैसे ठेवत काही न बोलता गाडीमध्ये जाऊन बसला. माझ्या डोळ्यादेखत त्याची ती महागडी गाडी निघून गेली. 



मी रागात पाहिलं. नंतर लक्षात आलं की., मी कॉलेजमध्ये जायला लेट होतेय. स्वतःची स्कुटी घेऊन मी देखील निघाले.. जरा लेटच झालेला. मोठं कॉलेज.., तिथे येणारे सगळे श्रीमंत होते. आम्हच्या सारख्या काही मध्यम वर्गीय मुलांना दरवर्षी स्कॉलरशिप मिळायची आणि त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन. यावर्षी त्या लिस्टमध्ये मी देखील होते.. 





मी गेटमधून आत जाताच तिथल्या काही सिनिअर मुलांच्या ग्रुपने माझी रॅगिंग करायला सुरुवात केली.. त्यातल्या एका मुलाने माझ्या जवळ येऊन एक जोरदार खानाखाली लगावली. हे बघून मात्र माझं डोकच फिरलं आणि मी काहीही विचार न करता त्या मुलाच्या कानाखाली लावली. त्यामुळे सगळीकडे आवाज पसरला. मी केलेल्या कृत्याने सगळेच अवाक होऊन बघत होते. मी त्या ग्रुपला न बघताच त्यांच्यासमोरून पळुन स्वतःच्या क्लासरूमध्ये निघुन आले. 





एका बेंचवर एक साधीशी मुलगी बसलेली बघून मी तिच्या बाजूला जाऊन बसले. "हॅलो.., मी रेवती नवीन स्टुडेंट आहे." मी स्वतःचा हॅट पुढे केला. "हॅलो.., मी रिया. मी पण इथे नवीन आहे." तिनेही स्वतःचा हात पुढे करत स्वतःचा परिचय करून दिला. आम्ही लगेच चांगले फ्रेंड्स झालो., कारण ती देखील माझ्याच सारखी स्कॉलरशिप मिळवून आलेली होती. हे सगळं चालू असताना अचानक प्रिन्सिपल सर आले आणि सोबत तोच मुलगा. सगळे उभे राहून आम्ही त्यांना गुड मॉर्निंग विश केलं. 



"हॅलो स्टुडेंट..., मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि आजपासून आपल्याला जॉईन होत आहेत मिस्टर राविश देशमुख." त्यांनी त्या मुलाची स्वतः ओळख करून दिली. सगळे त्याला बघतच राहिले. सकाळी नीट दिसला नाही म्हणून मी देखील त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत होते. 




त्याने घातलेले ब्लॅक लॉंग जॅकेट, हातात ब्रॅण्डेड घड्याळ, पायात इंपोर्टेड शूज, आणि हातात आय-फोन. दिसायला एकदम गोरा.., डोळ्यांवर महागातल सनग्लासेस, जे त्याने नुकतंच काढलं आणि त्याच्यात त्याचे ते हिरवे गरीरे डोळे. कोणी ही प्रेमात पडतील असेच होते. 




तो चालत येऊन माझ्या बाजूच्या एका सीटवर बसला. त्याच माझ्याकडे लक्ष जाताच त्याने स्वतःची मान लगेच फिरवली. हे बघुन मला ही राग आला. आधीच त्याच्यामुळे सकाळी आमच ऍकसिडेंट होता होता राहील होत. आणि त्यात आता अस वागणं. मी देखील लगेच स्वतःच नाक मुरडत समोर पाहिलं. आज पहिलाच दिवस म्हणुन जास्त काही लेक्चर नव्हते. टीचर येत आणि ओळख करून द्यायला सांगत. या सर्वांत तो मात्र काहीच बोलत नव्हता की, त्याला कोणी काही विचारत होतं. हे जरा विचित्र होत पण, काय माहित मोठ्या माणसांमध्ये होत असाव अस समजून मी दुर्लक्ष केलं. 





काही वेळाने मी आणि रिया कॅन्टीनमध्ये आलो. तिथल्या श्रीमंतांच्या मुली आम्हाला बघुन सारख्या नाक मुरडत होत्या. हे बघून मला भारीच राग येत होता.. "अरे आपण काही माणसं नाही आहोत का.?? जे अस वागणुक देत आहेत इथले सगळे." मी जरा रागातच रिया ला बोलले. तिने स्वतःचे हात वर करत जाऊदे एवढंच काहीस केलं आणि समोरच्या डिश मधलं लंच संपवत बसली. "अरे.., माझी खीर संपली आहे मी आलेच घेऊन." अस बोलून मी गेले आणि घेऊन येताना रागिश समोर आला आणि माझी सगळी खीर त्याच्या कपड्यावर पडली. "हेय.. यु., दिसत नाही का..?" तो जरा रागातच बोलला.. "सॉरी सॉरी माझ्याकडून चुकून झालं." मी त्याची माफी मागत होते. त्याने एक जळजळीत कटाक्ष टाकत तिथून निघून गेला. 




मी पळत रिया बसली होती तिथे आली आणि घडलेले तिला सांगितलं. "अरे रेवती यार.., तुला माहित आहे ना..,हे इथले सगळे जरा अकडु आहेत सांभाळून रहा." एवढं बोलत ती निघून गेली. मी देखील जास्त विचार न करता निघाले. 





असेच आमचं नवीन कॉलेजमधले दिवस ठीक जात होते. तिथले श्रीमंत मुलं आणि सोबत मुली आमच्यासारख्या मध्यम वर्गीय मुलांना त्रास द्यायचे. सगळे सहन करत, पण मी नाही.. मला माझ्या घरच्यांनी कराटे शिकवलं असल्याने मी त्यांना उत्तर देत होती. त्यामुळे खुप कमी जण माझ्याशी पंगे घेत. अशाच एका दिवशी कॉजेलवरून घरी जाताना मी माझी स्कुटी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेले असता काही मुलांनी माझ्यासोबत रॅगिंग करून माझा व्हिडिओ बनवायचा ठरवून आले होते. 



पण मला कराटे येत असल्याने मी त्यांना चांगलाच मारलं. पण एकाने मागून वार केला आणि मी खाली कोसळले. त्यामुळे मी खाली बेशुद्ध पडले असता, एकाने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो पुढे आला. हे रागिशने पाहिलं. आधी तो काही गाडीबाहेर येत नव्हता, पण त्यानंतर समोरच दृष्य बघून तो आला आणि त्याने त्या मुलांना चांगलीच अद्दल घडवली. मी बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यानेच मला उचलुन स्वतःच्या घरी आणल. 




मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एक आलिशान बेडरूममध्ये झोपले होते. माझे कपडे ही कोणी तरी बदलले बघून मी चांगलीच ओरडली. माझं ओरडणं ऐकून रागिश बाहेर आला. "काय झालं ओरडायला. ?" त्याने आत येत विचारल. "माझे कपडे कोणी बदलले.???" मी स्वतःच्या अंगाभोवती चादर लपेटून बोलले. "डोन्ट वरी.., मी काही नाही केलं आहे. आमच्याकडच्या एका गर्लने तुझे कपडे चँगे केले आहेत." आणि त्याने पार्किंगमध्ये घडलेला प्रकार सांगितला. 




हे ऐकून मी चांगलीच घाबरी आणि त्याचे आभार ही मानले.. "थँक्स... तु आज नसतास तर माझ काय झालं असत." एवढं बोलून ती त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही एक स्माईल देत . "इट्स ओके" एवढंच बोलला. मीच स्वतःचा हात पुढे करत विचारले...,"फ्रेंड्स..?" माझ्या हाताला बघून त्याने ही आपला हात पुढे केला. पण लगेच काढून घेतला. मला जरा वेगळं वाटलं. पण हे श्रीमंत लोक काही ही करु शकतात म्हणुन मी सोडून दिलं. पण त्याच्या हाताचा स्पर्श वेगळा जाणवला. थोडावेळ बसून तो बाहेर निघुन गेला. 





मी देखील माझे कपडे बदलुन खाली आले. त्यांचा बंगला एखाद्या पिक्चर्समधल्या बंगल्यासारखा होता. मी खाली येताच एक नोकराने मला डायनिंग टेबलाजवळ घेऊन गेला. त्या टेबलावर खूप काही खायला ठेवलं होत ते बघून माझ्यातर तोंडाला पाणीच सुटलं.. आणि मी सगळं अक्षरशः तोंडात कोंबत होते. हे बघुन कधी नव्हे तो राविश खळखळून हसत होता. हे बघुन मी ओशासळतच हसले. सगळं करून त्यानेच मला घरी सोडलं. आता आमची छान फ्रिएन्डशीप झाली होती. पण एक होत तो कॉलेजमध्ये असताना माझ्याशी कधीच बोलत नसे. पण बाहेर मात्र खुप काळजी घ्यायचा. 




त्याने त्या मुलांना ही पोलिसांच्या हवालि केलं ज्यांनी माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते देखील श्रीमंत असल्याने बेलवर बाहेर आले होते. एके दिसशी मी आणि राविश बाहेर गेलो असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांच्या गाडीने आमच्या गाडीला घेरलं आणि काही लोकांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. हे सगळं राविशने छान सांभाळून घेतलं. पण शेवटच्या एका गाडीतल्या एका माणसाने पिस्तुल मधली गोळी माझ्या दिशेने झाडली असता ती राविशने स्वतःच्या हातावर झेलली आणि त्या माणसाला त्याच्याच गनने मारल. पण यासर्वांत त्याला दुखापत झालेली बघून मी त्याला गाडीत बसवलं आणि पोलिसांना कळवलं. मी लगेच त्याला त्याच्या घरी घेऊन आले. 




घरी घेऊन येत असताना माझ्या हाताला त्याच्या पाठीचा स्पर्श होत होता आणि मला तिथे जाणवलं की, काही वायरि सारखे पार्ट्स बाहेर आले होते. आणि त्याची स्किन देखील फाटली होती.., पण त्यातुन रक्त काही येत नव्हतं. तर त्या जागेतून आतील भाग दिसत होता जो एखाद्या स्टील सारखा होता. हे सगळं बघून मी चांगलेच गोंधळे होते. काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो. त्याला पोहोचुन मी माझ्या घरी आले. पण डोक्यात विचार थैमान घालत होते. आज आपण जे पाहिलं ते खरच खर होत की भास हे काही केल्या कळत नव्हतं. 




असेच दिवस जात होतं. पण त्या दिवसापासून आमचं भेटणं काही केल्या होत नव्हतं. मी जेव्हा राविशला कॉल करायचे तो घेत नव्हता. तो मला इग्नोर करू लागला होता. त्याच्या इग्नोर करण्याचा मला मात्र त्रास होत होता..,कारण राविश मला आवडू लागलेला.. पण त्याच असं इग्नोर करण मला हर्ट करत होतं. अशीच घरी बसले असता दारात एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक ड्राइव्हर बाहेर आला. मला बंगल्यावर राविश ने भेटायला बोलावल होत. मी लगेच तय्यार होऊन निघाले. 




मी रूममधे गेले असता राविश लॅपटॉप वर काहीतरी करत होता. मी जाताच त्याने ते थांबवलं. "कशी आहेस..?" त्याने जवळ येत विचारल. मी मानेनेच ठीक असा इशारा केला. "मी उद्या पॅरिसला जातो आहे कायमचा.., यापुढे आपण फ्रेंड्स म्हणून नाही राहू शकत. मला विसरून जा" त्याने समोर बघत त्याचं वाक्य पूर्ण केलं. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसत मी तिथून निघून जात असताना त्याने माझा हात धरला आणि मला घट्ट मिठित घेतलं. मी देखील जोर जोरात रडु लागले. "काय झालं रडायला...??" त्याने प्रेमाने विचारल असता मी त्याला लटक्या रागात मारल. "तु का जातो आहेस मला सोडुन.. एवढी वाईट आहेत का मी" मी रडत बोलले. 




माझ्यापासून दूर जात...., एक दीर्घ श्वास घेत तो बोलु लागला. "रेवती मी माणूस नाहीये... मी माझ्या बाबांनी बनवलेला एक रोबोट आहे. त्यांच्या मुलाचा कार ऍकसिडेंटमध्ये मृत्यू झाला हे ऐकून त्यांच्या बायकोने म्हणजे माझी आई देखील हे जग सोडून गेली. हे माझ्या बाबांना सहन नाही झालं आणि त्यांनीच माझा शोध लावला. 




माझे बाबा एक साइन्स्टिस आहेत. खुप वर्ष मेहनत करून त्यांनी मला बनवल आहे. माझ्यामध्ये ते सगळं आहे जे इतर मुलांमध्ये असतात. भावना, बुद्धी, विचार करण्याची शक्ती.., ते आता पॅरिसमध्ये आहेत. त्यांना त्या दिवशीच्या हमल्या बद्दल कळल्यापासून त्यांनी जास्तच टेंशन घेतलं आहे. म्हणून मला जावं लागेल." एवढं बोलून तो बेडवर बसला. 




सगळं ऐकून मी मात्र स्तब्ध झालेले. कारण आपण एका रोबोटवर प्रेम केलं. स्वतःशीच पुटपुटले. "अजून एक..., तो माझ्याकडे बघत बोलला.., "माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे रेवती. पण मी तुझी साथ नाही देऊ शकत. मला माझ्या बाबांकडे जावं लागेल. उद्या सकाळची माझी फ्लाईट आहे आणि मी जाणार आहे कधीही न येण्यासाठी.,म्हणून आज तुला बोलावून घेतलं." एवढं बोलून तो देखील रडु लागला. त्याला रडताना बघून मी धावत जाऊन त्याला मिठीत घेतलं. 




काही वेळ त्याच्याच मिठीत होते. त्या वातावरणात राविशने त्याचे मऊ उबदार ओठ माझ्या ओठांवर कधी टेकवले हे देखील मला कळलं नाही. पण त्या क्षणी मी स्वतःला थांबवु शकले नाही आणि त्याच्या ओठांमध्ये हरवून गेले.. जाग आली ती दरवाजा ठोकवण्याच्या आवाजाने. मग जेवुन आम्ही परत गप्पा मारत बसलो. मी त्याला डोळेरून बघून घेत होते. कारण तो परत कधीच मला दिसणार नव्हता. काही वेळाने त्याने मला घरी सोडलं. 





ती रात्र त्याच्या आठवणीत गेली. जाग आली तेव्हा घडाळ्यात दहा वाजून गेले होते. मी तशीच बाहेर आली. समोर बाबांनी टीव्हीवर न्युज लावली होती. त्यावर पॅरिसला जाणाऱ्या प्लेनच्या अपघाता बद्दलची हेडलाईन बघून मला तर चक्करच आली.





मी स्वतःला सावरुन आत आले आणि राविश ला कॉल करायचा प्रयत्न करू लागले. पण त्याचा कॉल काही लागत नव्हता. मी सारख ट्राय करून ही तो घेत नव्हता.. तशीच बेडवर पडुन खूप रडले... त्याच माव मोबाईल वर झळकल म्हणून मी आनंदने कॉल घेतला. पण पलीकडून आवाज मात्र अनोळखी होता.. "तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती व्यक्ती आता या जगात नाही." हे ऐकून तर मी खालीच कोसळले. 




जेव्हा शुद्धीमध्ये आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. तिथे कळलं की मला दोन दिवसांनी जाग आली आहे. स्वप्न असेल म्हणून मी माझा मोबाईल घेतला आणि राविशला कॉल केला पण त्याचा नंबर बंद येत होता. बाजूला पडलेल्या न्यूजपेपर मध्ये त्याचा मोठा फोटो आणि त्याच्या अपघाताची बातमी छापून आली होती. ते बघून मी अजून ही रडत होते.




आज राविश जाऊन दोन वर्ष उलटली होती.. पण मी अजून ही त्याच्या आठवणीत रमून असते. भले तो रोबोट होता.., पण त्याच्यावर जिवापाड प्रेम मी केलं होतं. आणि एका रोबोटने माझ्यावर केलेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नव्हते. समोर आभाळ भरून आलेलं. हातातला वाफळलेला चहा तसाच ठेवुन दिला... स्वतःचे डोळे बंद केले असता आठवले ते..., राविशचे ते गहिरे हिरवे डोळे. आणि मी सुखावले. समोर पाऊस कोसळत होता आणि मनात राविशच्या आठवणींचा पाऊस बाहेर पडु पाहत होता. 


प्रेम हे असच असत. सांगता नाही येत कोणासोबत, कधी प्रेम होईल. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract