सोबतीची सर
सोबतीची सर
डोळ्यातले अश्रु उशी वर येउन थांबत होते. पण तो मात्र तिच्या जाण्याने जरा जास्तच स्वतःला त्रास करून घेत होता. काय करणार त्याच्या सर्वात जवळची व्यक्ती तो आज गमावून बसला होता.... अचानक लाईटच बटन दाबण्याचा आवाज ऐकताच तो शांत झाला. लगेच डोळ्यातले अश्रू पुसत चादर ओढुन त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर घेत झोपता झाला. आज दोन वर्ष झालेली तिला जाऊन. पण तो मात्र तिच्यासाठी अजूनही झुरतोय. त्याच खूप प्रेम होतं तिच्यावर अगदी मनापासून. अजून ही आहे पण ती नाहीये आज.
त्यांची ओळख झालेली ती कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये. काही मुलं तिची रॅगिंग करत होती. सगळे बघत होते पण मदत मात्र कोणी करत नव्हत. तिचा पहिलाच दिवस होता कॉलेजचा आणि रॅगिंग चा ही. सिनिअर तिला कॅन्टीनमध्ये सर्वांन समोर डान्स करायला सांगत होते. तो आला त्याचा ही पहिलाच दिवस, पण मागे पुढे न बघता त्याने सर्वांन समोर जाऊन सिनिअर मुलांच्या ग्रुप मधल्या त्या मुलाची कॉलर धरली आणि एक कानाखाली लावुन दिली. तसे सगळे पळाले. ती मात्र त्यालाच बघत होती. आज सर्वान समोर त्याने तिला वाचवलं होत.
त्या दिवसा पासुन त्यांची छान मैत्री झाली. ती एकदम बिनधास्त मुलगी. तशी शांत पण एकदा का मैत्री केली की खर रूप समोर यायच तीच. निखळ हसणारी, सर्वांना मदत करणारी अशी ती. त्याच्यासाठी खास डब्बा घेऊन यायची स्वतः बनवलेला. कॅन्टीनमध्ये खात बसायचे ते दोघेच. जर तो नाही आला, तर डब्बा उघडलाच जायचा नाही. मग भले ती उपाशी राहिली, तरी त्या डब्याला ती कोणालाच हात लावू द्यायची नाही.
दोघांमध्ये प्रेम फुलत होत. असेच दिवस जात होते. ते दुसऱ्या वर्षात होते. पूर्ण ग्रुपमध्ये म्हाहित होत, की दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात. पण सांगत मात्र कुणीच नव्हतं. मग मित्रांच्या सांगण्या वरून त्यानेच तिला प्रपोस करायचं ठरवल. १४ फेब्रुवारी ज्या दिवशी सगळेच आपलं प्रेम व्यक्त करतात. त्यानेही तिला सांगायचं ठरवल.
आदल्या दिवशी आरशा समोर उभा राहुन काय बोलायचं, कस बोलायच ठरलं. उद्या प्रपोज करायच या भीतीने त्याची आजची रात्र काही जात नव्हती. शेवटी खूप वेळाने तो निद्रेच्या स्वाधीन झाला. सकाळी सातच्या अलार्म ने त्याला आज स्वतःच जाग आली. उठुन त्याने सकाळची काम उरकुन घेतली. आई मात्र चांगलीच शोक मध्ये आपल्या मुलाची हरकते बघत होती.
"काय चिरंजीव आज काय स्पेसिएल वैगेरे आहे का...? आज मी न उठवता स्वतःच उठलास. सगळं आवरलस... काय...काय चाललंय नक्की...?"
" कुठे काय.. काही नाही ग ते कॉलेजमध्ये आज एक फंक्शन आहे त्याचीच धावपळ बाकी काही नाही." त्याने ही काही तरी धाप मारली. "बाळा आज नक्की कोणतं फंक्शन आहे ते मला ही माहित आहे हा आम्ही ही गेलोय कॉलेजमध्ये मला नको शिकवूस कळल....!" आणि ती हसू लागली. " ए काय ग आई नको छळूस आल्यावर सांगेल अस बोलून तो पळाला.
आज मनात खुप घालमेल होत होती. ती हो बोलेल का... करेल आपलं प्रेम स्वीकार. मैत्री तर नाही ना तोडणार असे एक ना अनेक प्रश्न त्याला आज सतावत होते. कॉलेजच्या बाहेर असलेल्या फुलवाल्याकडून त्याने एक गुलाब विकत घेत तो कॉलेजच्या गेट मधुन आत आला. आजचं वातावरण खुप रोमॅंटिक वाटत होतं. गुलाबी हवा पसरावी तशी ती सकाळ आज गुलाबी झालेली.
आज बहुतेक मुली लाल रंगाचे ड्रेसिंग करून आलेल्या. पण त्याला ओढ होती ती तिची. त्याच्या नजरेत तिची आतुरता होती. पण अजून ती काही आली नव्हती. तो तसाच आपल्या क्लासरूममध्ये जाऊन बसला. सोबत ग्रुप ही होताच. लेक्चर चालू होण्याच्या दहा मिनिटे असता तिने एन्ट्री घेतली.
सफेद रंगाचा लांबलचक कुर्ता, खाली गुलाबी रंगाचा पायजमा आणि गळ्यात गुलाबी रंगाची ओढणी असा काहीसा तिचा आजचा पेहराव होता. एका काखेत बॅग घेऊन ती पळत आपल्या बेंचवर येऊन बसली. त्याच्या बाजूच्याच बेंच वर ती बसली होती. रोजच्याच सारखी. का कोण जाणे पण ती आज अजूनच सुंदर दिसत होती त्याला, कदाचित आजच्या वातावरणाचा परिणाम असावा.
तो आज पहिल्यांदाच तीच निरीक्षण करत होता. कानात मोत्यांचे कानातले, ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक. डोळ्यांवर आईलायनर ची हलकी रेष आणि मधोमध एक काळ्या रंगाचे टिकली. तो आज फक्त तिला बघत होता, की कदाचित अजून तिच्या प्रेमात पडत होता. मधेच येणाऱ्या बटेला ती आपल्या नाजूक बोटांनी बाजूला सारायची आणि मधेच लाजायची. कदाचित तिला ही कळतं होत की तो तिलाच बघतोय.
रोजच्या प्रमाणे लेक्चर संपले. क्लासरूम मधले सगळे बाहेर गेले. शेवटी यांचा ग्रुप उठला, तसे ते ही हळू हळू निघाले. ती जायला निघालीच होती की त्याने तिला थांबवलं. तिने मागे वळूनच काय झाल अस खुणेनेच विचारल.. त्याने आपल्या बॅगेत हात घालतं गुलाब काढला आणि आपल्या एका गुडघ्यावर बसत त्याने तिला तो देऊ केला. ती शांत उभी होती काहीच न बोलता. गुलाब ही घेतला नाही म्हणुन तो घाबरला उभा राहत त्याने तिची माफी मागितली आणि जाऊ लागला की अचानक तिने त्याला थांबवलं.
"कुठे जातो आहेस मला ही बोलायच आहे. अस बोलत तिने त्याचा हात धरला. माझं उत्तर न घेताच जाणार आहेस का...?" ती बोलत होती, मात्र तो शांतपणे मान खाली घालून उभा होता. 'ऐकायचं आहे माझ उत्तर काय आहे.' तो घाबरला होता मनातुन जर नाही बोलली तर मैत्री ही राहणार नव्हती त्यांची हे त्याला माहीत होत. ती बोलू लागली.." किती वाट बघावी लागली मला या दिवसाची दोन वर्ष मी वाट बघतेय की तू कधी मला विचारशील. तस खूपदा मनात आलेल की मीच विचारेन, पण तुझ्या मनातल कळत नव्हत. कधी वाटायच प्रेम आहे तर कधी मैत्री. माझ्या प्रपोजल ने आपली मैत्री तुटू नये, असं मला नेहमी वाटायच म्हणून मी नाही बोलले. पण आज तो दिवस आला. त्या देवाने ऐकल माझ."
"तुला आठवतंय आपला पहिला दिवस कॉलेजचा ज्या दिवशी तू कशाचा ही विचार न करता मला त्या रॅगिंग मधून वाचवलं होत. वेड्या त्याच दिवशी मी माझं हृदय तुला देऊन टाकल होत. या दिवसाची मी खुप वाट बघितली आणि आज तो आलाय. अस बोलत तिने त्याच्या हातातले गुलाब घेत त्याला मिठी मारली."
एक क्षण त्याला कळलंच नाही की नक्की काय झाल. मग मागुन पूर्ण ग्रुप आला आणि त्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला. सगळे नाचत होते. मग पार्टी झाली. पूर्ण ग्रुप ने दोघांकडून पार्टी घेतली. आता ते दोघे एक झालेले. छान दिवस जात होते.
आज ते त्यांच्या शेवटच्या वर्षात होते. खुप मेहनत घेत त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केल. नोकरीला लागले. सगळं व्यवस्थित चालू होतं की अचानक एके रात्री तिचा मॅसेज आला की "आज पासून आपण जास्त नाही बोलू शकत. मला आपलं नात तोडायच आहे.", हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो ते मॅसेज सारखे वाचुन मनाला पटवत होता. त्याने तिला कॉल करून भेटायला बोलावल.
ते त्यांच्या रोजच्या ठिकाणी भेटले. दोघंही शांत आवाज फक्त काय तो त्या हवेचा. मग त्यानेच शांततेचा भंग करत प्रश्न केला. "का.... कशाला नकोय तुला आपलं नात..? काय कमी पडू दिला मी तुला आपल्या नात्यात की तुला नि नकोसा झालोय....? उत्तर दे मला.."
तिने शांतपणे एकदा त्या दूरवर पसरलेल्या समुद्राकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे. "तू नाही रे मीच कुठे तरी कमी पडली.. म्हणून की काय त्या देवाने मला त्याच्या जवळ बोलावले." तिने हसत उत्तर देऊ केल. ' म्हणजे नीट सांग अस कोड्यात नको... तिने फक्त काही डॉक्युमेन्ट त्याच्या जवळ सरकवले. त्याने ते घेत तो वाचू लागला. आधी रागाने लाल झालेला चेहरा आता भीतीने आणि काळजीने भरून आलेला.
त्याने तिच्याकडे बघत फक्त 'नाही' एवढंच म्हटलं आणि तो रडू लागला. तिला कॅन्सर होता तोही शेवटची स्टेज. खूप कमी दिवस होते तिच्याकडे. तिनेच त्याला जवळ घेतले रडू दिल जरा. प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. तो शांत झाला त्याने तिच्याकडे बघितल आणि काही तरी ठरवून त्याने तिचा हात आपल्या हाती घेतला.
"मी नाही जगू शकणार ग, तू नाहीस तर मी देखील नाही..." तो रडत होता. "आपण चांगल्या डॉक्टरला दाखवु त्याची भोळी आशा बोलत होती."
तिने त्याला समजावलं पण तो काहीच ऐकायच्या मनस्तीतीमध्ये नव्हता.
काही वेळ असाच गेला, मग त्याने तिला घरी सोडलं आणि तो हि गेला. आज जेवण घशाखाली उतरत नव्हत की पाणी. गप्प जाऊन बेडवर पडला. रडून रडून कधी झोप लागली कळली नाही.
अशेच दिवस जात होते. ती कितीही बोलली तरी तो काही तिला एकट सोडत नव्हता. रोज जायचा तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये. किती ही रडायला आल तरी नेहमी मोठी स्माईल देत तिला हसवायचा. पण कधी कधी हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात खूप रडायचा. आज तिचे ते लांब केस कापण्यात आलेले. म्हणून त्याने ही तिच्यासाठी आपले केस कापले. दोघांणी मिळून छान सेल्फी ही घेतल्या.
आज तीच तारीख होती, "१४ फेब्रुवारी" तोच दिवस होता. त्याने तिच्यासाठी गुलाबाचा गुच्छ विकत घेतलेला सोबत चॉकोलेटचा बॉक्स ही. आज परत त्याने तिला प्रपोज केलेल. छान दिवस गेलेला. आज ती परत त्या दिवसा सारखी सुंदर दिसत होती. तिची ती स्माईल जिच्या वर तो मरत होता, ती देखील आज तिच्या फेस वर होती. सगळे खुश होते.
सगळं करून तो घरी आला. असाच बेडवर पडला होता की..अचानक मध्यरात्री त्याला फोन आला. रात्रीचे दोन वाजले होते त्याने फोन घेतला आणि...... काही कळायच्या आत त्याला चक्कर सारख झाल. सगळं बाजूला सारत तो तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचला. समोर खुप माणस रडत होती.
तो सरळ आत गेला.
ती निपचित बेडवर पडून होती. त्याने दिलेला गुलाबाचा गुच्छ ही बाजूच्या टेबल वर होता. सोबत चॉकोलेट चा बॉक्स ही. डॉक्टर तिच्या घरच्यांशी काही तरी बोलत होते. ती आज शांत झोपलेली. खुप दिवसांनी आज तो तिला गाढ झोपेत बघत होता.
तो गेला तिचा हात हातात घेतला त्याने... पण ती काहीच बोलत नव्हती.
त्याने तिला खुप हलवलं, पण आज मात्र ती झोपेतून उठायला तय्यार नव्हती. त्याला काहीच सुचत नव्हतं. शेवटी एक नर्सने तिच्या चेहऱ्यावर ती सफेद चादर ओढली. तसा तो ओरडला, रडला. जिवाच्या आकांताने तो ओरडत होता, रडत होता. आज ती त्याला सोडुन गेलेली कायमची....
आज ती जाऊन दोन वर्ष झालेली. अजून ही तो तिच्यातच गुंतलेला. रात्रभर तो रडत होता स्वतःला कोसत होता की, तिच्या जागी मला नेलं असतस तर.... त्या देवाला जाब विचारात होता. पण ती गेली कधी ही न येण्यासाठी.
चार-चौघात हसून खेळून राहणारा तो त्या रात्रीच्या काळोखात एकटा झालेला. सर्वजण जवळ असून आज मात्र तो एकटा होता तिच्या शिवाय. जिच्यावर त्याचं सर्वात जास्त प्रेम होत ती त्याला सोडून खूप दूर गेलेली.
आज ही तो समुद्रावर तिची वाट बघतोय. कदाचित येईल त्या पावसाच्या पहिल्या सरी सारखी.....
खुप सोप असत ते प्रेम करन, कठीण असत ते टिकवणं. सर्वानाच नाही ते जमत. आपल्याला आवडते ती वेक्ती या जगात नाही हा भासच अंतर्मन हलवणारा आहे. मित्रानो तुम्हाला जेव्हा खर प्रेम होईल ना तेव्हा त्याला सोडुन नका जाऊ. काय माहित कोण कधी आपल्याला सोडून जाईल. कोण जाणे कोणाचे बोलणे शेवटचे होऊन बसेल. काळजी घ्या आपल्या जवळच्या लोकांची. प्रेम करा त्यांच्या वर जे तुमच्यावर प्रेम करतात.
********
शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ देईन,
तू किती ही दूर जा पण मी तिथेच तुझी वाट पाहीन.
आज नाही कळणार तुला माझे प्रेम,
मी गेल्यावर नको रडूस कारण वेळ संपलेली असेल......
********
हेमांगी सावंत