ब्रेकअप नंतर
ब्रेकअप नंतर
प्रेम.... जेव्हा प्रेम होतं ना तेव्हा आयुष्य किती सुंदर वाटत नाही...!
जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमासारखी दुसरी गोष्ट या जगात नाही. प्रेमातून नात फुलत जात आणि पुढे जाऊन दोन वेक्ती एकरूप होऊन जातात. एवढी ताकत त्या प्रेमाच्या जादूत आहे.
प्रेमात सर्वकाही सुंदर दिसत. नेहमी कंटाळा देणारा पाऊस प्रेमात असताना मात्र रोमँटिक वाटू लागतो. कधी स्वतःसाठी जगणारी वेक्ती दुसऱ्याचा विचार करू लागते. दुसऱ्यासाठी जगु लागते.
तसच काही माझंही. तो माझ्या बाजूच्या ऑफिसमध्ये काम करायचा. आमची पार्किंगमध्ये ओळख झाली. मग काय रोजच भेटन व्हायच. तो आला आणि सगळं काही बदललं. नव्याने सुरुवात झाली प्रेमाची. तसा मला पाऊस नेहमीच आवडायचा पण त्याला जरा जास्तच. आम्ही जायचो सोबत पावसात. कधी कधी सर्वांची नजर चुकवून ऑफिस नंतर जायचो सीसीडी मध्ये. गरमा- गरम कॉफी घ्यायला. कॉफीचा एक घोट आणि सोबत मुसळधार पाऊस. काय रोमॅंटिक वाटायच ते. खुप सुंदर क्षण होते ते. कधी कधी उगाचच ट्रेन ने जायचो. बाहेर पाऊस त्या ट्रेन मधली गर्दी आणि आम्ही. केसांतून गळणार पाणी बटांवर रेंगाळत यायच आणि तो अलगद ती बट बाजूला करत ते पाणी आपल्या हाताने पुसायचा. मग माझे लाजून होणारे लाल गाल त्याला खूप आवडायचे आणि तो चक्क खेचायचा आणि अजून लाल करायचा.
जेव्हा प्रेम होत ना आणि ज्या व्यक्तीवर होत, तीच व्यक्ती आपल्यावर ही तेवढच प्रेम करते याच्या सारख दुसर भाग्य नाही.
त्या दिवशी ठरवून आम्ही सुट्टी घेऊन दोघे बाहेर गेलो. फक्त भिजायला म्हणून की काय पावसाचे नामोनिशाण नाही. गेलो आणि गार्डनमध्ये वाट बघत बसलो. कधी येणार पासून म्हणून, मी मात्र कंटाळले पण तो नाही. त्याला पक्क म्हाहित होत की येणार जस काय पावसाने त्याला फोन करून सांगून ठेवल होत की आज बरसणार आहे. मग काय बघत बसलो वाट आणि बघता बघता तो आला. मोठं मोठे ढगांचे वर्तुळे बनत गेली आणि त्यातून पाण्याचे मोठे मोठे थेंब बरसु लागले. आम्ही तर चक्क तय्यारी करूनच बसलो होतो. सॅंडल, शुज घड्याळ, मोबाईल सगळं बॅगेत भरून आम्ही सज्ज झालो त्या पावसात भिजायला. पाऊस आला सोबत आनंद घेऊन. सर्वजण इकडे तिकडे आडोशासाठी मिळेल तिथे पळत होते.
पण माझ्यासाठी ते क्षण तिथेच थांबले. तो त्या पावसात एखाद्या लहानमुला सारखा भिजत होता आणि मी त्याला बघत होती. मग काय मला ही घेतलं त्याने सोबत. खूप भिजलो. पाऊस जवळुन अनुभवत होतो की अचानक एक जोराची वीज कडकडली आणि मी त्याला बिलगली. त्याने ही त्याची मिठी घट्ट केली. काही क्षण, मग मात्र मी गप्प जाऊन बसले. परत भिजलो खुप. बाहेर गेलो गरम चहा आणि वडा खाल्ला. त्याने घरी सोडले अन तो ही गेला.
असेच आम्ही भिजायचो, फिरायचो. एक दिवशी त्याने कॉल करून मला बोलावले. काही काम आहे सांगुन. मग मी ही काही जास्त न विचारता सरळ भेटायला गेली. नेहमीच्या गार्डनमध्ये आम्ही भेटलो. तो शांत बसला होता बाकड्यावर मी ही शेजारी जाऊन बसली. त्याने माझ्याकडे बघितलं मी एक छानशी स्माईल दिली त्याने ही दिली आणि तो बोलू लागला.
"जर बोलायच होत. खर तर आधीच बोलला पाहिजे होत पण आज नाही बोललो तर कधीच नाही बोलू शकणार म्हणून बोलतोय. अग कस सांगु पण... ते मला.." मी घाबरली. स्पष्ट बोलणारा आज शब्द शोधतोय. मग मीच त्याला 'काय' म्हणून सरळ विचारले आणि तो बोलू लागला.
"माझं एक मुली वर प्रेम आहे. म्हणजे आधी पासून नाही पण आता झालाय. तुला कस सांगू कळत नव्हतं. तु रागावशील म्हणून बोललो नाही पण आज नाही सांगितल तर खूप उशीर होईन." मी रागावली. खरतर वाईट वाटलं मनाला. अचानक डोळे भरू लागले आणि गालावर आलेच मी कितीही नाही दाखवायचे ठरवून ही. मी उठली आणि निघू लागली. तो आला मागे आणि माझा हात ठरत थांबवल त्याने. राग, रडू सगळं येत होतं पण शब्द तोंडातून फुटत नव्हते.
पुढे बोलला की, आज भेटवायला घेऊन आलोय आणि तू न भेटताच जातेस. काय होणार माणुसाचे या अशा प्रसंगी. मी शांत मग तोच मागे गेला आणि त्याने मला मागे फिरायला सांगितल कारण ती आलेली. मी मागे वळली तर हा खाली आपल्या गुडग्यान वर हातात रिंग घेऊन बसला होता. सर्वजण बघत होते. पण मला कोणाची फिकीर नव्हती. मी गेले आणि त्याला बिलगत होकार दिला. सोबत चार रपात
े ही. मग घट्ट मिठीत बिलगले.
मग रोज भेटन व्हायच. त्याच येणं सोबत गुलाब चॉकोलेट. खूप रोमॅंटिक वाटायच सगळं. कधी एक वर्ष झालं कळलंच नाही. छान गेले दिवस. एक दिवस घरी कळलं मग मी ही सांगून टाकले की प्रेम आहे. मुलगा छान आहे. पण मध्ये आली ती जात. हो तीच जी सर्वांच्या प्रेमामध्ये येते. आमच्याही आली. घरच्यांना मनवायचा प्रयत्न चालू झाला. पण शेवटी ती "जात" जिंकली प्रेमा पुढे.
आम्ही दूर राहायचं ठरवलं. पण जोपर्यंत घरचे मूल- मुली बघत नाहीत तोपर्यत सोबत रहायच ठरल. आणि चालू झालं एकमेकां पासून दूर होणं. तो मला इग्नोर करू लागला. आपल्या मित्रांना जास्त आणि मला मात्र थोडाही वेळ नाही द्यायचा. कधी कधी वाईट वाटायचं. त्रास व्हायचा. पण मग एकत्र नाही येणार, मग कशाला त्याला त्रास म्हणून मी गप्प राहीली. मी भेटायचं म्हटल की' त्याच्याकडे वेळ आणि पैसे नसायचे. पण मित्रांसोबत पार्टी, पिक्चरला जायला होता वेळ आणि पैसा.
मी मात्र त्याच्या वेळेत नव्हतेच. सगळीकडून मी मात्र एकटी झालेले. ना कोणी होत बोलायला की, नाही कोणाकडे मी व्यक्त होत होते. एक दिवस त्याचा मॅसेज आला की, त्याच्या घरच्यांनी मुलगी बघितली त्याच्यासाठी. माझ्या तर पाया खालची जमीनच सरकली. रडायला येत होतं पण समोर आई मग काय चेहऱ्यावर मोठी स्माईल ठेवत बाहेर गेले आणि त्याला कॉल केला. त्यालाही नव्हत करायचं मग मीच समजवल की कर. स्वतः साठी नाही निदान आईसाठी लग्न कर.
रडला तोही आणि मी देखील. आणि एक दिवस असाच मित्रांसोबत जातो सांगून गेला. दिवसभरात एक मॅसेज नाही काही नाही. वाट बघुन मी मात्र कंटाळले शेवटी आज बोलायच नाही ठरवलं. त्याचा मॅसेज आला, "कॉल करू का...?" मी मात्र रागात नको असं सांगुन टाकलं. त्याने ही ओके बोलत रिप्लाय केला. गुड नाईट बोलून दिवस संपला.
मी पाठ फिरवली तर तो ही निघून गेला. का...? कशासाठी...? म्हाहित नाही.
मी मात्र अजून ही त्याच वळणा वर त्याची वाट बघत उभी आहे. आज बाहेर खुप पाऊस कोसळतोय त्या दिवसा सारखा, सोबत वीज ही, पण घट्ट मिठी मारायला मात्र जवळच आपल अस कोणीच नाहीये.
अजून ही अबोला तसाच आहे. नाही त्याचा मॅसेज आहे नाही माझा. काल सोबत असलेले आम्ही.., आज मात्र एक-मेकांसाठी अनोळखी झालोय. बस देवाकडे एकच प्रार्थना त्याला सुखात ठेव.
प्रयत्न करतेय मी रोज खुश राहण्याचा पण त्याची आठवण काही केल्या जात नाही. अजून ही वेडी आशा त्याची वाट बघतेय. कदाचित तो येईल त्याच वळणवर भेटायला.
आज मी आणि सोबतीचा पाऊस वाट बघतोय त्याची.....
आपण नेहमी दुसऱ्यांमध्ये आनंद शोधत असतो. त्यांना हक्क देतो आपल्यावर रागवायचा, पण आपणच त्यांना आपल्याला दुःख द्यायचा ही हक्क देऊन बसतो.
आपण आपला आंनद तर त्यांच्या हातात देतोच पण दुःख देण्याचा ही हक्क त्यांच्या हातात नकळत जातो.
काही लोक मनाला लागेल अस बोलुन जातात पण काही जण न बोलतात निघुन जातात लाईफमधून. त्रास होतो जेव्हा आपण एवढा जीव लावायचा एखाद्याला आणि तो काही शुल्लक कारणाने निघुन जातो.
कस असत ना प्रेम. आपण पाठ फिरवली तर ते व्येक्ती ही पाठ फिरवुन निघुन जाते.
लाईफमध्ये खुप लोकं येतात जातात, पण एक व्यक्ती नेहमी आपल्या सोबत असते. आपण कधी तिच्यावर प्रेम करतच नाही. नेहमी दुसऱ्यांमध्ये प्रेम शोधत बसतो. नेहमी आपल्यासोबत आपल्याला कोणी ना कोणी लागतेच. पण ती वेक्ती कितीही सोबत असली तरी आपण तिचा कधीच विचार करत नाही. ती व्यक्ती म्हणजे.., आपण स्वतःच. सो आधी स्वतः वर प्रेम करा आणि मग दुसऱ्या वर.
*****
ढगफुटी व्हावी तसा पडतोय तो पाऊस, पण मनातल्या पावसाचं काय..?
तो पाऊस मात्र अजून ही वाट बघतोय बरसण्याची.
बाहेर तुफान पाऊस आहे,
पण मनातल्या पावसाला.. त्याला काही वाट फुटत नाहीये.
वाटत तो ही मनातल्या सगळ्या भावना बाहेर काढतोय. पण मनातल्या पावसाला बाहेर यायला जमेल अस काही वाटत नाहीये.
पण येईल तो ही बाहेर येईल..... एक दिवस...!
*********
हेमांगी सावंत.