Hemangi Sawant

Romance Drama

5.0  

Hemangi Sawant

Romance Drama

ड्रिमगर्ल

ड्रिमगर्ल

8 mins
1.3Kकॉफी बनवत असताना आठवण आली ती त्या दिवसाची.. त्याची आणि माझी पहिली भेट. मी नवीन नवीनच त्या ऑफिसला लागले होते.. आणि तो मला सिनिअर होता. दिसायला सिम्पल, नेहमी टाईट इस्त्रीचे कपडे, डोळ्यांवर चष्म्या. वाढलेली दाढी.. स्वतःचं काम करत बसला होता. मी गप्प स्वतःच्या डेस्कवर जाऊन बसले. नवीन असल्याने जरा घाबरतच काम करत होते. आमची मिटिंग असल्याने आम्ही सगळे केबिनमध्ये गेलो. तो माझ्यासमोरच्या चेअरवर बसला होता. 


त्याच स्वतःच्या चष्मासोबत खेळणं चालू होतं. आणि मी त्याला बघत होते. सरांनी त्याच नाव घेताच तो उठला आणि बोलु लागला..मी त्यालाच बघत होते की, त्याने एक प्रश्न मला विचारला. मी उठुन उभी राहिले असता. त्याला आठवल की नवीन जॉइन झालीये.. हाताने इशारा करून त्याने मला बसायला सांगितले. पण मी त्याने विचारलेल्या प्रश्नाचं मला जमेल तसं उत्तर देऊ केले आणि खाली बसले. माझ्या उत्तराने सगळेच हैराण, सोबत तो देखील. मिटिंग नंतर सगळे माझ्याशी छान वागत होते.. ते बोलतात ना, "फर्स्ट इम्प्रेशन इस द लास्ट इम्प्रेशन..." तसच काहीस... मला एकाने ग्रुपमध्ये ऍड केलं होतं ज्यात तो देखील होता. पण मी कधीच त्याचा नंबर सेव केला नाही. असेच दिवस जात होते.. ऑफिसच्या एका पार्टीमध्ये मी हातात ऑरेंज ज्यूस घेऊन जात असता माझी त्याला झालेली धडक.. सगळं ज्यूस त्याच्या त्या महागड्या कोट वर सांडला होता. मी लगेच माफी ही मागितली... "सॉरी सर.., ते चुकून झालं माझ्याकडून.." मी माझी मान खाली घालुन माफी मागितली.. तो काही न बोलता निघून गेला. "आता लागली वाट" स्वतःशीच बोलत मी माझ्या डोक्यावर हात मारून घेतला. घरी जायला बराच लेट झालेला. मी ऑटोची वाट बघत असताना माझ्या सामोरे एक गाडी येऊन थांबली.. ती त्याची होती. मी नको बोलत असतानाही त्याने मला बसायला भाग पाडले.. मी गप्प जाऊन बसले. पण पुढे बसुन मला बेल्ट लावता काही येत नाही बघुन त्यानेच तो लावला... आणि स्वतःशीच हसला... हे मी डोळे मोठे करून पाहिलं...." व्हॉट.???" त्याने न बघताच मला प्रश्न केला... "तुम्ही हसता देखील..." मी समोर बघत जरा घाबरतच बोलले.. 

"हो हसतो मी पण माणूस आहे. आहेत मला ही भावना.." त्याने एक गोड स्माईल देत पाहिलं.. "आणि आजच्यासाठी सॉरी."

मी त्याच्याकडे बघत स्वतःचे कान धरले... "इट्स ओके, मला नाही येत राग." त्याने गाडी चालवत स्वतःच वाक्य पूर्ण केलं. आता यावर काय बोलणार म्हणून मी खिडकीतून बाहेर बघत बसले... छान गाणं लागलं होतं... 

हम्म...

छूटेया ना छूटे मोसे

रंग तेरा डोलना

इक तेरे बाजो दूजा

मेरा कोई मोल ना

बोलना माहि बोल ना

बोलना माहि बोल ना

हम्म...ते ऐकत त्याने मला माझ्या घराजवळ सोडलं.. मी घरी जाऊन पहिल्यांदाच त्याच्या नंबर वर त्याला पर्सनल मॅसेज केला... "Thank you so much sir for your help. and once again sorry" मॅसेज करून मी झोपले. सकाळी मोबाईल पाहिला तर त्याचा रिप्लाय होता... "it's okay, my pleasure" आणि एक स्माईल. मॅसेज बघून स्वतःशीच हसत फ्रेश व्हायला गेले. ऑफिसमध्ये पोहोचले तर कळलं की, त्याच ऍकसिडेंट झालय. हे ऐकून तर मला शॉकच लागला.. मी माझ्या कलीक ला विचारले असता कळलं की, आज ऑफिसला येताना झालं.. 
काम लवकर संपवुन आज मला त्याला भेटायला जायचं होतं.. पण कामात मन काही लागेना. कधी एकदा त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघते अस झालं होतं. त्याचा हसरा चेहऱ्या सारखा आठवत होता. हातातली काम संपवुन मी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. पाहोचले तर त्याला भेटायला खूप जण आले होते आणि डॉक्टर तर अक्षरशः ओरडत होते.. पण कोणी काही ऐकून घ्यायला तय्यार नाही हे बघून ते देखील निघून गेले. मी त्या सर्वांच्या आडून त्याला बघत होते.. ऑफिकमधला खडुस हॉस्पिटलमध्ये हसत काय होता आणि मज्जा काय चालु होती. मी त्या गर्दीतल्या एका मुलीला विचारल... "हेय.., तुम्ही सांगू शकता का.., म्हणजे तुम्ही सर्व यांना कसे ओळखतात..??" मी खडूसला बघत विचारले. "हे आमचे सर आहेत." म्हणजे ..? कोणते सर..?" मी प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. "ते आम्हाला फोटोग्राफी शिकवतात... खुप सुंदर काढतात ते फोटो." ती बोलून निघून गेली. हे ऐकून मी त्या गर्दीतून त्याला भेटायला पुढे आले... "कशी आहे तब्बेत..??" एक स्माईल देत मी विचारलं. "छान आहे एकदम मस्त." त्याने ही एक स्माईल दिली. "सर तुम्ही फोटोग्राफर आहात.. मला तर म्हाहित नव्हतं.?" मी बाजूला बसत विचारल.. त्याने फक्त मान डोकावून होकार दिला.. काही वेळ बोलून मी निघाले... "सर मला ही शिकावाल तुम्ही फोटोग्राफी.???" मी मागे वळून बोलले. "ठीक झालो की शिकवेण." तो हाताचा अंगठा दाखवत बोलला.. वर वाटलं मला ही. तो हॉस्पिटलमध्ये असताना रोज जायची त्याला भेटायला. का ते नाही म्हाहित. पण त्याला भेटायला.., त्याच्याशी बोलायला छान वाटतंय.. त्याचे फॅमिली मेंबर असले की, मागच्या मागे निघून जाई. पण कोणी नसेल तर गप्पा काही संपायच्या नाही. मग नर्स येऊन टाईम संपला सांगायच्या तेव्हा कुठे जायचे. छान मैत्री झाली होती माझी त्याच्यासोबत.. 
काही दिवसांनी त्याला डिस्चार्ज ही मिळालं आणि तो ऑफिस जॉईन देखील झालेला... त्याला ऑफिसमध्ये बघून मी मात्र भारीच खुश होते. कदाचित मनाला तो आवडू लागला होता... आता तर त्याची सोबत ऑफिस नंतर ही होत होती.. त्याच्या सोबत फोटोग्राफी जी शिकत होते.. सुंदर क्षणांचे तो फोटो काढत असे... क्षण कसे टिपायचे हे कोणी त्याच्याकडून शिकावे. आजकाल ऑफिस आणि फोटोग्राफी सोडून ही आम्ही भेटत होतो.. छान नात फुलत होत आमचं.. मला तर कळत होत की, मला तो आवडू लागला आहे.. पण प्रश्न होता तो त्याच्या मनाचा.. "त्याला आवडत असेल का मी..??" कारण त्याच लग्न झालेले नव्हत... पण त्याच्या लाईफमध्ये कोणी असेल हे देखील म्हाहित नव्हतं मला... एक दिवस ठरवल की, फिरकी घेऊन बघूया... फोटोग्राफी करून आम्ही बसलो होतो, मी विषय काढला..., "तुला म्हाहित आहे का माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगा बघत आहेत.." माझ्या या वाक्यावर तो मात्र अगदी शांतपणे उत्तरला... "छान आहे, चांगला मुलगा बघ आणि कर लग्न." त्याच्या अशा उत्तराने मला मात्र चांगलच वाईट वाटलं. मी काही न बोलता निघून आले.. 
घरी आल्यावर त्याने कॉल केला पण मी घेतला नाही.. त्या रात्री त्याने मॅसेज केला... "हेय.., काय झालंय..? नीट बोल माझ्याशी..?? हे अस न बोलून काही होणार नाहीये."

मी मॅसेज बघून रिप्लाय केला... "काय बोलु..आणि कशासाठी...?" "अग तु बोलणार नाहीस तर मला कळणार कस की प्रॉब्लेम काय आहे.. आणि तुझे घरचे तुझं लग्न जबरदस्तीने लावून देणार असतील तर तस सांग मला.." "कोणी ही माझं लग्न जबरदस्तीने लावत नाहीये... तुला खरच कळत नाहीये का रे...? मला आवडतोस तु..?? माझं प्रेम आहे तुझ्यावर.." मी रडण्याचा सिम्बॉल पाठवून दिला.. मी टाकलेल्या मॅसेज वर त्याचा काही ही रिप्लाय आला नाही.. मग मी देखील बोलायच नाही ठरवत झोपले. 
सकाळी ऑफिसमध्ये तो समोरून बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण मी त्याच्याकडे लक्ष काही देत नव्हते. दिवसभरात तेच चालू होतं त्याचं. सगळं काम आवरून मी निघाले.. ऑटोसाठी वाट बघत असताना त्याने माझ्यासमोर त्याची गाडी उभी केली.. मी पाहिलं आणि पुढे निघून गेले. हे बघून तो खाली उतरला आणि माझ्यामागे आला. "हेय.., थांब ना." त्याने मागून आवाज दिला. मी थांबले तसा तो मागून आला आणि माझा हात धरला आणि ओढतच घेऊन गेला. आणि गाडीत बसवलं. 


मी जरा नाखुषीनेच गाडीत बसले होते.. तो देखील बसला आणि आम्ही निघालो. पण आज माझ्या घरी न जाता समुद्रावर गेलो... "इथे कशाला घेऊन आलात तुम्ही..??" मी बाहेर येऊन जरा ओरडलेच. तो काही न बोलता समुद्रावर चालत निघाला. मी देखील त्याच्या मागे गेले.. थंड हवा पसरली होती.. त्यामुळे समुद्रावर छान थंडावा होता. उफाळुन आलेल्या लाटा त्या दगडांवर येऊन आपटत होत्या. आणि तो आवाज तिथली शांतता भंग करत होता. तो तिथे जाऊन बसला.. मी जरा नाखुषीनेच त्याच्या बाजूला जाऊन बसले.. पण जरा लांब. एक दीर्घ श्वास घेत तो बोलु लागला... 


त्याने आधी माझ्याकडे पाहिलं... डोळ्यात बघत तो बोलु लागला. "मी तुला आधीच पाहिलं होतं.... तेव्हा पासून तु माझ्या मानत घर करून गेली होतीस." त्याने माझ्याकडे पाहिलं. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. "तुला मी एका लग्नात बघितल होत. तुझ्या मैत्रिणीचा नवरा हा माझा मित्र. जवळचा मित्र म्हणून मी फोटो काढत होतो.. आणि नकळत एका फोटोमध्ये तुझा फोटो माझ्याकडून काढला गेला.. तु तेव्हा ती गुलाबी नऊवारी साडी नेऊन मस्त अशी पोज दिली होतीस... जेव्हा तो फोटो पाहिला ना तेव्हाच तु मला आवडली होतीस... अगदी मनापासून.." "त्या गुलाबी साडीमध्ये तुझं रूप अजूनच खुलल होत. त्यात तु घातलेले दागिने स्वतःच अस्तित्व दाखवण्याचा छोटा प्रयत्न करत होते.., पण तुझं ते सौंदर्य बघुन मीच घालाल झालो होतो.. त्या दिवशी लग्नात मी आणि माझा कॅमेरा फक्त तुलाच बघत होतो.. जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा सगळे तुझेच फोटो होते... तुला बघण्यात मी एवढा गुंतलो की, तुझेच फोटो काढत राहिलो... माहीत होतं तु परत भेटणार नाहीस तरीही ते फोटो डिलीट करू शकलो नाही..""जेव्हा तु ऑफिसमध्ये जॉईन झाली होतीस ना तेव्हा तर मी शॉकमध्ये होतो... आपली आवडती व्यक्ती आपल्या सामोरे असणं म्हणजे काय सुख असत ते मलाच माझं म्हाहित.. पण आपल्यातील वय बघता मला वाटत आपलं नाही होऊ शकत. म्हणून मी माझ्या भावना लपवल्या... जमत नसताना तुझ्यापासून दूर राहिलो.." हे सगळं बोलत असताना त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. "पण आज नाही लपवू शकलो ग माझ्या भावना... माझं प्रेम आज मी तुझ्या समोर व्यक्त करत आहे...""आज त्या समुद्राच्या समोर तुला प्रपोज करत आहे... करशील माझ्याशी लग्न...? होशील माझी लाईफ पार्टनर..??" त्याने स्वतःचा हात पूढे करत विचारलं... मी एकदा त्याच्याकडे आणि समोर पसरलेल्या समुद्राकडे पाहिलं... त्याला बघत उभे राहिले... "मग ते फोटो कधी देणार आहेस माझे...? नाही तर एक काम करूया लग्नानंतर आपल्या बेडरूमध्ये त्यातला तुझा आवडता फोटो लावु.." मी हसत त्याच्याकडे बघत बोलले असता.. तो उठला आणि काहीही विचार न करता त्याने मला मिठीत घेतले. 

"पण घरचं काय.??? तय्यार होतील का.???" त्याने जरा नाराजीने पाहिलं... मी स्वतःचे दोन्ही हात वर करून दाखवले.. "चला आता घरी जाऊ नंतर घरच्यांशी बोलु" जवळ घेत तो बोलला.. माझ्या घरी कळल्यावर जरा सगळेच आधी ओरडले आणि मला त्याच्याशी बोलयच नाही असं सांगितलं.. जेव्हा मी त्यांना तो कसा आहे ते सांगितलं.. त्यानंतर ही कोणी ऐकून घेत नव्हते..जुना भुतकाळ डोळ्यासमोरून सर्रकन निघुन गेला... आणि त्याची आठवण झाली. हातात कॉफीचा कप घेऊन मी आमच्या बेडरूम आले.. "उठ ना... किती झोपतोस.." माझा नवरा अजून ही झोपला आहे... थांबा याला चटकाच देते, अस बोलु मी गरम कॉफीचा कप त्याच्या पायाला लावला तसा हा बेडवर उठुन बसला.. "काय ग.., कशाला उठवलस मला.. छान स्वप्न बघत होतो ना..??" "अरे तुझ्यासाठी तुझ्या आवडीची कॉफी आणली आहे." मी बाजुला ठेवलेल्या कॉफीचा कप त्याला दिला. "पण आधी फ्रेश होऊन ये जा पळ." एवढं बोलून मी आरश्यात स्वतःला न्याहाळू लागले... ते करताना त्याने मागून घट्ट मिठी मारली आणि मी शहारले.... "काय रे.., हे मस्तीखोर मुला.. जा तुझी कॉफी थंड होईल." मी त्याला ढकलतच बोलले. त्या आरश्यात मागे लावलेली माझी गुलाबी साडीमधली फ्रेम दिसत होती..त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आणि टेबलवर आमच्या लग्नातली त्याच्या आवडीची पोज असलेली फ्रेम.. मी हसतच त्याला जाऊन मिठी मारली..


हो तो तोच होता...


त्या वेळी झालं असं की, मी सर्वांना समजावलं पण कोणी तय्यार नाही बघून मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.. हा ते नाटक होत. हे मात्र कुणालाच माहीत नव्हतं. हे सगळं झाल्याने घरच्यांनी त्याच्यासोबत माझ लग्न लावून दिल... पण आता त्यांनाच तो मुलगा आणि मी सुन होऊन आल्यासारखी झालेय..


पण छान झालं नाही सगळं!!! असच होउदे सर्वांच्या आयुष्यात... कारण हॅपी एंडिंग सर्वांनाच आवडतात... 

अशी ही मी त्याची ड्रिमगर्ल...

Rate this content
Log in

Similar marathi story from Romance