Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Hemangi Sawant

Others


2.5  

Hemangi Sawant

Others


एक आठवण

एक आठवण

3 mins 974 3 mins 974

कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते निसर्गसौंदर्य. प्रत्येक मराठी माणसाने पावसात एकदा तरी कोकणात नक्कीच जाऊन यायला हवं. मी मुळची कोकणातली. म्हणजे माझा जन्म हा कोकणातल्या सिंधुदुर्ग तालुक्यातला. खुप लहान होते तेव्हाच मुंबईत घरच्यांसोबत स्थायिक झाले. पण मन मात्र अजून ही त्या कोकणात अडकलं आहे. पावसाळा सुरू झाली की आठवत येते ती गावची. मग ते कोणतही गाव असुद्या. मला वाटत प्रत्येक गावाचा हा स्वतःचा वेगळा असा इतिहास आहे. तर आपण इतिहासात न जाता कोकणात जाऊया. 


पाऊस म्हटला की आठवणी, आणि आठवणी आठवल्या की सगळं जग विसरायला होत नाही..!!. तसच काहीसं माझ ही. मी जेव्हा गावी होते ना तेव्हा, म्हणजे जरा लहानच होते. पण कशा कोण जाणे आठवणी अजून ही तशाच आहेत. कदाचित बाप्पाने त्या आठवून गावची ओढ रहावी यासाठीच त्या मनात खोलवर बिंबविल्या असतील. 
तर, जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा गावी लोकं शेती करतात, नाही तर तुम्हाला वाटेल आता मज्जा. तस काही नसतं. पेरणी, लावणी, भात कापणी चालु होत. माझे क्रम चुकले असतील, पण "भावनोंको समझो," तर ही सगळी कामं करावी लागतात. पण खुप मज्जा येते. ( बघणाऱ्याला येते काम करणाऱ्यांची हालत "तुम क्या जाणो रमेशबाबु अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही." हे त्यांच्याकडे बघून कळत.) त्यावेळी मी लहान असल्याने ही कामं माझ्या वाट्याला काही आली नाहीत. मुंबईमध्ये मोठी झाल्याने आणि गावी काही जास्त न जाता आल्याने राहिल ते राहिलच. 
पण सर्वांत भारी म्हणजे पाऊस पडला की खुप सारे मासे आणि कुर्ले (खेकडे यांना कोकणात कुर्ले म्हणतात) पकडाचे आणि त्यावर ताव मारायचा. म्हणजे एक आठवण आठवते, 


"मी आणि माझ्या बहिणी आम्ही टोपल्या घेऊन कोपऱ्यात (म्हणजे ज्या भागात शेती केली जाते त्याला गावी कोपरा असे बोलतात) आम्ही मासे पकडायला गेलेलो. जेव्हा नदीच पाणी खुप वाढल की नदीतील मासे असे कोपऱ्यात मिळतात. अस गावातली माणस बोलतात. माझा छोटा काका आणि काही गावकरी ते मासे पकडत होते. आम्ही देखील ते मासे आमच्या तोपलीत टाकत होतो. खाली पाणी आणि वरून ही पाऊस कोसळत होता. मी मात्र खूप मज्जा घेत होती त्या पावसाची."
टोपली भरून मासे घेऊन आम्ही घरी आलो. घरी आई आणि काकी जेवणाची तय्यारी करत होत्या. माशाच्या कढीची तय्यारी चालू होती. वाटण करण वैगेरे. मग त्यांनी ते कुर्ले आणि मासे साफ केले. माझ्या मोठ्या बहिणीने काही कुर्ले घेऊन ते चुकीत टाकले. गावी चुलीमधले खेकडे म्हणजे..."वाह...!!" आताही माझ्या तोंडाला पाणी सुटलयं. 
मी तर मस्त ताव मारला त्या माशाच्या कढी आणि खेकड्याच्या कालवणावर. बाहेर मस्त पाऊस पडत होता. गावच्या कौलांवर त्याचा आवाज येत होता. काय दिवस होता तो आठवला की मन कस ताज तवान होऊन जातं. 
असच काही वर्षांनी मी पुन्हा एकदा गावी गेलेली गणपतीला. कोकणातला मोठा उत्सव. ट्रेनमधून जाताना खितकीतून दिसणारे दूरवर पसरलेले.., डोंगरावरून ओसंडून वाहणारे धबधबे होते. नुकतीच डोकवर काढु बघणारी भाताची शेतं हवेवर डुलत होती. रस्त्याच्या कडेला नद्या भरून वाहत होत्या. डोंगरांनी हिरवी शाल पांघरावी असच काहीसं वाटत होतं. 
प्रवासातून घरी पोहोचताच बाप्पाचे दर्शन घेतले मन प्रसन्न झाले. मग निघाले भटकंतीला. पावसामुळे आजूबाजूला बरेच रानटी गवत वाढलं होत. त्यावर म्हाहित नसलेली सुंदर फुल स्वतःच वेगळं अस्तिव दाखवत होती. दूरवर पसरलेली शेतं नजर जाईपर्यंत फक्त एकच रंग दर्शवत होती. त्या पावसाने आजुबाजूचं वातावरण चांगलच बदललं होत. बाजूने हिरवी झाडी आणि त्यातुनच लाल मातीचा रस्त्या लांबपर्यंत पसरलेला. एखादा रेड-कार्पेट घातल्या सारखा तो रस्ता आपल्यासाठी असल्याप्रमाणे बघणाऱ्याला वाटेल. 

"पाऊस म्हटलं की आनंद. 

पाऊस जुन्या आठवणी जाग्या करतो. 

कधी हसवतो तर कधी रडवतो. पण तो पाऊस स्वतः रडून दुसऱ्याला मात्र नेहमी हसवतो.....

असा हा पाऊस मला माझ्या जुन्या गावाकडच्या आठवणी आठवायला भाग पाडतो...   


Rate this content
Log in