Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Hemangi Sawant

Romance Tragedy Others


0.6  

Hemangi Sawant

Romance Tragedy Others


सोकॉल्ड प्रेम

सोकॉल्ड प्रेम

9 mins 1.4K 9 mins 1.4K

लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...


तो आज ही आलेला. पण एकटाच. दुरवर पसरलेल्या समुद्रामध्ये हरवलेला. डोक्यात ना कसले भाव होते, नाही चेहऱ्यावर हसु. एकटक शांतपणे तो वाळुमध्ये बसुन होता. दूरवर पसरलेल्या समुद्राला बघत. 


चौपाटीवर वारा वाहत होता. रोज तोच वारा जीवाला शांत करणारा ठरत असला तरी आज मात्र तोच वारा नकोसा झालेला.हळु- हळु सूर्याचे साम्राज्य संपत, त्यावर काळोखाने मात केलेली. जसा सूर्याने समुद्रात उडी घ्यावी तसच काहीसं वाटत होतं. तो त्या जाणाऱ्या सूर्याकडे आपले डोळे लावून बसलेला. जसा सूर्यास्त झाला, याने ही आपले डोळे बंद केले आणि अचानक पाणी गालावर येऊन थांबले. तसा तो उठला आणि जाऊ लागला. पाणी-पुरीवाल्याने आवाज ही दिला. पण त्याने तो ऐकून न ऐकल्या सारख करत तो आपल्या बाईक जवळ येता झाला. ती सुरू करून वाऱ्याच्या वेगाने तो निघून गेला. घरी आला आणि तसाच बेडरूमध्ये येऊन त्याने दार बंद केले. वॉशरूममध्ये जाऊन शॉवरखाली उभा राहून रडु लागला. पण आपला आवाज बाहेर जाऊ नये याची मात्र तो काळजी घेत होता. खुप वेळाने बाहेर आला. कपडे बदलुन तसाच बेडवर आडवा झाला. 

आणि डोळ्यासमोरून सगळं दृष्य सर्रकन निघून गेलं.
कॉलेजचा पहिला दिवस. त्याने ही सर्वसामान्य मुलांसारखं कॉमर्समध्ये ऍडमिशन घेतले. तसा तो शाळेपासूनच हुशार नेहमी टॉप पाचमधला. पण बोलतात ना कॉलेजमध्ये आलं की डोक्यात हवा भरते तसच काहीसं त्याच ही झालं. त्याने ठरवल होत की आपण ही कॉलेजमध्ये प्रेम करायचं. बंक मारून सिनेमाला जायचं. एन्जॉय करायच लाईफ. पण आई- बाबांनी आधीच सांगून ठेवलं होतं. "बाबा रे कॉलेजमध्ये मारामारी करू नकोस, नको ते धंदे ही नको करूस. मज्जा कर, मस्ती कर. पण वाईट संगत लावुन वैगेरे नको घेऊस." प्रेमाला विरोध नव्हताच त्यांचा, कारण त्याच्या आई-बाबांचा ही प्रेम विवाह होता. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नव्हताच. आज तो कॉलेजमध्ये लवकर आला. नवीन फ्रेंड्स बनले होते त्याचे. बोलत बसला त्यांच्याशी. तोच एक मुलगी त्याला गेटमधुन येताना दिसली. तिचे शॉर्ट हेअर त्यावर ग्रीन कलर ने केलेले हायलाईट्स. पिंक क्रॉप-टॉप, आणि खाली ब्लॅक जीन्स. त्याला शोभुन व्हाईट शूज. ती सरळ आणि क्लासरूमध्ये निघून गेली. 
तशा अजून काही सुंदर, अशा मुली येत होत्या जात होत्या. पण त्याला ती दिसत नव्हती. ती,..जेव्हा तो पहिल्यांदाच ऍडमिशन लाईनमध्ये उभा होता. आणि ती त्याच्या पुढे. स्ट्रेट हेअर्समुळे ती अजूनच छान दिसत होती. त्यांची जुजबी ओळख झाली. फॉर्मभरून ते गेले. परत भेटण्यासाठी...त्याला तेच कॉलेज लागलं होतं. आता आतुरता होती ती तिच्या येण्याची. कारण त्याने आधीच तीच नाव लिस्टमध्ये बघितल होत आणि मुद्दाम त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन ही घेतल होतं. बेलचा आवाज येताच ते क्लासरूमध्ये गेले. पहिला लेक्चर चालु झाला आणि त्याच तोंड पडलं. आजही ती काही आली नव्हती. कदाचित तिने दुसरीकडे ऍडमिशन घेतलं असावं. तोच अचानक कुठुन तरी वारा यावा तशी ती आली. हो तीच.. त्याची ती. तिला बघताच तो बघतच राहिला. ती क्लासरूमध्ये येत तिने बेंच पकडला व ती बसली. हे सर्व तो मागुन निरीक्षण करत होता. एक एक करत लेक्चर झाले आणि मधल्या सुट्टीची बेल झाली. तसा तो जाऊन तिला भेटला. तो- हेय...!! ओळखलस का...??!आधी ती दचकली कारण तो अचानकपणे तिच्या समोर येऊन उभा राहिला होता. मग स्वतःच्या डोक्यावर खूप वेळ ताण दिल्यावर तिला तो आठवला. ती- हॅलो. आपण ऍडमिशनच्या वेळी भेटलो होतो ना...?!तो- हो. मला वाटल तु दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंस. ती- अरे नाही. खर तर माझी तब्बेत ठीक नव्हती म्हणुन आले नाही. सो आज आले. तो- मग ठीक आहे ना आता तब्बेत..?ती- हो आता उत्तम आहे. बाय द वे मी.. आसावरी. तो- सॉरी स्वतःची ओळखच करून नाही दिली. मी हर्ष. काही वेळ बोलुन परत लेक्चर सुरू झाले. आता ते छान मित्र झालेले एक- मेकांचे. एकच वर्गात असल्याने नोट्स घेणे, लायब्ररीत एकत्र अभ्यास करत बसणे. एकत्र कॅन्टीनमध्ये डब्बा खाणे. तिला कंटाळा आला की हाच तिचा होमवर्क करून देई. त्याच्या बाबांनी त्याला बाईक घेऊन दिलेली. त्यामुळे आता ते लॉंग ड्राईव्हला ही जाऊ लागले होते. नेहमी तिला हवं म्हणून ते चौपाटीवर जायचे. पाणी-पुरी खायचे. चौपाटी भले ही त्याच्या घरापासून फार लांब होती तरीही तो फक्त तिच्यासाठी जायचा. पण ती मात्र त्याच्याकडून स्वतःची सगळी काम करून घेत असे. कधी कधी तर ती स्वतःच्या मोबाईलचा रिचार्ज ही त्यालाच करायला सांगे. 
भांडण झाले की, मग चुक कोणाचीही असो तोच बोलायला यायचा. ती मात्र स्वतःचा मोबाईल बंद करून आपल्या दुसऱ्या फ्रिइन्ड्स सोबत मज्जा करे. ती त्याच्याशी तोपर्यंत बोलायची नाही जोपर्यंत तो तिला काही महागडं गिफ्ट देत नाही. वेलेन्टाइन डे ला त्याने तिला एक महागातला गुलाबाचा गुंच्छा देऊन प्रापोस ही केलं. तिनेही सर्वांसमोर होकार दिला. आता ते ऑफिशियली कपल झालेले. जर कधी तो कॉलेजमध्ये एखाद्या मुलीशी बोलला तर ही कॉलेज डोक्यावर घेई. पण तेच तिने केलं की, "आता काय फ्रिइन्ड्स सोबत ही बोलू नको का..?" असा तिचा प्रश्न असायचा. मित्रांसोबत कुठे जायचे म्हटलं की, हिचा आधीच नकार. "कशाला हवेत मित्र. मी आहे ना." पण जर का हेच तिच्या सोबत असेल तर ती सरळ त्याला न विचारता त्यांच्यासोबत फिरायला जायची. छोट्या- छोट्या गोष्टींवरून कधी कधी ती त्याचा सर्वांसमोर अपमान ही करे. पण तो कधीच तिला उत्तर नाही द्यायचा, कारण त्याला हे नातं टिकवायचं होत. तिच्या बर्थडेला त्याने तिच्या सर्व फ्रिइन्ड्स ला चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी दिली. तिला तिने सांगितलेली डायमंड ची रिंग ही दिली. स्वतःच्या घरच्यांशी खोट बोलुन हे सर्व त्याने फक्त तिच्यावरच्या प्रेमासाठी केल होत. पण तेच जेव्हा त्याचा बर्थडे होता. त्यावेळी तिच्या ते लक्षात ही नव्हतं. साधा एक मॅसेज किव्हा कॉल करून तिने त्याला विश केलं नव्हतं, की नाही गिफ्ट आणलेलं. तो दिवसभर तिला स्वतःहून आठवेल आणि ती विश करेल या एका आशेवर होता. आणि तिने कॉल केला जेव्हा रात्रीचे साडे-अकरा वाजत होते. एक सॉरी बोलुन तिने त्याला विश केलं. पण तेच जर त्याने केलं असत तर.... तुफान आल असत तुफान. 
तो प्रत्येक वेळी तिला समजून घेत होता. प्रियकर म्हणुन त्याने कधीच तिच्यावर हक्क दाखवला नाही. तिच्या प्रेमात तो एवढा बुडाला होता की तो स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ही विसरला होता. आज काल ती त्याच्याशी तिला हवं तसच वागायची. ग्रुप समोर घालून पाडून बोलणं हे वेगळच. त्याच्या एका जवळच्या मित्राने तिच्या बद्दल काही वाईट सांगितलं तेव्हा तर त्याने अक्षरशः त्याला थोबाडीत मारली आणि परत अस काही बोललास तर बघ... अशी धमकी ही दिली. 
असेच दिवस जात होते. ती आजकाल त्याच्याकडे दूर्लक्ष करत असल्या सारख त्याला वाटे. तिचे कॉल घेणे आता कमी झालेले, मॅसेजचा रिप्लाय फक्त त्याने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणुन की काय असाच यायचा. पण तो दिवस. त्याच्या आयुष्याभर लक्षात राहील असा ठरला. संडे म्हणुन त्याने छान फिरायला जाऊया असा प्लॅन केला. पण तिने बर नाही म्हणून कारण पुढे केलं. तिला बर नाही म्हणून तो ही कुठेच गेला नाही. असाच घरी रेंगाळत राहिला. तोच त्याच्या त्याच मित्राचा कॉल आला. संध्याकाळचे चार वाजले असतील. त्याने फक्त ये, मी पाठवलेल्या पत्यावर एवढंच सांगून कॉल कट केला. तिला बर नाही म्हणून त्यालाही कस तरीच वाटत होतं. जाऊ की नको या विचारात होता. तिला कॉल केला तर मोबाईल बंद दाखवत होता. कदाचित झोपली असेल असा अंदाज बांधुन त्याने परत कॉल न करता, मित्राने ज्या पत्यावर बोलावले तिकडे जायला निघाला. बाईक स्टार्ट जरून तो त्या पत्यावर पोहोचतच त्याने त्याच्या मित्राला कॉल केला. तो मित्र समोरच्या टपरीवर सिगारेट ओढत त्याचीच वाट बघत होता. तो सिगारेट ओढतच त्याच्या जवळ आला आणि त्याला फक्त सोबत यायला सांगितले. तो मित्र पुढे आणि तो मागे चालत एका बिल्डींगमध्ये गेले. ते चालत एका रूम जवळ पोहोचताच त्या मित्राने बेल वाजवली. एकाने दार उघडलं तर विचित्र गाण्यांचा आवाज येत होता. सोबत दारूचा, सिगारेटचा धूर, वास देखील. त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने आपल्या मित्राकडे बघितले. तो फक्त माझ्यासोबत चल एवढंच बोलला.
नाकाला रुमाल लावत तो त्याच्यामागे चालत राहिला. ती रूम मोठी होती. ठीक- ठिकाणी गालिचे होते आणि त्यावर मुलं- मुली बसुन दारू, हुक्क्याची मज्जा घेत होते. सगळ वातावरणच बेधुंद होत. आणि त्याची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या मुलीकडे गेली. डार्क ब्लू कलर च्या शॉर्टस मध्ये तिचे गोरे शरीर अजूनच उठून दिसत होते. तिनेही दारू घेतली असावी असच वाटत होतं. तिच्यासोबत एक मुलगा ही होता जो जरा जास्तच तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि ती देखील त्याला मुद्दामून हसुन संमती देत होती. हे सगळं बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो तिच्या जवळ जाणारच होता की त्याच्या मित्राने त्याला थांबवलं. ती मुलगी.. तीच होती. त्याची "ती."त्याने चिडुन त्याच्याकडे बघितले. त्याचा मित्र फक्त एवढंच बोलला की थांब ही सुरुवात आहे. पुढे बघ. तो देखील स्वतःच्या भावना आवरत उभा राहिला. तिचे आणि त्या मुलाचे अश्लील चाळे चालूच होते. ते अजुन दारू पिट होते आणि जवळ येत होत. तिने दारूच्या नशेत त्याला जवळ खेचत एक लॉंग किस घेतली. ते असेच काही वेळ होते. हे तो कोपऱ्यात उभा राहून बघत होता. आता मित्राने ही जा म्हणून सिग्नल दिल. 
तो गेला आणि तिला त्याच्या मिठीतुन सोडवत सर्वांसमोर एक जोरदार कानाखाकी लावुन दिली. अचानक झालेल्या या प्रकाराने सगळे घाबरले. तिची तर नशाच उतरली होती. तो मुलगा झालेला प्रकार बघून मागच्यामागे पळाला. 
आज पहिल्यांदा त्याने तिला स्पर्श केलेला. पण तो ही अशा प्रकारचा. ती शांत उभी होती. त्याने खुप ऐकवलं पण तिच्याकडे आज काहीच उत्तर नव्हत, कारण ती आज रंगेहाथ भेटली होती. तो जमीवर कोसळणार इतक्यात त्यांच्या मित्राने त्याला पकडले आणि रूम बाहेर तो त्याला घेऊन आला. ते खाली उतरले आणि त्या टपरीवर दोन ग्लास कडक चहा घेतला. कधी नव्हे ते आयुष्यात पहिल्यांदाच त्याने सिगारेट ही घेतली. जमत नसल्याने त्याला उलटया ही झाल्या. मित्राने त्याची आधी माफी मागितली की, अस नव्हत करायला हवं होतं त्याने. पण स्वतःच्या मित्राला अस कोणाचा गुलाम झालेला ही त्याला बघवत नव्हतं. ज्या दिवशी त्याने त्याच्या कानाखाली मारली त्याच दिवशी त्याने पुरावे शोधायला सुरुवात केली. आधी रागात पण जस खर रूप समोर येत गेलं तो देखील आतून हलला. म्हणून सत्य समोर आणण्यासाठीच त्याने हे सगळे केले होते. त्याने त्याची माफी मागितली. तो आज कोणत्या तोंडाने माफी देणार होता. रडत त्याने त्याच्या मित्राला मिठी मारली आणि तिथुन बाईवर बसून निघून गेला. त्या चौपाटीवर. 
आज सगळं परत एकदा डोळ्यासमोर घडत असल्यासारख वाटलं. काय वाईट केलं मी एवढं की एवढी मोठी शिका देवाने मला दिली. प्रेम तर केले तिच्यावर ते ही निस्वार्थीपणे, पण त्याचे हे फळ मिळावे. ती स्वतःशीच बोलत होता. एक निर्णय घेऊन शांत झोपला.दुसऱ्यादिवशी कॉलेजमध्ये गेला. ती आज पाहिल्यांदाच त्याला शोधत आली. तिने माफी मागितली, पण आज तो माफ करणार नव्हता. रडून रडून ती माफी मागत होती. त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि सरांच्या ऑफिसमसध्ये निघून गेला. 
परत आला ते कॉलेज सोडण्याचा निर्णय घेऊनच. दिवसभर सर्वाना भेटुन तो निघाला. ती खुप समजवायचा प्रयत्न करत होती, पण आज त्याला काहीच ऐकायचं नव्हतं. तो गेट बाहेत आला, ती तिथेच उभी होती. एकदा कॉलेजकडे तर एकदा तिच्याकडे बघत त्याने बाईक स्टार्ट केली आणि निघून गेला. तिला कायमचा सोडुन. 
दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. पण मन मात्र अजून ही त्याच कॉलेजमध्ये रमत होत. पण आता त्याला हे सोकॉल्ड प्रेम नव्हत करायचं. त्याने आता स्वतःच्या मनाशी पक्क केलं की प्रेम हे फक्त मूव्ही आणि गोष्टीमधेच असत, खऱ्या आयुष्यात नाही. तो जगत होता पण मन मात्र केव्हांच मेलं होत. जगत होत ते शरीर. त्यात भावना नव्हत्या. 
सो फ्रिइन्ड्स मला एवढंच सांगायला आवडेल मुलांना की प्रेम करावं पण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट न घालवता. तिच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. म्हणजे अस नाही की अविश्वास दाखवा. पण कधी तरी असे ही प्रश्न विचारा की समोरच्याच्या उत्तरावरून तुम्हाला अंदाज येईल की ती व्येक्ती खर बोलतोय की खोट. हे दोन्ही मुला- मुलींसाठी आहे. डोळे बंद करून प्रेम करणाऱ्याला मूर्खपणा बोलतात. सो हृदयासोबत डोकही असुद्या सोबत. एखाद्यावर अति विश्वास ठेवण ही घातक आहे आणि विश्वास न ठेवण ही. जस मीठ भाजीत जास्त पडल्यावर ती भाजी काहीही कामाची राहत नाही त्याच प्रमाणे हे आयुष्य आहे. बॅलन्स असले गरजेचे आहे. प्रेम करा पण आंधळं प्रेम करू नका. 
आयुष्य खुप सुंदर आहे. आणि असा समज करू घेऊ नका की एकाने धोका दिला म्हणून सगळेच तसे असतात. सो प्रेम करा आणि आनंदात रहा.              ◆◆■◆◆


कोणाच्याही दुखावण्याचा माझा हेतू नाही. जर तस काही आढळल्यास तो योगायोग समजावा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.Rate this content
Log in

More marathi story from Hemangi Sawant

Similar marathi story from Romance