Abasaheb Mhaske

Comedy Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Comedy Inspirational

हिरव्या फांदीवरचे .

हिरव्या फांदीवरचे .

4 mins
7.6K


    तुम्ही कोठेही जा सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बसस्थानके तिथे  हे हिरव्या फांदीवरचे चुकार पक्षी म्हणजे (आपल्याला दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडता, अरेरावीची भाषा वापरून कर्तव्यात हलगर्जीपणा व अधिकाराचा गैरवापर करणारे लोक) सापडणारंच. खात्रीने सांगतो. त्यादिवशीचा माझा अनुभव तसा विरळाचं, मला वाटतं  त्यावेळी मी इंटरच्या फायनल ईयरला असेन, पण त्या अनुभवांची आठवण   काल परवा घडल्यागत अगदी जशीच्या तशी आठवते. 

              तालुक्याच्या गावी जाण्यासाठी माझ्या गावापासून (नारायणगाव ता. पैठण) पिंपळवाडी फाट्यावर दोन - तीन कि. मी. पायपीट करावी लागत असे. सवयीप्रमाणे धावत - पळत जावून बसची वाट  पाहत बसलो होतो. मुलामुलींनी सबंध परिसर अक्षरशः गजबजून गेला होता. प्राण कंठात आणून सगळेच बसची वाट पाहत बसले होते असे मात्र खात्रीने म्हणता येणार नाही. कारण जसे जत्रेला हौसे, गवसे, नवसे येतात तोच प्रकार इथेही लागू पडतो. सगळ्याच्या नजरा बस येण्याच्या दिशेने खिळल्या होत्या. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता, चिंता स्पष्टपणे जाणवत होती. एवढयात एक बस आली अनं आमच्या  डोळ्यासमोर निघूनही गेली. कारण त्यातही होताच की, हिरव्या फांदीवरचे चुकार पक्षी... आमची आर्त हाकेचा, जराही विचार न करता, भावनांचा चुराडा करून बस त्या दोघांनी  बसमध्ये जागा असतांनादेखील  तशीच पुढे दामटवली होती. वाहकाने  डबल बेल मारून कामचुकारपणाची झलक दाखवलीच होती त्यात चालक महाशयांना तर तेचं हवं होतं. आम्हाला दुस-या बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

           तू नही तो और सही. असा खेळकर मनाने विचार करून तसाच बसची वाट पाहू लागलो. काहीं सडकछाप मजनूंचा धंदा तेजीत चालुू असल्याकारणाने बस न आलेलीच बरी असं त्यांना वाट्त असावं बहुतेक. त्यांना बस आली काय नी गेली काय  याच काही सोयरसुतक  असणार?  खूप वेळ वाट पाहिल्यानंतर  पुन्हा एक बस एकदाची येवून थांबली खरी पण बसमध्ये काही केल्या कोणी चढेचना. का कुणास ठाऊक मुली काही बसमध्ये चढेचना आणि मुली बसमध्ये चढेना म्हणुन मुलेही   चढले नाही. मला बसमध्ये चढ्ण्याची तीव्र इच्छा होती परंतू  मी एकटा बसमध्ये चढलो तर टारगट कार्ट्यांचे भलते सलते टौंट ऐकून आपमानीत होण्यापेक्षा ठेविले अनंते तैशेची रहावे संतवाणी आठवून मी स्ट्यचू राहणेच पसंत केले. बसमध्ये कुणीच चढत नाही हे पाहून कंडक्टर भयंकर संतापला, आरे त्या येत नाही म्हणून काय झाले ? चला चला  पटा पट तुम्ही नाहीच येणार.. जिथ मध तिथं माशा.. पुन्हा गाडी थांबवत नाही म्हणून तक्रार करायला तयार लेकाचे... मुलं वेगळा वेगळा आवाज काढून त्याला खिजवत होती.  काही विनाकारण चेकाळ्ले होते. तर काही संभ्रमीत... वाहकाने निर्वाणीचा संदेश दिला तशी  बस चालती झाली. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला यालाच म्हणतात. आता जावून फारसा उपयोग होणार नव्हताच. काही तासिका जाणार हे उघडंच होतं. पण काय करणार ? परत घरी गेल्यापेक्षा काही तासिका तरी अटेंड करता येतील या हेतूने पुन्हा बसची दीर्घ प्रतीक्षा. काहींच्या मुर्खपणाची फळे सगळ्यांना भोगावे लागले होते. कारण आमच्यातही होतेच की, हिरव्या फांदीवरचे चुकार पक्षी.

       पुन्हा काही वेळ वाट पाहिल्यानंतर प्रचंड मनस्ताप सहन केल्यानंतर उशिराने एक बस थांबली. आम्ही उरलेले काहीजण बसमध्ये कसेबसे चढलो एकदाचे,  तरी काही मुलं - मुली खालीच शिल्लक राहिले. गर्दीत श्वास कोंड्त होता तरी एकप्रकारच समाधान वाट्त होतं . ती बस मला शिगोशिग भरलेल्या ध्यानाच्या कणगीसारखी  वाट्त होती तिच्यात स्वतःला लिंपून घेत आम्ही सर्वजण  अखेर निघालो ध्येयपथाच्या दिशेने..... काही  अंतरावर जातो न जातो तोच बस टिकिट बुकींगसाठी उभी करण्यात आली. कशीबशी बुकींग संपवून बस पुढे मर्गस्थ झाली आणि फटाक - फटाक कसला तरी जोरात आवाज ऐकू येवू लागला. नकटिच्या लग्नाला सतराशे विघ्न .. पुन्हा बस  थांबवून चालक खाली उतरला आणि रिमोल्ट केलेला टुकडा वाजत होता तो कापून पुन्हा  बस निघाली... माझी नजर अचानक दरवाजाच्या आतील बाजुच्या  मजकुरावर गेला.  मजकूर असा होता हमाल नसलेल्या ठिकाणी सामानाची  चढ उतार करण्यास वाहक , कंडक्टर मद्त करील. त्यातला  'हा' 

खोडून बाकीचा मजकूर स्पष्ट्पणे दिसत होता.  'ह' खोडून  हिरव्या फांदीवरचे चुकार पक्षांची  प्रवॄत्ती दिसत होती. एवढ्यात वाहक एका वयस्क   व्यक्तिवर खेकसल्याने माझे लक्ष तिकडे गेले. वाहक सुटे पैसे देत नाहीत. थेरडे कुठले कशाला कड्मडतात काय माहिती ?  सरकारच्या बापाचे काय जाते जेष्ठ नागरीक सवलत काय? झुनका भाकर १ रुपया काय? तो तणफणत होता. एक जण अचानक मध्येच बोलला.. काय कंडक्टर साहेब , तुमचा सौजन्य सप्ताह संपला वाट्त?  ्सरकार सवलती देत मंग तुमच्या बापाचं काय जातं ? तुम्ही तरी कुठं  एक - एक रुपया सुट्टे पैसे परत करता? तुम्ही नोकर आहात पब्लिकचे , बाप नाहीत समजलात. मघापासून बघतो नुसती आपली बड्बड. नसंल झेपत द्याना राजीनामा .तस वाहक थोडासा नरमला.  मला नेहमी प्रश्न पडायचा की , एस टी महामंड्ळ कायम तोट्यात का? सरकारी बस असतांना लोक खासगी  वाहनांनी   धोकादायक प्रवास का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे मला आपसुकच मिळाली. कारण वाह्क, चालकांपासून ते सर्व कर्मचारी यांच्यात काही असतातंच की हिरव्या फांदीवरचे चुकार पक्षी. आणि असले चुकार पक्षी चांद्यापासून बांध्यापर्यंत. गल्ली ते दिल्ली आपणास पावलोपावली भेटतातंच. अखेर आमची बस एकदाची तालुक्याला पोहचली तेंव्हा खूप उशीर झाला होता. काही लोक एस टी महामंडळाला शिव्यांची लाखोली वाहत होती., मला मात्र त्याक्षणी एक सुभाषीत आठवलं. सुबह का भूला शाम को घर   लौटे उसे भूला नही कहते !

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy