Swarup Sawant

Classics

1  

Swarup Sawant

Classics

गुरू शिष्य

गुरू शिष्य

2 mins
1.7K


  फार पूर्वी आत्तासारख्या शाळा नव्हत्या. मुले गुरुकुलात राहूनच शिक्षण घेत असत .गुरुपत्नी हीच आई असे. गुरु शिष्यांची परीक्षा घेत .त्यावरूनच ते विद्यार्थी समाजात जाण्यासाठी पात्र आहेत की नाहीत ते ठरवत .चंदन गुरुजींच्या आश्रमात अशीच वीस पंचवीस मुले शिकण्यासाठी आलेली होती .शिकवता शिकवता चंदन गुरुजींच्या मनात अहंकाराने कधी जागा घेतली हे त्यांना समजले नाही .ते शिष्यांना जणू आपले सेवकच समजू लागले .

    सर्व शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली पण करणार काय ? गुरुमाऊलीच्याही ही गोष्ट लक्षात आली. काहीतरी करावे लागणार हे त्यांच्याही लक्षात आले पण काय करावे हेच त्यांना समजत नव्हते आता फक्त वेळेची वाट पाहावी एवढेच त्यांच्या हातात होते . दिवसामागून दिवस जात होते. मुले हैराण झाली होती. गुरुमाऊली आईचे ममतेचे रुपच ते तिलाही ते असह्य होत . पण त्याकाळी गुरूंच्या समोर बोलण्याची गुरुमाउलींची प्राज्ञा नव्हती .

अखेर प्रसंगातून शिष्य परिक्षा घेण्याचा दिवस उजाडला. प्रत्येकाला एक वेगळा टास्क देण्यात आला . पण एकही विद्यार्थी गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत पास झाला नाही सगळ्यांकडे त्यांना अहंकार दिसला .

    पुन्हा त्यांनी मुलांना वेदशास्त्र शिकविण्यास प्रारंभ केला . न्यायाची परिमाणे शिकविली . दया क्षमा शांतीचे धडे दिले .परंतु तेही शिकवताना त्यांचा अहंकार मध्येमध्ये येतच होता . त्यामुळे परिणामाचे माप शिक्षकांच्या पदरात पडत नव्हते .

  पुन्हा परीक्षेचा दिवस उजाडला. शिष्यांना निरनिराळे प्रसंग हाताळण्यास देण्यात आले. पुन्हा सर्व विद्यार्थी त्यात नापास झाले त्यांच्या कृतीतून पुन्हा गुरूंना अहंकार दिसला. आपले कुठे चुकत आहे ते गुरुजींच्या लक्षातच येत नव्हते .पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?

त्यामुळे गुरू शिष्य दोघेही बेचैन झाले . 

   आता ही वेळ बरोबर आहे हे गुरूमाउलींच्या लक्षात आले. त्या वेळ बघून चंदन गुरुजींच्या जवळ गेल्या. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग चंदन गुरुजी ज्यावेळी शिष्य होते. त्यावेळी त्यांना गुरूंनी किती आणि कसे सांभाळून घेतले यासंबंधी चर्चा केली. ते शिष्य असताना गुरूंकडून कोण कोणत्या अपेक्षा करत यांची कळत नकळतपणे जाणीव करून दिली. इतर शिष्यांकडून होणारा त्रास त्यावेळी गुरू व गुरुमाऊलींनी घेतलेली काळजी यांची आठवण करून दिली. गुरू हा देखील कधीतरी शिष्य होतो याची जाणीव चंदन गुरुजींना झाली. आपल्या अहंकारामुळे आपण शिष्यांना त्रास दिला याचीही जाणीव झाली. त्यांना त्यांची चूक कळली.

    दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी सर्व शिष्यांना जवळ बोलावले .आपली चूक गुरू असूनही त्यांनी कबूल केली. मोठ्या मनाने सर्व शिष्यांची त्यांनी माफी मागितली. मोकळ्या मनाने त्यांनी आपल्या शिष्यांना शिकविण्यास सुरुवात केली. यावेळेच्या परीक्षेत सर्व शिष्य पास झाले. जेव्हा सर्व शिष्य घरी जायला निघाले तेव्हा गुरुजींनी त्यांना एकच आठवण करून दिली. उद्या तुम्ही गुरू झाल्यात किंवा कुटुंब प्रमुख झालात तर तुम्हीही कधी शिष्य होता, लहान होता, तुमच्या हातून काही चुका घडल्या होता हे विसरू नका. यश नक्कीच तुमच्या हाती येईल. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व निरोप घेतला .


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics