21)पुस्तक माझा मित्र
21)पुस्तक माझा मित्र
सुविचार -पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.
रमण आनंदी मनाचा, खुशालचेंडू मुलगा होता. त्याला कोणत्याच गोष्टीचे भय वाटत नसे. अभ्यास तर त्याला मुळीच आवडत नसे. शाळेतून आला की दप्तर एकदम कोपऱ्यात फेकून देई. त्यातील पुस्तके किती बाहेर पडली तरी त्याला त्याची पर्वा नसे. त्यामुळे त्यांची पुस्तके चुरगळलेली फाटलेली होती .
आई बाबा मागे लागतात म्हणून शाळेत जायचे. शाळेतही भरपूर मस्ती करायची. आई बाबा, बाई सांगून सांगून दमले समजावून सांगितले . त्यांच्यात कोणताही फरक होत नव्हता. इतर मुले अभ्यास करतानाही त्यांना तो त्रास द्यायचा. पण त्यांच्या सारखेच खुशालचेंडू मित्र बाकी खूप होते .रोज मित्रांबरोबर खेळायचे मजा करायची. मित्र बाकी त्याला जीवापेक्षा मोठे वाटायचे. बाकी तो कुणाचेच ऐकत नसे.
एके दिवशी गंमतच झाली. रात्री तो दमून भागून झोपला होता. त्याला अचानक कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला.तो दचकून उठला. दमून झोपल्यामुळे शीण गेला नव्हता. डोळे किलकिले करुन त्याने पाहिले. कुणीच दिसेना.परत कूस बदलून झोपला. थोड्या वेळाने रडण्याचा आवाज आला. तो दचकला. अरे!भुताटकी आली की काय?त्याला दरदरुन घाम फुटला . आ ss ई !!ओरडायला गेला. पण घशातून आवाजच फुटेना. स्वप्न की वास्तव? छे!खरेच कोणितरी रडतेय!
दचकत घाबरत त्याची नजर घरभर गरगर फिरु लागली. कोणीच दिसेना. दबक्या आवाजात त्याने विचारले "कोण आहे ?कोण रडतेय? मला दिसत कसे नाही?
तेवड्यात आवाज आला "मी आहे. मी तुझे पुस्तक . किती दिवस झालेय . या कोपर्यात पडलेय. कुणाचेच लक्ष नाही. फाटलोय, लागलेय, मैत्रीसाठी आतुरलोय.
हॅ!तुझ्याशी काय मैत्री करायची? तू काय माझ्याबरोबर खेळणार आहेस? ती तुझी अक्षरे डोळे दुखतात. झोप येते .कंटाळवाणे. 'अरे तू मला जवळ तरी कर . मी व माझे बांधव खूप उपयोगी आहेत. तुला काही कमी पडू देणार नाहीत. तुझी साथ कधीच सोडणार नाहीत.'
छे ! नको मला तुझी मैत्री. अरे रमण मग ज्याला माझी आवड आहे अशा मित्राला तरी मला सोपव. असेच पडून आजारी पडण्यापेक्षा मदत तरी करेन कुणाला. ठिक आहे "आत्ता झोपू दे मला " असे म्हणून रमण कूस बदलून झोपला.
सकाळी उठून शाळेत गेला.परिक्षा होती. त्याला माहितच नव्हते. सगळी मुले डोके खाली करून पेपर सोडवत होते. तो मित्रांकडे उत्तराची मदत मागत होता. पण त्याच्याकडे कोणीच पहात नव्हते. मित्रांचा त्याला राग येत होता. काल पुस्तक का विनवणी करत होते ते त्याच्या लक्षात आले.
आपल्याला शिकायचे असेल तर पुस्तकाशीच मैत्री करावे लागेल. नाहितर सगळीकडूनच पराभव स्वीकारावा लागेल. मित्रांनी पण त्याला चांगलाच हात दाखवला होता.
लगबगीने तो घरी आला. पुस्तके शोधली. त्यांना वाटले आता हा आपल्याला दुसर्या कोणाला देईल. पण छे !त्याने प्रेमाने त्यांच्यावरून हात फिरवला. फाटलेली पाने चिकटवली. पुस्तके हसू लागली. त्यांनी विचारले "रमण ,तू कोणाकडे आम्हाला पाठवणार ? तू आम्हाला छान केलेस धन्यवाद." त्यावर रमण म्हणाला ,"छे,तुम्हाला कोणालाच देणार नाही . माझी चुकी मला कळली. तुम्हीच माझे सच्चे मित्र आहात."अरे व्वा!आम्हालाही आवडेल. आता मैत्री एकदम घट्ट. रमण म्हणाला ,"हो ,हो.आता मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.