Swarup Sawant

Others

3  

Swarup Sawant

Others

विषय -संवाद

विषय -संवाद

3 mins
1.4K


१५)सुविचार -संवादाचे दरवाजे बंद करु नका.


 दिव्या व अर्णव यांना एक कन्या व एक सुपुत्र. नम्रता व निहार. दोघांमध्ये दोनच वर्षांचे अंतर. दोघे्ही अभ्यासात खूप हुशार. त्यांच्यावर खूप चांगले संस्कार झाले होते.दोघेही आय टी इंजिनियर होते. त्यामुळे घरातील वातावरण एकदम शांत व आनंदी होते. सगळेच उच्चशिक्षित .

    कर्मधर्म संयोगाने दोघेही एकाच नामवंत खाजगी कंपनीत गलेलठ्ठ पगारावर नोकरीला लागले.मग काय मजाच एकत्र जाणे व येणे.

  तसा निहार नम्रतापेक्षा दोन वर्षांनी सिनिअर होता.तांदळात जसे खडे असतात. तशी सर्वच माणसे चांगल्या विचारांची नसतात. चार माणसे एकत्र आली की चांगले वाईट आलेच.

    दोघेही मोठ्ठ्या हुद्द्यावर असल्याने सगळ्यांना त्यांना मान द्यावा लागे.

    कुठेतरी मिठाचा खडा पडायला सुरुवात झाली.दोघांना एकमेकांबद्दल हळूहळू कान भरायला लोकांनी सुरु केले. दोघेही सरळमार्गी असल्याने त्यातील गोम त्यांना कळली नाही. बहिण भाऊ हळूहळू एकमेकांपासून दूर जाऊ लागले.त्याचा फायदा कंपनीतील त्यांच्या हाताखालील लोकांना होऊ लागला.ते स्वत:ची कामे करुन घेऊ लागले. कामात टाळाटाळ करु लागले. नम्रता ने काम दिले की निहारकडून रदबदली व्हायची. निहार ने काम दिले की नम्रताकडून रदबदली व्हायची.दोघांचा एकमेकांशी सुसंवाद नसल्याने त्यांच्यातील दुरी वाढत गेली.कामगारांचा फायदा होत होता. असे बरेच दिवस चालले.

  हळुहळू निहार नम्रता घरीही एकमेकांशीही बोलेनाशी झाली. घरातील वातावरण बदलत गेले. धुसपूस वाढल्याने छोटी मोठी भांडणे होऊ लागली.दिव्या अर्णव च्या लक्षात ही गोष्ट येऊ लागली.पण मूळ कारण त्यांच्या लक्षात येईना.घरातील वातावरण आणखी बिगडू नये म्हणून दिव्या अर्णव यांनी याकडे लवकरच लक्ष घालायचे ठरवले.दिव्या ने निहारशी व अर्णव ने नम्रताशी बोलण्याचे ठरवले त्यांच्याही नकळत. 

  दोघांनीही वेगवेगळे प्लॅन केले. वेगवेगळे भेटायला बोलावले.बाहेर गेले. दोघांनाही फ्रेश केले. इतर गप्पांमधून भावंडाच्या प्रेमाच्या विषयास हात घातला. नम्रता लगेच बोलायला लागली. तिलाही आतून कुठेतरी आवाज येत होता. की जे काही चालले आहे ते चुकीचे आहे ते तिला कळत होते. ती अर्णवच्या गळा पडून रडू लागली.तिला अर्णवने मनसोक्त रडू दिले. इगो शी ओळख करून दिली. त्यामुळे होणारे नुकसान दाखवले.लहान बहिणीने माघार घेतली तरी चालते.किंवा आयुष्यात नात्यासाठी चार पावले मागे आले तरच ती कायम टिकू शकते.तिला ते पटले.नोकरी मानपानापेक्षा भावाचे स्थान तिच्या जीवनात मोठे होते. घरी गेल्यागेल्या भावाशी बोलून वेळ पडली तर माफी मागायचीही तिची तयारी होती. तिने तिच्या पप्पांना याबद्दल मिठी मारुन धन्यवाद दिले. चूक कबूल केली.

  इथे दिव्याला निहारचे मनमोकळे करायला त्रास झाला. पण तिलाहि यश मिळाले. लोकांच्या बोलण्याला फसून आपण आपल्या लहान बहिणीशी चुकीचे वागलो. मोठा भाऊ असून आपण तिचे लाड करायचे सोडून नसत्या इगोच्या मागे लागलो याचे त्याला वाईट वाटले. त्याने दिव्याची माफी मागितली. आपली चूक कबूल केली.जाताना नम्रतासाठी चॅाकलेट्स ड्रेसेस गिफ्ट्स घेऊन गेला. दोघे संध्याकाळी घरी गेले. नम्रताने धावतच जाऊन निहारला मिठी मारली. माफीही मागितली.निहारनेही तिला आणलेली गिफ्टस दिली. बऱ्याच दिवसांनी दोघांनी गप्पा मारल्या.सुसंवाद नसल्याने नात्यात कोणीही बाधा आणू शकते हे त्यांना चांगलेच समजले. यापुढे असे काही झाल्यास याचि देहि याचि डोळा स्पष्ट करुन घ्यायचे ठरवले.त्यादिवशी दोघांना शांत झोप लागली. 

  दुसर्‍या दिवशी दोघेही एकदम हसत हसत कामावर गेले. दोघांना एकत्र येताना पाहून सगळे आश्चर्यचकित झाले .त्यांच्या चेहर्‍यावरील बदल पाहून दोघांनाही हसू आले.पण हा आनंद थोडाच वेळ राहिला.त्या दोघांना बॅास ने बोलावणे पाठवले. दोघांचा फायदा घेऊन लोकांनी कामे केली नव्हती. त्यामुळे कंपनी तोट्यात चालली होती. तुम्हाला कामावरून का काढू नये.असा खडा सवाल त्यांनी केला. दोघांनीही आपल्या चुकीची कबुली दिली. माफी मागितली. झालेले नुकसान लवकरच भरून देऊ असे लेखी आश्वासन दिले.संवादाचे दरवाजे बंद झाल्याचे परिणाम त्रास दोघांना समजला .पुन्हा ही चूक होऊ द्यायची नाही. असे ठरवून कामाला लागले. ते पाहून बाकीचे कामगार ही समजले. ते ही जोमाने कामाला लागले. परिणामी कंपनीचे नुकसान लवकरच भरून निघाले. निहार नम्रता या दोघांचा पगारही वाढवला. सुसंवादामुळेच हे घडले. बिघडलेले नाते आणखी दृढ झाले .


Rate this content
Log in