Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Swarup Sawant

Others

4  

Swarup Sawant

Others

सुपुत्र

सुपुत्र

8 mins
923


शामराव नावाप्रमाणेच शामरंग म्हणजेच सावळ्या रंगाचे.मितभाषी पण अभ्यासात हुशार. श्रीमंत घरात जन्म झाल्याने त्याच्या चेह-यावर श्रीमंतीचे तेज झळकत होते.कुठेच अन् कसलाच त्रास त्यांच्या आई वडिलांना झाला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर नामंकित कंपनीत अॅाफिसर म्हणूनच नोकरीला लागले.. पैसा रग्गड. त्यात एकुलते एक त्यामुळे सगळेच लाड. त्यांना हवे नको ते सगळे अगदी त्याच्या हाताशी आणून दिले जात होते.थोडीशी ऐशारामाची सवयच होती म्हटले तरी चालेल.

 त्यांची पत्नीही सुविद्य होती. शामलाही अभ्यासात खूप हुशार हरहुन्नरी होती. काळेभोर डोळे ,गोरा रंग,उंच देखणी शामलाचे व्यक्तिमत्वच वेगळे होते.पदवीपर्यंत शिक्षणही झाले होते. पण मोठ्यांचा मान ठेवणे तिला आवडत असे.तिही चांगली नोकरीला होती. परंतु घरची परिस्थिती श्रीमंत असल्याने तिला नोकरी सोडणे भाग पाडले गेले होते.काही न बोलता तिही घरात छान रुळली होती.लग्नाला सहा महिने झाले नाही तोच त्यांच्या घरात लहान बाळाची चाहूल लागली. सगळीकडे आनंदीआनंद झाला. छोट्या शामच्या आगमनाच्या चाहुलीने घरात नविन चैतन्यच आले होते.शामलाचे सगळे कोडकौतुक होत होते.सगळे डोहाळे पुरविले जात होते. आता आपल्या आयुष्याला पूर्णत्व येणार म्हणून ती खूप खूश होती. बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात होती. डॅा. सांगतील त्याप्रमाणे काळजी घेत होती. कोणीही होऊ दे पण निरोगी असावे अशी तिची मनस्वी इच्छा होती. घरातही तिच्यावर कोणतीच जबरदस्ती नव्हती. हळूहळू दिवस भरत आले. चैतन्यमय कृष्णाच्या आगमनाची चाहुल आली. शामलाला इस्पितळात नेण्यात आले. प्रसूतिकळा सुरू होत्या. शामरावही तेथे शामलाजवळ सावलीप्रमाणे उभे होते. पण कुणाची तरी नजर लागावे तसे झाले. मूल जन्माला आल्या आल्या गंभीर झाले. अन् त्यातच ते मृत पावले . शामरावांवर दु:खाचा डोंगर कोसळला. शामलाने बाळाला पहायचे आहे असे सांगितल्यावर बाळ जरा आजारी आहे असे सांगण्यात आले. तेव्हडे ऐकूनही तिची हि प्रकृती ही ढासळ ली झाले. कधी नव्हे ते शामरावांचे टेंशन वाढले. झालेली दु:खद घटना ते कोणालाच कळवू शकले नव्हते.

   डॅा. चे त्यांना बोलावणे आले. लगेच एका छोट्या बाळाची सोय केली नाही तर शामलाही वाचणे मुश्कील होते. तसे आपल्या बाळाच्या निधनाची घटना त्यांनी कोणालाच सांगितली नव्हती.जर शामरावांची हरकत नसेल तर ते अनाथाश्रमात चौकशी करण्यास तयार होते. पण ते बाळ त्यांना आयुष्यभरासाठी स्वीकारावे लागणार होते. परिस्थिती खूपच बिकट होती. विचार करायला वेळ लावला तर शामलालाही गमवावे लागणार होते. आजपर्यंत प्रेम दिलेल्या आईवडिलांपासून ही लपवून ठेवावे लागणार होते. कारण दुस-या कोणाचेही मूल स्वीकारणे त्यांना पसंदच पडले नसते.शामलासाठी त्यांनी परवानगी दिली. डॅा. नी भरपूर फोन केले.नशिबाने एका अनाथाश्रमात नुकतेच जन्मलेले बाळ कोणीतरी सोडून गेले होते. या कानाची त्या कानाला खबर न होऊ देता शामरावांनी त्या बाळाला आणले. शामलासाठी तिच्यावरील प्रेमापोटी काळजावर दगड ठेवला. प्रथमच आईवडिलांपासून एवढी मोठी गोष्ट लपवली. त्यांना ते कधीच पटले नसते. शामलाशेजारी ते बाळ ठेवण्यात आले. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तिला शुध्द आली.आपलेच बाळ समजून त्याला तिने जवळ घेतले. तिला पान्हा फुटला. पुत्रप्रेमाने तब्येतीतही सुधारणा होऊ लागली.

 आपण केले ते बरोबर की चूक ,प्रत्यक्ष पोटच्या बाळाला मूठमाती देऊन उकिरड्यावर टाकलेल्या जीवाला आपला म्हणवून मिरवणे शामरावांना खूप जड जात होते. एक जीव तर गेला दुसराही जाऊ नये म्हणून ही गोष्ट हृदयाच्या खोलवर कप्प्यात बंदिस्त करून टाकली.

   शार्दुल मोठा होत होता. कोणासारखा दिसतो या विचारात सगळे गोंधळून जायचे.कारण तो वेगळाच दिसत होता.परत परत तीच चूक नको म्हणून शामरावांनी दुसरे अपत्य होऊ दिले नाही. त्यामुळे शार्दूल खूप लाडाकोडात वाढत होता. शामला व कुटुंबीयांच्या मते पुनर्जन्म मिळालेला शार्दूल होता त्याला जपणे हे त्यांचेअाद्यकर्तव्य होते .

   त्यात शार्दूल ला जन्म झाल्या झाल्या अनाथाश्रमाच्या पायरीवर ठेवले गेले म्हणजे तो कोणाच्या तरी चुकीच्या कर्माचे फळ असणार. सहजा मुलाचा कोणी त्याग करत नाही. मग त्यामागची काय कहाणी असेल. थोडेथोडके नव्हे तर नऊ मास त्या अभागिनीने कसे लपवले असेल?ती लपवण्यासारखी गोष्ट नव्हती. त्यांना आठवत होते शामलाची किती काळजी घेतली जात होती.तिला स्पेशल डायेटिशिनही ठेवली होती. मेडिकल तपासणी सगळे व्यवस्थित काटेकोरपणे पाळले गेले होते. सगळे डोहाळे पुरवले गेले. स्पेशलिस्ट डॅा.च्या देखरेखीखाली होती. पाण्यासारखा पैसा टाकला .तरिही मूल हाती आले नाही. शिवाय कुणीतरी नको म्हणून टाकलेले मूल बायकोचा जीव वाचवण्यास आणावे लागले.याची खंत जरी मनाशी असली तरी त्यांनी त्या मुलाचा मनापासून स्वीकार केला होता. कारण त्याच्या मातापित्यापेक्षा ते मूल त्यांना त्यांच्या बायकोसाठी संजीवनी ठरले होते. त्याच्या घरातील वातावरण हसतेखेळते ठेवले होते.

  त्याच्या आईची तिच्या बाळंतपणात कुणीच काळजी न घेतली असल्यामुळे कदाचित शार्दुल अशक्त होता. वातावरणात जरा जरी बदल झाला तरी तो आजारी पडे. नामांकित बालतज्ञ डॅा. ची तपासणी चालू असे. शामला व शामराव रात्र रात्रभर जागत असत. अगदी डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घेत. तसे त्यांच्या घरी नोकरचाकर खूप होते. पण शार्दूल ची काळजी ते स्वत:घेत.त्यामुळेच की काय शार्दूल आपला मुलगा नसल्याचे शामराव विसरुन गेले.

    जसजसा शार्दूल मोठामोठा होत गेला.त्याची प्रतिकार शक्ती उत्तमोत्तम औषधामुळे वाढत होती. आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत होते.

  पण अभ्यासात तो तितकासा हुशार नव्हता. त्यात घरी सगळ्या सुखसोयी होत्याच. आपल्या आई वडिलांकडे एव्हडा पैसा आहे की आपल्याला कमावयाची काही गरज नाही असेच त्याला वाटे.गुळ तिथे मुंग्या याप्रमाणे श्रीमंत बापाचे वाया गेलेले मूल म्हणून पैसा उकळण्यासाठी ब-याच वाईट वृत्तीच्या लोकांचा त्याच्या अवती भवती घोळका असे.हळूहळू तो व्यसनांच्याही आहारी जाऊ लागला.शामराव व शामला काय करावे सुचेना . त्याच्या भवितव्याची काळजी सतत वाटे . तो काही त्यांना बधत नव्हता. शिकतही नव्हता आणि कमावतही नव्हता. राजेशाही थाट चालू होता.कालांतराने शामरावांच्या आईवडिलांचेही निधन झाले.ज्या आईवडिलांनी आपल्याला इतके प्रेम दिले. आपल्या बायकोलाही प्रेम दिले त्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निणर्याबद्दल ते काहीच सांगू शकले नाहीत याची त्यांना खंत वाटे. तसेच आपण आपल्या आईवडिलांचे शाम होऊ शकलो नाही. कदाचित याची शिक्षा आपल्याला कुठल्या न कुठल्या रुपाने भोगावी लागतेय असे त्यांना नेहमी वाटे. त्यात दोघेही हुशार गोल्ड मेडलिस्ट पण मुलगा अभ्यासात सामधाम म्हणण्यापेक्षा ढकलगाडीच ठरला .शेवटी तो दुस-याचाच.शामलाला बाकी आपण कसेही करुन त्याला उभे करु याची खात्री होती.त्यासाठी ती काहीही पणाला लावायला तयार होती. जसे शार्दूल ने लहानपणापासून आयुष्य काढले तसेच त्याचे रहावे उलट आणखी पैसा त्याकडे यावा यासाठी ती प्रयत्नशील होती.शामरावांना ती रिस्क वाटत होती. शामलाने शार्दुल ला स्वत:चा धंदा काढून द्यायचे ठरवले. पण छोट्या पगाराची का होईना नोकरी करावी असे शामरावांना वाटत होते .पूर्ण आयुष्यात प्रथमच दोघांत मतभेद झाले. कित्येक वर्षांचा सहन न होणारा कोंडमारा बाहेर आला. त्यांनी शामलाला शांतपणे बसवले. मागचा पुढचा जराही विचार न करता प्रथमच संयम सोडला काय करणार? वीस वर्षे त्यांनी एकट्यानेच सोसलेला त्रास होता. त्यांनी सर्व सत्य शामलाला सांगितले.शामलाच्या क्षणभर कानांवर विश्वासच बसेना.ज्याच्यासाठी आपण घरदार अगदी नोकरीही सोडली. शिक्षणाला न्याय दिला नाही. ज्याच्यावर पूर्णत:विश्वास ठेवला.त्याने तब्बल वीस वर्षे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट लपवून ठेवली.ती एकदम सुन्न झाली. तिचे ब्लडप्रेशर वाढले.आणि तिची प्रकृती एकदम गंभीर झाली. उगाच बोललो असे पण शामरावांना वाटले पण ते पण माणूसच होते. शांत स्वभाावाचे नियतीने त्यांच्या पुढ्यात वेगवेगळे पेच टाकले होते. शामलाला इस्पितळात दाखल केले. शार्दुल ला कळवले तो आला थोडावेळ उभा राहिला. निघून गेला दोस्तांबरोबर. शामलाची तब्येत ढासळत होती. शार्दुल रोज हजेरी लावायचा व मजा करायला निघून जायचा हे पाहून दोघांनाही खूप वाईट वाटायचे. खंगत पाहिलेल्या शामलाला पाहून एकदा शामराव म्हणाले "तुझा जीव वाचावा म्हणून जन्मदात्या आईवडिलांशी खोटे बोललो. तो माझा स्वभाव नाही .पण त्यांना खरे सांगितले असते तर त्यांनी ऐकले नसते. जीव वाचवणे महत्त्वाचे होते.परत तशीच घटना होऊ नये. आपल्यासाठी दुसर्‍या कोणाचा टाकलेला का पण आपण मुलगा आणला त्याच्यावर सख्खे सावत्र असा दुजाभाव होऊ नये म्हणून दुसरे अपत्य होऊ दिले नाही.त्याच्यावर कधी हातही उगारला नाही.की ओरडलो नाही. देता येईल तेव्हडे सगळे सुख दिले. तुला हे आधीच सांगितले असते तर तुला त्रास होईल या भितीनेच आजवर सांगितले नव्हते. यात जर माझी चूक असेल तर मला माफ कर.पण आताही तू सांगशील ते करायला मी तयार आहे. फक्त तू तुझी साथ मला हवीय.तू माझे जीवन आहेस. ज्या मुलाला आपण आपले म्हणून सांभाळले त्या मुलाला आपण अजून पायावर उभे केले नाही. तू म्हणशील तर सगळी प्रॅापर्टी त्याला देईन .पण तू बरी हो.मला माफ कर. असे म्हणून शांत दिसणारे शामराव हात जोडून ढसाढसा रडू लागले. त्याच्या प्रेमाचा तिला साक्षात्कार झाला. आपण किती सुखी आहोत कि आपल्यासाठी जिवाचा आटापिटा करणारा नवरा आपल्याला मिळाला.आणि आपण किती चुकीचा विचार करत होतो. हे तिला पटले.त्यांचे हात हातात घेऊन तिने त्यांना माफ केले.आपण किती चुकीचे होतो याचीही कबुली देऊन तिनेही त्यांची माफी मागितली. दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन मूकपणे बसली होती. शामरावांना आज खूप हलके होते. वीस वर्षांचे मनावरचे ओझे उतरल्याने त्यांना हलकेफुलके वाटत होते.

   कर्मधर्मसंयोगाने शार्दूल ही दाराबाहेर राहून सगळे ऐकत होता. क्षणभर तोही स्तब्ध झाला. आपले आईवडील हे नाहीत. आपण मुळात श्रीमंत नाही.आपले आईवडील कोण? असंख्य प्रश्न त्याच्या मनात घोंघावू लागले.तो तसाच घरी निघून गेला .त्याचे कशातही मन रमेना.

   घरी आल्यावर न जेवता सरळ आपल्या खोलीत गेला.रोज मऊशार लागणारी गादी आज त्याला टोचू लागली. प्रयत्न करुनही डोळे बंद होत नव्हते. तो शामरावांची वाट पहात थांबला तेव्हा त्याला समजले की शामलाला इस्पितळात दाखल केल्यापासून शामराव घरी आलेच नाहीत. खूप रात्र झाल्याने तो घरिच थांबला. पण रात्र त्याने तळमळत काढली. सकाळीच सूर्यकिरणे त्याच्या घरात आली. आज प्रथमच तो सूर्यादेवाचे दर्शन घेत होता. जणू काही त्याच्या आयुष्याचाच सूर्योदय होणार होता.नकळतपणे त्याचे हात नमस्कारासाठी जोडले गेले. त्याच्यापेक्षा शामरावांच्या तपश्चर्येचे यश आता जवळ आले होते. पटपट तयारी करुन तो सकाळीच इस्पितळात पोहोचला. एव्हड्या सकाळीच त्याला पाहून त्याने काही गडबड केली का?असा विचार दोघांच्याही मनात आला. त्याने त्याच्या यशोदा मैय्या म्हणजेच शामलाची आस्थेने चौकशी केली. यात एवढा फरक कसा हे दोघांनाही उमजले नाही. पण समाधान वाटले. कारण रात्रीच दोघांनी झालेगेले विसरुन जायचे ठरवले होते.पण शार्दूलच्या मनातील वादळाविषयी त्यांना कल्पनाही नव्हती. शार्दुल शामरावांना बाहेर घेऊन गेला.रात्रीचे ऐकलेले सगळे त्यांना सांगितले.आपले खरे आईवडिल कोण याचीही विचारणा केली.

  आता कोणतीच गोष्ट कोणापासूनही लपवून ठेवायची नाही असे शामरावांनी ठरवले होतेच. त्यांनी शार्दुल ला सगळे खरे खरे सांगितले. त्याचे जन्मदात्रे कोण हे कसे शोधून काढू शकत नाही तेही समजावले. पण मनापासून त्या उभयतांनी त्याला मुलगा म्हणून स्वीकारला असून ही गोष्ट आपलीच आहे ती इतर कोणाला सांगायची गरज हि नाही हे ही सांगितले.तसेच त्याला जेथून आणले तेथे जाऊन तो चौकशी करू शकतो. किंवा जर आईवडिलांचा पत्ता लागला तर निर्णय ही त्याचाच असेल हे ही सांगितले. शामलाकडे दोघेही गेले. तिलाही सत्य परिस्थिती सांगितली. दोघांनीही त्याला तसे भरभरुन प्रेम दिले होते. त्यामुळेच तर हे आपले आईवडिल नाहीत ही शंकाही त्याच्या मनात आली नव्हती.शामरावांकडून पत्ता घेऊन तो तेथे गेला.दरवाज्यातच तो थक्क झाला. त्याच्या आजी आजोबांचा स्टॅच्यू व नाव तेथे कोरले होते.तो चालकांना भेटला.चौकशी केली. तोच नव्हे असे कित्येक पालक नको असलेले मूल त्या दारात सोडतात.पण तो आश्रम कोणतीही चौकशी नकरता त्याला आपले मानते.लोकांकडे हात पघळून या मुलांच्या पालनपोषणासाठी फंड गोळा करतात. मुलांना पायावर उभे करतात. ही कोणाची चूक?आपणच का?असा साधा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही?जन्म देऊन अशा टाकून जाणार्‍या मायबापांचा त्याला मनस्वी राग आला.तसेच शामराव फक्त एक मूल घेऊन घरी गेले त्यांचा प्रश्न तेथेच संपला होता. पण आपल्या घराला घरपण आणणार्‍या शामरावांनी इतर मुलांना जे जमेल ते दिले. आईवडिलांना तेथे नकळतपणे नेऊन एकअर्थी कबुली दिली होती.किती त्यांच्या मनाचा मोठेपणा. जो आपण कधीच ओळखला नाही. निघालो जन्मदात्यांच्या शोधात. आपले पाप फेकून देऊन कुठेतरी समाजात उजळमाथ्याने फिरत असतील.तो तेथेच मटकन खाली बसला. खूप रडला. आसवांतून सारे मळभ धुवून निघाले होेते.तो तिथल्या मुलांमध्ये रमला खेळला. त्यांच्या पंक्तित बसून जेवला. यापेक्षा सुंदर आयुष्य देणार्‍या पोसग्या आई वडिलांना मनोमन नमस्कार केला.परतीच्या प्रवासाला निघाला. आता आभाळहि स्वच्छ निरभ्र दिसत होते. जणू कुणी चित्रकार त्यात नवे प्रफुल्लित रंग भरणार होता. स्वप्नपूर्ती करणार होता.एका नव्या ध्येयाने त्याचे पाय स्वत:च्या घराकडे वळले.

  तो परतला थेट इस्पितळातच .तेधे शामला शामराव मनापासून वाट पहात होते.त्याने दोघांना नमस्कार केला.माफी मागितली. आता तो शामराव शामला चा खराखुरा चांगला कष्टाळू शाम बनणार असल्याचे वचन दिले. कधीही त्यांना अंतर देणार नाही.जणू काही शामराव शामला यांच्या घरात पुन्हा आनंद सुख परत आले. तिघेही एकत्र एकमेकांच्या मिठीत विसावले.अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. उद्याच्या सूर्योदयाची वाट पहात!!


Rate this content
Log in