घुबड
घुबड


घुबड
लेखक : विताली बिआन्की
अनुवाद : आ. चारुमति रामदास
आजोबा बसले आहेत, चहा पिताहेत. काळा चहा पीत नाहीये – दुधाने त्याला पांढरा करून पिताहेत. जवळून जातं घुबड.
“नमस्कार,” त्याने म्हटलं, “मित्रा!”
पण आजोबा म्हणाले:
“ तू घुबड- वेडगळ डोकं, बाहेर निघालेले कान, हुकासारखं नाक. तू सूर्यापासून लपतो, लोकांपासून दूर पळतो – मी तुझा मित्र कसा काय झालो ?"
घुबडाला राग आला.
“ठीक आहे,” म्हातारड्या! मी रात्री तुझ्या शेतावर नाही उडणार, उंदीर नाही पकडणार – स्वतःच पकडून घे.”
पण आजोबा म्हणाले:
“भीति पण दाखवतोय तर कशाची! जा पळ, जोपर्यंत सुखरूप आहेस.”
घुबड उडून गेला, झाडांत लपून बसला, आपल्या खोबणीतून बाहेरंच नाही उडाला.
आजोबाच्या शेतात उंदीर आपल्या बिळामधे चीं-चीं करताहेत, गोष्टी करताहेत:
“बघ तर लाडके, कुठे घुबडतर नाही येत आहे वेडगळ डोकं, बाहेर निघालेले कान, हुकासारखं नाक?”
उंदरीने उंदराला उत्तर दिलं:
“घुबड कुठेच दिसंत नाहीये, त्याची चाहूलसुद्धां नाहीये. आजतर आपल्यासाठी मैदान साफ आहे, आपल्यासाठी पूर्ण शेत मोकळं आहे.”
उंदीर उड्या मारंत बिळांमधून बाहेर आले, उंदीर शेताकडे धावले.
आणि घुबड आपल्या खोबणींतून म्हणाला:
“हा, हा, हा, म्हातारड्या! बघ, कुठे सत्यानाश न होऊन जावो: उंदीरतर असे फिरतात आहे, जणु शिकारीला निघालेत.”
“ फिरतात आहेत, तर फिरू दे,” आजोबा म्हणाले, “उंदीर काही लांडगे थोडीच आहेत, ते वासरांना नाही मारणार.”
उंदीर शेतात धुमाकूळ घालतात, जाड माशांचे घरटे शोधतात, जमीन खोदून टाकतात, माशा पकडतांत.
आणि घुबड आपल्या खोबणीतून म्हणतो:
“हो, हो, हो, म्हातारड्या! बघ, कुठे सत्यानाश न होऊन जावो: बघ तुझ्या सगळ्या जाड्या माश्या उडून गेल्यात.”
“उडू दे,” आजोबा म्हणाले, “त्यांचा काय उपयोग आहे : ना मध, ना मेण – फक्त अंगावर सूज येते.”
शेतांत होतं फुलं असलेलं लहान-लहान गवत, ओंब्या जमिनीवर झुकल्या होत्या, पण जाड्या माश्या सरळ शेतांतून येतात, भिणभिणतात, गवताकडे बघतसुद्धा नाही, एका फुलाचा पराग दुस-यावर नेत नाहीये.
घुबड खोबणीतून म्हणाला:
“हो, हो, हो, म्हातारड्या! बघ, कुठे सत्यानाश न होऊन जावो : कुठे तुलाच पराग एका फुलावरून दुस-यावर न न्यावं लागो. ”
“वारं नेईल,” आजोबा म्हणाले आणि आपलं डोकं खाजवू लागले. शेतावर वारं चालतं, पराग जमिनीवर पडतं. पराग एका फुलावरून दुस-या फुलावर नाही पडत – शेतात फुलांचं गवंत नाही उगंत, आजोबासाठी हे अनपेक्षित होतं. पण घुबड खोबणीतून म्हणाला:
“हो, हो,हो, म्हातारड्या! तुझी गाय हंबरतेय, गवत मागतेय, - बीज आणि फुलं नसलेलं गवत तर बिन तुपाच्या सांज्यासारखं असतं.”
आजोबा चूप राहिले, काहीच बोलले नाही.
फुलांचं गवत खाल्ल्याने गाय हृष्टपुष्ट होती, आता गाय रोडावलीय, दूध कमी देतेय, दूध पातळ देतेय.
आणि घुबड खोबणीतून म्हणाला:
“हो, हो,हो, म्हातारड्या! मी तर तुला सांगितलं होतं: तू नाक रगडत माझ्याकडे येशील.
आजोबा शिव्या द्यायला लागले, पण काही जमतंच नव्हतं.
घुबड बसलंय ओक वृक्षाच्या खोबणीत, उंदीर नाही पकडत. उंदीर शेत तहस-नहस करतात, जाड माश्यांचे घरटे बर्बाद करतात, माश्या दुस-या शेतावर उडतात आहे, आजोबाच्या शेताकडे ढुंकूनसुद्धा नाही बघत. फुलाचं गवत शेतात उगत नाही. ते गवत नसल्याने गाय रोडावलीय. गाईचं दूधसुद्धां झालंय पातळ. चहात टाकायला आजोबाकडे काहीच उरलं नाहीये – चालले आजोबा घुबडाची खुशामद करायला.
“तू पण ना, सोन्या-लाडक्या घुबडा, रागावून गेलास. मला ह्या आपदेतून बाहेर काढ. माझ्या, म्हाता-याजवळ, चहात घालायला काही उरलंच नाही.”
घुबड आपल्या खोबणीतून बघतो – डोळे फडफडवंत, पाय टपटपंत.
“असंच तर असतं,” तो म्हणाला, “म्हातारड्या, मैत्री कधीच ओझं नसते, मग अंतर कितीही का नसो! तुला काय वाटतं, तुझ्या उंदरांशिवाय मला चांगलं वाटत होतं कां?”
घुबडाने आजोबाला माफ केलं होतं, तो खोबणीतून बाहेर आला, उंदीर पकडायला शेताकडे उडाला.
उंदीर घाबरून आपापल्या बिळांमधे घुसले. जाड माश्या शेतावर भिणभिणू लागल्या, एका फुलावरून दुस-या फुलावर उडून जाऊ लागल्या. लाल-लाल फुलांचं गवत शेतावर पसरू लागलं. गाय चालली शेतांत गवत खायला. गाय देऊ लागली खूप सारं दूध.
आजोबा टाकू लागले चहांत खूप सारं दूध, करूं लागले घुबडाची तारीफ, बोलावूं लागले त्याला आपल्या घरी, देऊं लागले खूप भाव.