घरातील अर्थसंकल्प
घरातील अर्थसंकल्प
📌 मागे आपण काटकसर ह्या विषयावर उपक्रम घेतला होता. त्यावेळीचे म्हणणे आता परत सांगू इच्छिते. "काटकसर" म्हणजे आपल्या कडे असलेल्या साठ्यातून आवश्यक ती बचत करून उरलेल्या राशीतून आपल्या प्रायोरिटीज नुसार खर्च करणे जो वर्थ असायलाच हवा. नुसतीच बचत करण्यावर भर देणारा कंजूस पणा आणि नुसताच अविचाराने खर्च करणारा उधळपट्टी पणा याच्या मधला समन्वय म्हणजे काटकसर. पहिलेच्या आणि सद्द परिस्थितीत अनेक अंगांनी झालेल्या बदला नुसार दोन्ही पिढीला कम्पेर करणं योग्य वाटत नाही. एक जवळपास ५० वर्षापूर्वीची काटकसर आणि आत्ताची काटकसर याचं स्वरूप बदलणारच. पण चंगळवाद वाढीला लागला आहे यात वादच नाही. मुबलक आहे म्हणून कसाही कुठेही कितीही अनावश्यक खर्च करत सुटणे अयोग्यच. पैशांपेक्षाही अन्न आणि वेळ याची नासाडी खरंच बघवत नाही. तेव्हा आवर्जून वाटतं काटकसर अंगवळणी असावीच. एकदा का सवईचा भाग बनला की नैसर्गिक साठ्याचा देखील गरजे पुरताच वापर केल्या जातो... हे असं सवयीचं करून घेतलं की "घरातील अर्थसंकल्प" देखील आपसूक केला जातो. आणि मोठ्यांना पाहून घरातील लहान पण ते फॉलो करतात... माझ्या प्रार्थामिक शाळेत एक उपक्रम होता. खरी कमाई! घरातील आई बाबा व मोठ्यांची कामे करून त्याचे बक्षीस म्हणून पैसे जमवायचे. त्यामुळे कामं करण्याची सवय, त्यासाठी लागणाऱ्या महेनतीची जाणीव आणि त्यातून कमावलेल्या पैसाचे मोल कळले. संसारातील अर्थसंकल्प करताना हे बाळकडू कामी आले. लहानपणापासून आईला, लग्नानंतर सासूबाईंना घर चालवताना आणि नवऱ्याला नौकरितून सेविंग्ज करताना पाहून अर्थसंकल्प ह्याचे अजून धडे मिळाले...
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना*
