Swapna Sadhankar

Others

2  

Swapna Sadhankar

Others

काटकसर

काटकसर

1 min
101


काटकसर म्हणजे आपल्या कडे असलेल्या साठ्यातून आवश्यक ती बचत करून उरलेल्या राशीतून आपल्या प्रायोरिटीज नुसार खर्च करणे जो वर्थ असायलाच हवा. नुसतीच बचत करण्यावर भर देणारा कंजूस पणा आणि नुसताच अविचाराने खर्च करणारा उधळपट्टी पणा याच्या मधला समन्वय म्हणजे काटकसर. पहिलेच्या आणि सद्द परिस्थितीत अनेक अंगांनी झालेल्या बदला नुसार दोन्ही पिढीला कम्पेर करणं योग्य वाटत नाही. एक जवळपास ५० वर्षापूर्वीची काटकसर आणि आत्ताची काटकसर याचं स्वरूप बदलणारच. पण चंगळवाद वाढीला लागला आहे यात वादच नाही. मुबलक आहे म्हणून कसाही कुठेही कितीही अनावश्यक खर्च करत सुटणे अयोग्यच. पैशांपेक्षाही अन्न आणि वेळ याची नासाडी खरंच बघवत नाही. तेव्हा आवर्जून वाटतं काटकसर अंगवळणी असावीच. एकदा का सवयीचा भाग बनला की नैसर्गिक साठ्याचा देखील गरजे पुरताच वापर केल्या जातो. हल्ली नेहमीच असं वाटतं की एकंदरीतच सेन्सिटिव्हीटी हरवली आहे. तिथे काटकसर नव्याने काय शिकवता येणार आहे!


Rate this content
Log in