STORYMIRROR

Swapna Sadhankar

Classics

4.5  

Swapna Sadhankar

Classics

घडी

घडी

1 min
5

कपड्यांची घडी हा माझा खूप जिवाभावाचा विषय! म्हणून अधिकच अंगवणीने वाचतेय सारं. टोकाला टोक जुळवण्याचा अट्टहासच असतो माझा नेहमी. कधीकधी विचार करते जाऊ दे ना!, पण नाही पटत, नाही जमत, मग परत उकलून नीट (नीट काय पर्फेक्टच) घडी घालते. कोणत्या कपड्याला, चादरीला किती कोस आहे हे सुध्दा माहीत असतं. तो कोस कसा ऍडजस्ट करायचं हेही माहीत होऊन जातं. आणि मग स्वतःशीच मनातल्या मनात पुटपुटते की इतकं खरंच गरजेचं असतं का!? पण तरी करायचं कारण मनाला समाधान मिळतं. नाहीतर नसती रुखरुख हवी कशाला!? म्हणून सवयच लागलीय घडी नीट घालायची, ती नीट बसवायची, परत कितिदाही उकलणार असली तरी. मग ती कपड्यांची असो वा इतर कुठली वा नात्यांची. स्वभावाचा भाग झालाय आता!..

इतकं नीटनेटकं असणं आजच्या काळात व्यर्थ समजल्या जातं. वेळेचा अपव्यय, चक्क रिकामटेकडेपणा, वगैरे वगैरे. पण मला तरीही आवडतं. माझ्या संवेदनशीलतेला खतपाणी घालत असलं तरीही!.......


🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿

                      *स्वप्ना*


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics