Swapna Sadhankar

Others

2  

Swapna Sadhankar

Others

मनातलं घर

मनातलं घर

1 min
84


घर म्हटलं की मला नेहमीच ही कविता आठवते,..

घर असावे घरासारखे

नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम-जिव्हाळा

नकोत नुसती नाती

... पण मी ह्यावर नाही लिहिणार कारण खूप सिरीयस टॉपिक होईल मग तो. असो!... मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. क्लाएंट साठी घर डिझाईन करून देते, इंटेरियर डिझाईन करून देते. आणि ते डिझाईन करताना माझे पूर्ण प्रयत्न असतात की मला नुसत्या भिंती उभारून त्यावर त्यांच्याकरिता छत घालायचे नाही आहे, तर त्यातील इंच न इंच त्यांच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड असावा, व त्यांच्या पैश्याचे पुरेपूर चीज व्हावे. त्याकरता मी त्या घरातील सदस्यांना थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि डिझाईन करते वेळी अक्षरशः स्वतःला त्यांच्या जागी इमॅजिन करून त्या घरात वावरते. मग त्यानुसार सगळे डिटेल्स ठरवते. ते घर नुसतं दिसायला सुदंर नाही तर वापरायला देखील सुकर समाधानी असावं. म्हणजे क्लाएंटच्या मनात देखील एक घर तयार होतं, माझ्यासाठी! आणि अप्रत्यक्षरित्या त्या घरात माझा नेहमीकरिता वास राहतो. अशे माझे किती घरं झालेत. पण वास्तवात मी कधीच स्वतःच्या घरात अजून तरी राहिले नाही. आधी बाबांची ट्रैन्स्फरबल नौकरी म्हणून भाड्याच्या घरात राहीले. मग लग्न झाल्यावर नवाऱ्याचा ट्रैन्स्फरबल जॉब म्हणून क्वार्टर मधे राहते. प्रत्येक वेळी घर लावताना विचार करते की माझ्या स्वतःच्या घरात मी हे असं करेल ते तसं करेल. अजून हे ही नाही माहित की कोणत्या शहरात असेल ते. पण मी मात्र आपले खयाली पुलाव मोठ्या चेवने पकवत असते.....



Rate this content
Log in