वसंत-पौर्णिमा
वसंत-पौर्णिमा
1 min
7
ऋतुराज कॉलनीत एक नवविवाहित जोडपे राहायला आले. हसतमुख, मनमिळाऊ, साधी-सरळ समिधा लवकरच सर्वांची लाडकी झाली, आणि आता आदर्श ही! मागच्या होळीला तिने आपल्या आयुष्यातले जाच, दुःख व नैराश्य होलिका दहनात स्वाहा केले अन् प्रेमाचा बहर घेऊन आलेल्या चैतन्यला लग्नासाठी होकार दिला. नवरा नि तान्ह्या बाळासोबत सुखात रंगोत्सव साजरा करताना पाहून, अनाथ समिधा करिता मैत्रिणीच्या तोंडून उद्गार निघाले, "हॅट्स ऑफ!" मी पण दुजोरा देत म्हणाले, "कायम स्मरणात राहणारी वसंताची पौर्णिमा!"
