Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Ajay Nannar

Abstract Inspirational Others


2  

Ajay Nannar

Abstract Inspirational Others


घंटा गाडी - ऑन मिशन

घंटा गाडी - ऑन मिशन

2 mins 103 2 mins 103

   दिनेश हा रामगड येथील राहणारा एक गरीब शेतकरी माणूस आहे. घरची परिस्थिती गरीब आणि त्यात शिक्षण ही अर्धवट सोडून दिले. दिनेश खूप कष्ट करायचा. त्याला स्वच्छता खूप आवडायची म्हणून तो सगळं घर आणि परिसर स्वच्छ ठेवायचा. दिनेश सगळ्यांना खूप आवडायचा. दिनेशचे स्वप्न होते की आपला देश स्वच्छ व सुंदर झाला पाहिजे आणि या सामाजिक कार्यात सर्व नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. दिनेशला नोकरी मिळाली नाही. तरी दिनेशने हिम्मत सोडली नाही. काम छोटे असो किंवा मोठे काम ते कामच म्हणून दिनेश कोणत्याही कामाला तयार होता.


    दिनेशने त्याच्या हिमतीने व कष्टाने नगरपालिकेच्या कचरागाडीवर चालक म्हणून काम मिळाले. दिनेशचा प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची तयारी म्हणून काम मिळाले. दिनेश रोज सकाळी लवकर उठून कामाला जायचा आणि कचरा गाडीतून सर्व सुका कचरा आणि ओला कचरा व्यवस्थापन करायचा. स्वच्छतेची आवड तर होतीच. मग कामही सोपे झाले. दिनेश रोज मेहनतीने काम करत असायचा. सकाळी "गाडी आमची आली रे, घंटा गाडी आली रे..." हा गाडीचा आवाज सर्वदूर पोहचायचा. 


एकदा असाच कामाला गेले असताना अचानक पुलावर दिनेशच्या कचरा गाडीला ट्रकने धडक दिली आणि दिनेश पुलावरून कचरागाडीसह पाण्यात पडला आणि त्यातच दिनेशचा म्रुत्यु झाला. यामुळे सर्व गावात शोककळा पसरली. कचरा व्यवस्थापन समितीलादेखील या गोष्टीचे वाईट वाटले. कचरा व्यवस्थापन समितीने दिनेशच्या कुटुंबाला पैशाची मदत केली. 


दिनेशच्या स्मृतीप्रित्यर्थ कचरा व्यवस्थापन समितीने कचऱ्याचा वापर हा आता वीजनिर्मितीसाठी केला आहे आणि त्यासाठी मोठ्या कंपन्यांची मदत घेतली आणि कंपन्यांशी हातमिळवणी केली. त्यामुळे गावात सगळीकडे विजेची सोय झाली. दिनेशने स्वच्छतेचा मंत्र पाळला "स्वच्छ भारत अभियान" दिनेशने सार्थ करून दाखविले आणि आजही रामगडमध्ये प्रत्येक माणसाच्या मनात दिनेश अजूनही जिवंत आहे. 


आणि रोज सकाळी एक कचरागाडी गावात येऊन सर्व घरांचा कचरा घेऊन जात असे. कानी आवाज ऐकू येई "गाडी आमची आली रे, घंटा गाडी आली रे...." 

 

 आजही दिनेशची गाडी येऊन कचरा घेऊन जात असे. दिनेशचे मिशन हे आजही कायम चालूच आहे. सलाम त्या दिनेशला आणि असंख्य अशा सर्व सामाजिक काम प्रामाणिकपणे करणाऱ्यांना....


Rate this content
Log in

More marathi story from Ajay Nannar

Similar marathi story from Abstract