घडले ते न्यारे
घडले ते न्यारे


वाढदिवस म्हटले की, निश्चितच मोठा आनंदाचा क्षण.. प्रत्येकालाच वाटत आपला वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा व्हावा.. राजकारणी, सेलिब्रिटी सोडले तर खेड्यापाड्यात देखील छोटे मोठे वाढदिवसाचे कार्यक्रम होतच आहेत.
मित्रमंडळी,जवळचे नातेवाईक मग नवे कपडे, केक कापून, मिठाई वाटणे, जेवण, पार्टी, डान्स, असे बरेच काही घडताना दिसून येते..
मागेच घडलेला अतिशय विचीत्र प्रकार, बरेच मित्र आता रस्त्यावर च असे कार्यक्रम घेत आहेत नी आनंदापेक्षा दुःखदायक घडताना दिसून येत आहे.लोक एकमेकांच्या डोक्यावर अंडे फोडणे,केक जो खायचा असतो तो तोंडाला लावून गराडा करणे आणि चांगल्या पेक्षा वाईट च जास्त घडताना दिसत आहे..दारु पिणे, पाजणे हे प्रकार निश्चितच चांगले नाहीत...
असाच एक घडलेला वाईट प्रकार,मुलांचा वाढदिवस म्हणून घरच्यांना प्रचंड आनंद झालेला घरी बरेच नातेवाईक जमलेले,नवे कपडे,जेवनखावण सर्व काही थाटामाटात चाललेलं,केक,फुगे,लाईटिंग, सर्व डेकोरेशन अगदी मजेत सर्व सुरू असताना ज्याचा वाढदिवस होता त्याला त्याच्या मित्रांचे सारखे फोन वर फोन यायला लागतात..मित्र त्याला फोन करून सांगतात आम्ही सारे जमलो आहोत, तुझीच वाट पाहत आहोत,तू लवकर ये आपण सर्व
तुझा छान वाढदिवस साजरा करणार आहोत... झाले खुशीने मित्र वाढदिवस साजरा करणार म्हणून मोठ्या आनंदाने कोणाला ही कांहीच न बोलता गाडीवर बसून तो मित्राकडे जावून पोहोचला..
सर्व मित्र बिघडलेले खाणारे, पिणारे, एका छतावर जमले होते, पिऊन तर्र होते.केक आणलेला , अंधार पडलेला,नाच, गाण्याच्या रंगात रंगून गेले... ती खुशी,तो आनंद काही वेगळाच होता.. नाचून घामाने चिंब भिजून गेले, अनेकांचे कपडे फाटले... जोशात त्या वाढदिवस असलेल्या मुलांना कोणी खांद्यावर घेतले, पाडले, चांगले आपटले, डोक्यावर घेऊन आपटले नी दोघांनी हात धरले, दोघांनी पाय धरले.. जोराने ओरडून.... छतावरुन खाली भिरकावले...बिचारा डोक्यावर आपटला... रक्ताच्या थारोळ्यात पडला... जागीच प्राण गेला.... पाहून सर्व घाबरले आणि लगेचच त्यांनी त्याला फुल्ल भरुन वाहणाऱ्या गटारात फेकून दिले....
काय.. घडले नी.कसली..ही संस्कृती....कसले संस्कार... मला वाटतं दुनिया बिघडली आहे... कुठे तरी संस्काराची गरज आहे..
आपणच कमी पडतो की काय.. याचा प्रत्येकाने विचार करावा आणि वेळीच सावध व्हावे..
खरंच दुनिया बिघडत आहे..सावध व्हावे..काळ वाईट आहे..