Jyoti gosavi

Classics

4.3  

Jyoti gosavi

Classics

गाडीची चोरी (अलक)

गाडीची चोरी (अलक)

1 min
409


पंधरा दिवसांपूर्वी चोरी झालेली त्याची कार आज पार्किंग मध्ये दिसली. मोठ्या आनंदाने जाऊन दरवाजा उघडला असता, आत मध्ये एक पाकीट सापडले. 

साहेब कोकणात गणपतीला जायचे होते, पण सगळ्या गाड्यांचे बुकिंग फुल होते. आणि माझ्या म्हाताऱ्या आईला आणि सहा महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन जायचे होते .म्हणून हा प्रमाद घडला क्षमस्व. 

टाकी पेट्रोल ने फुल्ल करून ठेवत आहे. 

त्याबरोबर तो मनात हसला, बाप्पा यावर्षी माझ्याकडून तुझी सेवा घडली नव्हती. पण ती तू कोणत्या ना कोणत्या मार्गाने करून घेतलीस.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics