" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy

एकत्र कुटुंब पद्धतीचा होतोय ऱ्हास

एकत्र कुटुंब पद्धतीचा होतोय ऱ्हास

1 min
136


या २१व्या शतकात संस्कार, मूल्य नि नीतीमत्तेचा विचार करताना कुटुंब संस्थेच महत्त्व सर्वांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे. आईला आई नी बापाला बाप न म्हणणारी आजकालची संकरीत औलाद पाहिलं की खूपच वाईट वाटायला लागतं. या सगळ्याची कारणे पहात असताना वाटतं एकत्र कुटुंब पध्दतीचा होत असलेला र्हास खरच खूप वाईट आहे... या एकत्र कुटुंब पध्दतीच्या र्हासाचे परीणाम समाजावर खूपच वाईट आहेत.

    

कुटुंब पध्दतीचे कार्य पाहिल्यावर लक्षात येतं की, व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या उध्दारासाठी ही एकत्र कुटुंबपध्दती आवश्यकच आहे असे नसून ते एक वरदान आहे. संस्कार, नातेसंबंध, पालन पोषण, मूल्येसंवर्धन, अपंग, अनाथ, विधवा, वृध्द, छोटी मुले, स्त्रिया इत्यादीचे संरक्षण व अन्य गोष्टींचा विचार करता खरचं एकत्र कुटुंबपध्दती केवढे मोठे वरदान होय..!


   या एकत्र कुटुंबपध्दतीचा होत असलेला ऱ्हास ही आजच्या काळात नुसती समस्या नसून महासमस्या आहे. हम दो हमारे दो। या संस्कृतीमुळे नातीगोती संपूनच गेली... आजी आजोबांचे लाड, संस्कार, गोष्टी, ते गोडगोड पापे, आत्या, काका, काकू, चुलतभाऊ, आतेभाऊ, मामेभाऊ ही सारी गंमतजंमत नष्टच झाली. दिपावळी, लाडू, फटाके, नवे कपडे यालाही या विभक्त कुटुंबपध्दतीने महत्त्व उरले नाही.


माणसाला पैसा प्यारा झाला नि नाती संपूनच गेली. आईबाबांसाठी वृध्दाश्रमाची गरज भासू लागली... किती हे वाईट... एकत्र कुटुंबपध्दतीचा ऱ्हास हे संकट नव्हे, महासंकटच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract